Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIA

 Freedom Fighter of india थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे

1 Mins read

Freedom Fighter of india थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवले येथे झाला.पांडुरंग टोपे यांच्या आठ पुत्रापैकी तात्या हे दुसरे अपत्य. दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू सेवक त्रिंबकजी डेंगळे यांच्या ओळखीने पांडुरंगराव बाजीरावांच्या पदरी आले.

भारतभर चाललेल्या इंग्रजांच्या दडपशाहीमुळे १८५७अठ मध्ये हिंदी शिपायांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा चालू केला.४ जून रोजी कानपूरच्या शिपायांचा प्रमुख Freedom Fighter of india टीकासिंग, तात्या टोपे व नानासाहेब यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याची सुरुवात केली.

तिथल्या इंग्रजांचा दोन आठवड्याच्याा लढाईत पराभव करून खजिना व शस्त्रागार ताब्यात घेऊन नानासाहेबांनी स्वातंत्र घोषित करून बिठूरला आले. तात्या टोपे कानपूरलाच थांबले. कानपूर पडल्याचे कळताच हॅवलाॅक व नील हे इंग्रज अधिकारी मोठे सैन्य घेऊन कानपूर वर चालून आले.

या सैन्यापुढे टिकाव न लागल्याने Freedom Fighter of india तात्या टोपे उरलेले सैन्य घेऊन ग्वाल्हेरला गेले. नानासाहेब बिठूरहून निघून लखनौकडे गेले. इंग्रज सैन्याने बिठूर काबीज करून मुख्य सैन्य लखनौकडे रवाना करताच तात्या टोपे यांनी पुन्हा हल्ला करून कानपुर काबीज केले. पण अल्पावधीतच इंग्रजांनी कानपुर वर चाल करताच तात्यांनी कानपूर सोडले. ह्यावेळी खजिना व शस्त्रे तात्यांनी आपल्या सैन्याबरोबर नेली. यांच्या साह्याने तात्यांना काल्पी काबीज करून सात हजारांची फौज उभी केली.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून Freedom Fighter of india नानासाहेबांनी तात्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.

१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपे होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती.

कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाचा अभाव पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण Freedom Fighter of india तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.

      Freedom Fighter of india नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास , गाॅल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत शत्रूवर जरब बसवत होता. वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा प्रयत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता.

       तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी Freedom Fighter of india तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

Also Visit : https://www.postboxlive.com

 १८ जून या दिवशी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि गाॅल्हेरही इंग्रजांच्या नियंत्रणात गेले. यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. Freedom Fighter of india तात्यांना नामोहरम करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्नी आणि मुले यांना अटकेत टाकले .तात्यांना पकडण्यासाठी इंग्रज सेनानी तीन दिशांनी प्रयत्न करत होते; पण तात्या त्यांच्या जाळ्यात येत नव्हते. यातील तीन सेनानींना हुलकावणी देऊन आणि पाठलागावर असणाऱ्या इंग्रज सैन्याची दाणादाण उडवून २६ऑक्टोबर १८५८ या दिवशी तात्या नर्मदा ओलांडुन दक्षिणेत उतरले .
Freedom Fighter of india राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी मराठी सैन्याच्या प्रचंड कत्तली करून १८५७ चा उठाव दडपण्याचा प्रयत्न केला .मात्र Freedom Fighter of india तात्या टोपे आपल्याबरोबरच्या सैन्यासह मध्य व उत्तर भारतात कधी इंग्रजांशी लढत तर कधी निसटून जात परंतु ते हार मानावयास तयार नव्हते. वेगवान हालचाली करीत तात्यांनी आपल्या पाठलागावर असलेल्या डझनभर इंग्रज अधिकाऱ्यांच्या फौजेच्या तुकड्यांना दमवून बेजार केरून सोडले.उत्तरेत अलवर ते दक्षिणेत तापी नदी आणि पूर्वेला सागर ते पश्चिमेला छोटा उदयपूर या विस्तीर्ण प्रांतात Freedom Fighter of india तात्या टोपे इंग्रजांना हुलकावणी देत पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात जीव आणण्यासाठी अनेक संस्थानिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होते. पण तात्यांना कुणाचीही साथ मिळाली नाही. इंग्रजांच्या जबरदस्त सैन्याच्या व त्यांच्या क्रूर कत्तली यांच्या दहशतीने तात्यांना मदत मिळू शकली नाही. तात्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
७ एप्रिल रोजी फितूर मानसिंगाने तात्यांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. १४ एप्रिलला तात्यांना क्षिप्री येतील लष्करी न्यायालयापुढे आणण्यात आले. ह्यावेळी न्यायालयात तात्याने स्पष्टपणे सांगितले .” मी जे काही केले ते माझे धनी नानासाहेब यांच्या आज्ञेनुसार केले .कुठलाही साक्षी पुरावा देण्याची माझी इच्छा नाही. मी तुमच्याशी युद्ध केले आहे व आता मी मरणाला सिद्ध आहे.

या घटनेला इंग्लंडमधील नव्हे, तर युरोपातील वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले.ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती.

तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. Freedom Fighter of india तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.
७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. भोपाळला तात्या टोपे नगर नावाची पेठ आहे, तात्या टोपे स्टेडियम आहे, शेजारी टोपेंचा भव्य पुतळाही आहे.
Freedom Fighter of india तात्या यांच्या कार्याविषयी जनरल ह्यू लिहितो ‘१८५७ च्या विद्रोहात जे नेते सामील होते ,त्या सर्वांमध्ये तात्या टोपे हे अप्रतिम साहसी, अति धैर्यवान आणि दृढनिश्चयी होते .त्यांची संघटनशक्ती व प्रतिभा प्रशंसनीय होती.’ जॉर्ज फॉरेस्ट ह्याने तात्यांना सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय नेता म्हटले आहे. तर स्टेडिंग या आणखी एका इंग्रजाच्या मते जर १८५७ च्या विद्रोहात तात्यांसारखे अजून दोन नेते जरी असते तर इंग्रजांना हिंदुस्थान तेव्हाच सोडावा लागला असता. प्रत्यक्ष शत्रुपक्षातील इंग्रज अधिकाऱ्यांची ही वक्तव्ये तात्या
टोपेंच्या १८५७ च्या युद्धातील श्रेष्ठत्व सांगतात .शिवपुरी येथे ज्या ठिकाणी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले तेथे त्यांच्या ह्या हौतात्म्याची आठवण म्हणून केलेली स्मारक शिळा नंतर इंग्रजांनी काढून टाकली. स्वातंत्र्यानंतर पुन्हा ही शिळा बसवून त्या जागी चौथरा बांधून त्यावर तात्या टोपे यांचा तलवारधारी पुतळा बसविण्यात आला.

Also Read : https://www.postboxindia.com/शरद-पवार-सामना-आता-निकराच/

अशा या Freedom Fighter of india थोर स्वातंत्र्य सेनानीला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!