iron woman of India – श्रीमंत सकवारबाईसाहेब भोसले 

iron woman of India – श्रीमंत सकवारबाईसाहेब भोसले iron woman of India – थोर राजेशिर्के कन्या सकवारबाई राणी साहेब 18/10/2021, छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या पत्नी येसूबाई राणीसाहेब यांना भवानी बाई व शिवाजी उर्फ शाहू महाराज ही दोन अपत्ये. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर येसूबाईसाहेब व शाहू राजे मोगलांच्या कैदेत सापडले. जवळजवळ शाहूमहाराज मोगलांच्या कैदेत १८ वर्षे होते .यथावकाश औरंगजेब बादशाहाने कैदेत असतानाच शाहू महाराजांची दोन लग्न करवली. जाधवराव घराण्यातील अंबिकाबाई व शिंदे घराण्यातील सावित्रीबाई The post iron woman of India – श्रीमंत सकवारबाईसाहेब भोसले appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
iron woman of India –  श्रीमंत सकवारबाईसाहेब भोसले 

iron woman of India – श्रीमंत सकवारबाईसाहेब भोसले 

iron woman of India – थोर राजेशिर्के कन्या सकवारबाई राणी साहेब

18/10/2021,

 छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या पत्नी येसूबाई राणीसाहेब यांना भवानी बाई व शिवाजी उर्फ शाहू महाराज ही दोन अपत्ये. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर येसूबाईसाहेब व शाहू राजे मोगलांच्या कैदेत सापडले. जवळजवळ शाहूमहाराज मोगलांच्या कैदेत १८ वर्षे होते .यथावकाश औरंगजेब बादशाहाने कैदेत असतानाच शाहू महाराजांची दोन लग्न करवली.

           जाधवराव घराण्यातील अंबिकाबाई व शिंदे घराण्यातील सावित्रीबाई .लवकरच या दोघींचा मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची परत दोन लग्न लावून देण्यात आली. सकवारबाई व सगुणाबाई या त्यांच्या दोन पत्नी.

              सगुनाबाई मोहिते घराण्यातील तर सकवारबाई राजेशिर्के म्हणजेच येसूबाई राणीसाहेब यांच्या माहेर घराण्यातील. सकवारबाई राणीसाहेब या अत्यंत हुशार व धोरणी होत्या. सगुणाबाई राणीसाहेब यांचा लवकरच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सकवार बाईंचा वरचष्मा अधिकच वाढला. दत्तक आपल्या म्हणण्याप्रमाणे घ्यावा असा त्यांनी हट्ट धरला.सकवारबाई राणीसाहेब या मुळातच कडक व उग्र असल्यामुळे त्या सरकारी कारभारात शाहू महाराजांच्या बरोबरीने भाग घेत होत्या .

            सरंजाम देणे, वतने देणे ,इत्यादी बाबी iron woman of India सकवारबाईराणीसाहेब यांच्या सल्ल्याने छत्रपती शाहू महाराजांना करणे भाग पडत होते.
या काळात नानासाहेब पेशव्यांच्या कागाळ्या वाढल्या होत्या. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांच्या पाठीमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून त्यांच्या अधिकार शाहीला बऱ्याच प्रमाणात सकवार बाईं राणीसाहेबांनी पायबंद घातलेला होता. त्यामुळे पेशव्यांनी सकवार बाईं राणीसाहेबांची धास्तीच घेतली होती. पेशव्यांना सकवारबाई राणीसाहेबांनी वारंवार धारेवर धरले होते.

                 सकवारबाई राणीसाहेब अत्यंत हुशार असल्यामुळे शाहू महाराज आपले बरेच निर्णय सकवारबाई राणीसाहेबांच्या सल्ल्यानेच घेत असत. शाहू महाराजांना पुत्र नसलेने सकवारबाई राणीसाहेबांची इच्छा होती की दत्तक घ्यावयाचा तो आपल्या सल्ल्याने वागणारा असावा .परंतु यादरम्यान ताराराणी साहेबांनी आपला नातू हयात असल्याची बाब शाहू महाराजांना सांगितली व तोच आपल्या गादीला वारस असावा असे शाहू महाराजांना वाटू लागले .ते पाहून सकवारबाई राणीना वैषम्य वाटले. म्हणून त्यांनी या गोष्टीला विरोध करण्यासाठी सारे पेशव्यांचे विरोधक आपल्या हाताशी धरले.व त्यांच्यामार्फत आजारी असलेल्या शाहू महाराजांचे भोवती पहारा बसवला.

             परंतु या दरम्यान नानासाहेब पेशव्यांनी शाहू महाराज ग्लानीत असताना संपूर्ण मराठा राज्य पेशव्यांचे नावे लिहून घेतले .दत्तक घेण्याबद्दल शाहू महाराजांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता तोवरच त्यांचा मृत्यू झाला .अशा परिस्थीतीत पेशव्यांचे धाबे दणाणले ,कारण सकवारबाई राणीसाहेब काय करतील याचा नेम नव्हता. म्हणून नानासाहेब पेशव्यांनी सकवारबाई राणीसाहेबांना सक्तीने सती घालविण्याचा कट रचला. त्यासाठी साताऱ्यात मोठा फौजफाटा आणून शक्तिप्रदर्शन केले सकवारबाई राणीसाहेबांना सती जाण्यासाठी आपल्या कारभार्या मार्फत व ब्राह्मण हस्तका मार्फत प्रयत्न सुरू केले. सकवारबाई राणीसाहेबांना सती जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी सती जाण्यास कडाडून विरोध केला.

                 पेशव्यांनी राजवाड्याभोवती चौकी पहारे बसवले व सकवारबाईंच्या महाला भोवतीही पहारे बसवून त्यांना कोणी भेटणार नाही अशी व्यवस्था केली. नंतर सकवार बाईंचे वडील व भाऊ यांना लोहगड यासारख्या किल्ल्यावर अंधारकोठडीत टाकण्याची धमकी दिली. पेशव्यांनी सकवारबाई राणीसाहेबांच्या वडिलांना कुंवरजी राजेशिर्के यांना धरून आणले.

              iron woman of India सकवारबाई राणीसाहेब यांनी सती जाण्याचा आपला विरोध असल्याचे सांगून टाकले व मी कधीही सती जाणार नाही असे जाहीर केले .पेशव्यांनी त्यांच्यावर सक्ती करून सकवारबाईना सती जाण्यास सांगण्यात आले .तसेच मनाने त्या सती जाण्यास तयार होईनात म्हणून पेशव्यांनी सती जाण्याची सर्व तयारी करून सक्ती करू व चितेत उचलून टाकू अशी त्यांच्या महालात जाऊन तंबी दिली .सैनिकांकडून त्यांना महालातून ओडून काढण्याचा प्रयत्न करत असताना सकवारबाई राणीसाहेबांनी जोरदार विरोध केला .

           तोपर्यंत त्यांच्या महाला भोवती शिंगे व नगारे वाजविण्यात येऊ लागले. कारण राणी साहेबांचा आक्रोश कोणाच्याही कानावर जाऊ नये .अखेर राणी असल्या तरी त्या हि एक स्त्री होत्या. त्यांच्या विरोधाला मर्यादा होत्या. त्यांच्या विरोधाचा आता काही उपयोग झाला नाही. व त्यांना सक्तीने अग्नी प्रवेश करावयास लावला गेला.

सर्व शिर्के कुटुंबावर दहशत बसवून शेवटी सकवारबाई राणी साहेबांना सती घालवले .( चिटणीस बखर पृष्ठ क्रमांक ३७ ) मराठ्यांचे आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतात की “सकवारबाई राणीसाहेबांना पेशव्यांनी बळजबरीने सती घालवले. न जातील तर बळे न्यावी ,महाराजांमागे बखेडा करतील ,मग विचार करावा.नंतर काय उपयोग. आताच त्यांचा शेवट झाला पाहिजे, असे म्हणून पेशव्यांनी सकवारबाई राणी साहेबांना बळजबरीने सती घालवले असे नीच कृत्य करण्यापेक्षा सकवारबाई राणीसाहेबांना उघडपणे फाशी दिले असते तर ते पुरुषार्थाला शोभले तरी असते.”सकवारबाई राणीसाहेबांच्या सती जाण्याने पेशव्यांचा दुष्ट हेतू सफल झाला .

     कदाचित नानासाहेब पेशव्यांना असेही वाटले असेल की ,या iron woman of India मराठा स्त्रिया पतीच्या पश्चातही चांगला कारभार करू शकतात. त्यासाठी महाराणी येसूबाई साहेब, महाराणी ताराबाईसाहेब,उमाबाई दाभाडे साहेब अशी अनेक उदाहरणे पेशव्यांना आठवली असतील व सकवारबाईनी राज्य कारभार हाती घेतला तर आपल्याला अंधार कोठडीची मरेपर्यंत हवा खावी लागेल या भीतीपोटीही सकवार बाईंना सतीच्या नावाखाली पेशव्यांनी जाळून मारले.

सकवारबाईंना जर पेशव्यांनी सक्तीने सती घालवले नसते तर स्वतःच्या मनाने त्या कधीच सती गेल्या नसत्या. अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा त्या स्त्री होत्या. त्यामुळे मराठेशाहीच्या इतिहासाला कलाटणी मिळून सातारचे मराठ्यांचे राज्य इंग्रजांना नष्ट करता आले नसते.
सातारचे कलेक्टर असताना ग्रँडडफ यांनी मराठ्यांच्या इतिहासावर टाकलेला प्रकाश मराठी मनाला विचार करावयास लावणारा आहे.

अशा या थोर राजेशिर्के कन्या सकवारबाई राणी साहेबांना आमचा मानाचा मुजरा

Also Visit : https://www.postboxlive.com

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

The post iron woman of India – श्रीमंत सकवारबाईसाहेब भोसले  appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything