raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतान

raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतान raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतानजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 14/10/2021, रझिया सुलतान यांचा जन्म १२०५ रोजी झाला. दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणारी तार्तर (इल्बारी) घराण्यातील पहिली राणी. तिचे चारित्र्य, चरित्र आणि कर्तृत्व यांविषयी इतिहासात अनेक कथा-दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. रझिया ही अल्तमश याची एक हुशार मुलगी. तिला त्याने लहानपणी धार्मिक व लष्करी शिक्षण दिले. राज्यकारभारातही तो अनेक वेळा तिला सहभागी करून घेत असे. ज्येष्ठ राजपुत्र नासिरुद्दीन मुहम्मद याच्या The post raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतान appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतान

raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतान

 

 

raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतानजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

 

 

14/10/2021,

रझिया सुलतान यांचा जन्म १२०५ रोजी झाला.

दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणारी तार्तर (इल्बारी) घराण्यातील पहिली राणी. तिचे चारित्र्य, चरित्र आणि कर्तृत्व

यांविषयी इतिहासात अनेक कथा-दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. रझिया ही अल्तमश याची एक हुशार मुलगी.

तिला त्याने लहानपणी धार्मिक व लष्करी शिक्षण दिले. राज्यकारभारातही तो अनेक वेळा तिला सहभागी करून घेत असे.

ज्येष्ठ राजपुत्र नासिरुद्दीन मुहम्मद याच्या आकस्मिक मृत्यूनंतर (१२२९) अल्तमशने इतर सर्व राजपुत्रांना डावलून भावी

वारस म्हणून रझियाचीच निवड केली होती. ग्वाल्हेर मोहिमेच्या वेळी (१२३१–३२) त्याने शासनाची सर्व जबाबदारी रझियावर टाकली;

तथापि तुर्की सरदारांना राजपुत्र हयात असताना एका स्त्रीचे वर्चस्व अपमानास्पद वाटू लागले. तेव्हा अल्तमशच्या

मृत्यूनंतर रुक्नुद्दीन फीरुझशाह याला सरदारांनी गादीवर बसविले (मे १२३६).

तो दुर्व्यसनी व चैनी होता आणि प्रत्यक्षात सर्व सत्ता त्याची आई शाह तुर्कान बेगम हिच्याकडे होती.

तिने raziya sultan रझियासह सावत्र मुलांना नष्ट करण्याचे कटकारस्थान रचले. कट उघडकीस येताच चाळीसगुणी शम्सी

सरदारांत असंतोष माजला आणि त्यांनी रझियाच्या मदतीने रुक्नुद्दीन विरुद्ध बंड करून रझियाला सुलतान

रझियतुघीन या नावाने दिल्लीच्या तख्तावर बसविले (७ नोव्हेंबर १२३६). बुरखा टाकून ती दरबारात बसू लागली.

पुरुषी वेश धारण करून हत्तीवर बसून ती प्रजेस दर्शन देत असे. रणांगणातील नेतृत्व ती स्वतः करी.

प्रत्येक काम ती स्वतः पाहून निकालात काढीत असे.

तिने दरबारातील प्रमुख सरदारांना विश्वासात घेतले आणि हिंदूंवरील जझिया कर रद्द केला. रस्त्यांची व्यवस्था,

इमारतींची डागडुजी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इ. तिच्या महत्त्वाच्या सुधारणा होत. तिने प्रशासनात शिस्त आणली.

आपल्या नावाने नाणी पाडली. नाण्यांवर उम्दत-उल्‌-निस्वा अशी मुद्रा असे.

राज्यावर येताच वजीर निजामुल्भुल्क मुहम्मद जुनैदी व बदाऊन, मुलतान, हांसी, लाहोर इ. ठिकाणच्या राज्यपालांनी तिच्याविरुद्ध बंड पुकारले. परंतु नुस्रतद्दीन तायसी, इज्जुद्दीन मुहम्मद सालारी, कबीरखान आयार इत्यादींच्या मदतीने तिने भेदनीतीचा उपयोग करून विरोधकांचा निःपात केला आणि राज्यात शांतता प्रस्थापिली. ग्वाल्हेरचा किल्ला सर केला आणि रणथंभोरमधील मुस्लिम सैनिकांना मुक्त्त केले. तुर्की सरदारांचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने जमालुद्दीन याकूत नावाच्या ॲबिसिनियन गुलामाला शाही तबेल्याचे अमीर उल्‌ उम्र यास प्रमुख नेमले व त्यास अनेक अधिकार दिले. याशिवाय विश्वासातील सेवकांना उच्चपदे दिली. परिणामतः शम्सी सरदारांना एका स्त्रीचे वर्चस्व अपमानास्पद वाटू लागले.
काही विश्वासू अमीरही तिच्याविरोधात गेले. लाहोरच्या कबीरखान आयार याने बंडाचे निशाण उभारले. भतिंडाच्या मलिक आल्तुनियाने तिच्या सम्राज्ञीपदालाचआव्हान दिले. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी तिने पराक्रमाची शर्थ केली. परंतु तंबूतच तुर्की सरदारांनी जमालुद्दीन याकूतला ठारकेले. त्याच्या मृत्यूने ती खचली. तिचा पराभव होऊन तिला तुरुंगात टाकण्यात आले. दरम्यान तिचा सावत्र भाऊ बेहरमशाह यासदिल्लीचे सुलतानपद देण्यात आले. तेव्हा तिने आल्तुनियाशी संगनमत करून त्याच्याशी लग्न केले आणि उभयतांनी गख्खर, जाट वभाडोत्री सैन्य घेऊन दिल्लीकडे आगेकूच केली. जलालुद्दीन बल्बन याने दिल्ली –कटेहर मार्गावरील कैथलच्या युद्धात त्यांचा पराभवकेला (२४ ऑक्टोबर १२४०). आल्तुनिया व ती पळून जात असता अज्ञात इसमांनी उभयतांचा वध केला.
तिने चोख कारभार केला.खुसरौच्या मते तिच्या हातून क्षुल्लकशीही चूक घडली नाही. याकूत–रझिया व दिल्लीच्या गादीवर येणारी पहिली मुस्लिम महिला म्हणून तिचे नाव होते.
रजिया सुलतान raziya sultan अतिशय बुद्धिमान, उत्कृष्ट प्रशासक आणि तिच्या वडिलांसारखी शूर योद्धा होती. त्यांचे प्रशासन केवळ तीन वर्षे होते हे असूनही, त्यांची कामे इतिहासाच्या पानांमध्ये लिहीली गेली आहेत.
पुरुषांसारखे कपडे घालून ती खुल्या दरबारात बसायची.ती एक प्रभावशाली शासक होती. आणि तिच्याकडे राज्यकर्त्याचे सर्व गुण होते. बालपणी आणि तारुण्यात रझियाचा महिलांशी फारसा संबंध नव्हता, त्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांचे मूलभूत वागणे तिला शिकता आले नाही. खरं तर, सुलतान बनण्याआधी तिला तिच्या वडिलांच्या कारभाराच्या नियमांकडे आकर्षित केले होते.
सुलतानप्रमाणे रझियाने raziya sultan अंगरखा व राजमुकुट परिधान केला आणि जेव्हा तिने हत्तीवर स्वार होऊन लढाईत भाग घेतला तेव्हा चालीरीती सोडून तिने आपला चेहरा उघडा ठेवला.
रझियाच्या raziya sultan वडिलांने आपल्या पहिल्या लहान मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी भव्य उत्सव आयोजित केला होता.अनेक मुलांनंतर रझियाचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या धर्माच्या विरोधात जाऊन तिला शिक्षण देण्यात रस घेतला .रझीया वर्षांची झाली तेव्हा वडिलांनी दिलेल्या शिक्षणामुळे रझिया एक कुशल तिरंदाज आणि घोडेस्वार म्हणून ओळखली गेली .आणि बर्‍याचदा ती तिच्या वडिलांसोबत त्यांच्या लष्करी कार्यात मदत करायची.
रझियाचे वडील एकदा ग्वाल्हेर लढाईत आक्रमण करण्यासाठी गेले तेव्हा, ते दिल्लीचा कारभार रझियाकडे सुपूर्द करून गेले होते. रझियाचा कारभार पाहून त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून रझियाची निवडल केली.
पुढे रझिया सुलतानने raziya sultan आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व संपूर्ण शांतता प्रस्थापित केली , ज्यात प्रत्येक व्यक्तीने केलेले नियम व कायदे पाळले पाहिजेत.
रझिया सुलतान हिने लोक कल्याणकारी बर्त्याच योजना राबवल्या. त्यांनी तयार केलेल्या रस्त्यांचे आणि विहिरींचे काम पाहता रझियांच्या लोककल्याची तळमळ दिसून येते.
याव्यतिरिक्त, तिने विविध ठिकाणी शाळा, आणि ग्रंथालये उघडली, ज्यामुळे संशोधकांना कुराण आणि मुहम्मद यांच्या धोरणांवर कार्य करण्यास सोपे गेले व त्यांना प्रोत्साहित केले गेले.रझिया सुलतान यांनी विज्ञान , विचार , खगोलशास्त्र, आणि शाळा, कॉलेजमध्ये मध्ये आपले लक्ष केंद्रित केले होते.
शिल्पकला आणि संस्कृती या क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले व विद्वान , चित्रकार आणि कारागीर यांना पाठबळ दिले.
रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली बहुधा एकमेव मुस्लिम महिला होती. राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नव्हते ,परंतु रझियाने त्यांची पर्वा केली नाही. ती शिकारसुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेच नेतृत्व करायची. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझियाने रणंथंभोरच्या विरुद युद्धमोहीम आखली होती. तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानूनव्यवस्था प्रस्थापित केली होती, रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी १३ आॅक्टोबर १२४० रोजी त्यांचा शेवट झाला.

अशा या मुस्लिम शासक raziya sultan रझिया सुलतान यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Also Visit : https://www.postboxlive.com

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

The post raziya sultan – कुशल प्रशासक रझिया सुलतान appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything