Navratri day 8 – आजच्या आठव्या महादुर्गा चिमनाबाईसाहेब गायकवाड

Navratri day 8 – आजच्या आठव्या महादुर्गा चिमनाबाईसाहेब गायकवाड Navratri day 8 – सातवी माळ चिमनाबाईसाहेब गायकवाड यांच्या चरणी अर्पण 14/10/2021, देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या.चिमनाबाई राणीसाहेब व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन.१८८५ मधे झाला . नेहमीच सांगितले जातेकी प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्री असते,त्याप्रमाणे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या मागे चिमणाबाई राणीसाहेब या The post Navratri day 8 – आजच्या आठव्या महादुर्गा चिमनाबाईसाहेब गायकवाड appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
Navratri day 8 – आजच्या आठव्या महादुर्गा चिमनाबाईसाहेब गायकवाड

Navratri day 8 – आजच्या आठव्या महादुर्गा चिमनाबाईसाहेब गायकवाड

 

Navratri day 8 – सातवी माळ चिमनाबाईसाहेब गायकवाड यांच्या चरणी अर्पण 

 

 

 

 

14/10/2021,

देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या.चिमनाबाई राणीसाहेब व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन.१८८५ मधे झाला .
नेहमीच सांगितले जातेकी प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्री असते,त्याप्रमाणे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या मागे चिमणाबाई राणीसाहेब या भक्कमपणे ऊभ्या होत्या. महाराजांप्रमाणे चिमणाबाई या स्वप्नाळू राणी होत्या.
Navratri day 8 – चिमणाबाई राणीसाहेबांनी बडोद्याच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी आपले पती श्रीमंत सयाजीराजे यांच्या सोबत काम केल्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या वर्षापासूनच प्रगतिशील विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी स्त्रियांवर एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव” भारतीय जीवनातील स्थिती” असे होते.या पुस्तकात त्यांनी महिलांना ज्ञान देण्याच्या अनेक योजनांच्या अपयशावर प्रकाश टाकला होता.
कारण त्यावेळी स्रियांना स्वतः या योजनांवर नियंत्रण ठेवण्याचे स्वातंत्र्य नव्हते. आपल्या राज्यातील महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांनी विविध संस्था निर्माण केल्या. चिमणाबाई राणीसाहेब या अत्यंत स्पष्ट आणि मोकळ्या मतांच्या होत्या. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना पुण्यात झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे प्रथम अध्यक्ष म्हणून एक मताने निवडून दिले .अशा काळात त्यांची निवड झाली की, जेव्हा समाजात पुराणमतवादी, श्रद्धा आणि प्रथा समाजात खूप लोकप्रिय आणि भक्कम होत्या. तेव्हा त्यांनी आश्चर्यकारकपणे आणि अनिवार्यपणे वकिली केली .मुलींसाठी प्राथमिक शिक्षण आणि त्या संमेलनात बालविवाह रद्द करण्याची त्यांनी मागणी केली .या समितीमध्ये सरोजिनी नायडू ,कमलादेवी चटोपाध्याय, मधुलक्ष्मी रेड्डी आणि राजकुमारी अमृत कौर यांच्यासह तत्कालीन काही गतिशील आणि प्रख्यात भारतीय महिलांनी भाग घेतला होता. राज्यात महिला शिक्षणामध्ये सुधारणा करण्याचे त्यांनी धोरण अवलंबीले. मुलींना,अनेक संस्थांना उदार व आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती दिली. त्यासोबतच त्यांनी राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी विविध संस्थांची स्थापना केली. या सर्व संस्थांच्या त्या अध्यक्ष बनल्या.त्यांच्या नावाने अनेक संस्था ऊभ्या राहिल्या होत्या. चिमणाबाई महाराणी पाठशाळा चिमणाबाई महाराणी उद्योग , चिमणाबाई हायस्कूल, चिमणाबाई मातृत्व व बालकल्याण ,लेडीज क्लब अशा विविध संस्थांची त्यांनी स्थापना केली .चिमणाबाई राणीसाहेब यांनी स्थापन केलेली चिमणाबाई उद्योगगृह किंवा चिमणाबाई महिला औद्योगिकगृह ह्या महत्त्वाच्या संस्था होत्या.कष्टकरी महिला व त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. कामगार वर्गांच्या स्त्रियांना विशेषतः काही कलाकुसरीतील काम करणार्या विधवांना देखरेख व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या .या संस्थेच्या माध्यमातून अनेक स्त्रिया स्वावलंबी बनू शकतील हाच त्यांचा हेतू होता.
मुंबईतील उच्च शिक्षण घेण्यासाठी महिला व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यासाठी चिमणाबाई राणीसाहेबांनी तत्कालीन काळात एक लाख रुपयांची देणगी दिली. महिला, शिक्षण आणि उन्नतीसाठी त्यांनी विविध संस्थांना अनेक प्रकारे देणग्या दिल्या. सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांमध्ये चिमणाबाईं राणीसाहेबांनी साकारलेली भूमिका श्रीमंत सयाजीरावांच्या आयुष्यात आणि कार्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नव्हती.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात चिमणाबाई राणीसाहेबांचे कार्य व योगदानामुळे संपूर्ण गुजरात मध्ये याची पायाभरणी झाली. या सर्व गोष्टींमुळे चिमणाबाई राणीसाहेबांना गुजरात मधील लोकांच्या हृदयात स्थान मिळाले.चिमणाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य स्रियांच्या शिक्षणासामधे वाहून घेतले आणि पुरूष प्रणाली व बालविवाह नाकारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.चिमणाबाई राणीसाहेब या उत्तम शिकार करत होत्या.सन.१९०० मधे चिमणाबाई राणीसाहेबांनी रेवा संस्थानला भेट दिली असता तेथे त्यांनी वाघाची शिकार केली होती.
Navratri day 8 – विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय महिलांसाठी काम करणाऱ्या भारताच्या अग्रगण्य स्त्रीचा त्यांना दर्जा मिळाला. कन्या इंदिरा देवी यांनी गाॅल्हेरच्या राजपुत्राशी लग्न करण्यास नकार देऊन ,त्याऐवजी ब्रह्मवारस कुछ बिहारच्या राजपुत्राशी लग्न केले. तेव्हा सयाजीरावांनी या लग्नास नकार दिला असला तरी चिमणाबाई राणीसाहेबांनी इंदिराजींच्या लग्नाचे समर्थन केले. नंतर याच इंदिरा देवी यांच्या मुलगी जयपुरच्या महाराणी गाायत्री देवी म्हणून प्रसिद्ध झाल्या.
श्रीमंत चिमणाबाई राणीसाहेब यांचे २३ आॅगस्ट १९५८ ला बडोदा येथे निधन झाले.

अशा या थोर महिला समाजसेवक चिमणाबाई राणीसाहेब यांना आठव्या माळेचा मान जातो

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
#जागर – मराठेशाहीचा –
# जागर स्त्रीशक्तीचा

The post Navratri day 8 – आजच्या आठव्या महादुर्गा चिमनाबाईसाहेब गायकवाड appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything