Iron woman of India – श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर

Iron woman of India – श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर Iron woman of India – अपरिचित महा – विरांगना 19/10/2021, श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर फलटणचे मुळ पुरूष मुधोजी नाईक निंबाळकर. मुधोजी नाईक निंबाळकर यांना चार अपत्य सर्वात जेष्ठ पुत्र साबाजी, नंबर दोन जगदेवराव, नंबर तीन सईबाई राणीसाहेब. नंबर चार बजाजी नाईक निंबाळकर फलटण सईबाई राणीसाहेब यांच्या माहेरचे वंशज म्हणजेच फलटणचे नाईक निंबाळकर .मुधोजी राजे यांचे जेष्ठ पुत्र साबाजी लढाई निमित्त बाहेर पडले ते पुढे वैराग ,तालुका बार्शी. जि.सोलापूर The post Iron woman of India – श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
Iron woman of India – श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर

Iron woman of India – श्रीमंत सगुणाबाईसाहेब

नाईक निंबाळकर

Iron woman of India – अपरिचित महा – विरांगना

 

 

 

19/10/2021,

श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर फलटणचे मुळ पुरूष मुधोजी नाईक निंबाळकर. मुधोजी नाईक निंबाळकर यांना चार अपत्य सर्वात जेष्ठ पुत्र साबाजी, नंबर दोन जगदेवराव, नंबर तीन सईबाई राणीसाहेब. नंबर चार बजाजी नाईक निंबाळकर फलटण सईबाई राणीसाहेब यांच्या माहेरचे वंशज म्हणजेच फलटणचे नाईक निंबाळकर .मुधोजी राजे यांचे जेष्ठ पुत्र साबाजी लढाई निमित्त बाहेर पडले ते पुढे वैराग ,तालुका बार्शी. जि.सोलापूर येथे स्थायिक झाले. तर मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांचे द्वितीय पुत्र जगदेवराव नाईक निंबाळकर हे भाळवणी ता.पंढरपूर, जि.सोलापूर येथे स्थायिक झाले. मुधोजी नाईक निंबाळकर यांचे तीन नंबर अपत्य म्हणजे Iron woman of India सईबाई राणीसाहेब.या पुढे शिवाजी महाराजांशी लग्न होऊन भोसल्यांच्या घरी गेल्या,तर बजाजी नाईक निंबाळकर हे फलटणलाच वास्तव्यास राहिले. इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी नाईक निंबाळकर त्याच्याबरोबर होते. इ.स. १६६५ मधे मोंगल व शिवाजी राजे यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. छत्रपती शिवाजी महाराज यांना बजाजीची गुप्तपणे मदत होत असे. सावित्रीबाई यांना महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हे शिवाजी राजांच्या मोठ्या कन्या सखुबाई राणीसाहेब यांचे पती व शिवाजी महाराजांचे जांवई होते. महादजी नाईक निंबाळकर हे एक मोठे सरदार होते. ते बहुश: कर्नाटकाकडे असत. संभाजी राजांना त्यांची चांगली मदत झाली. संभाजी राजांची हत्या झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेवलें होते. पुढे कैदेत असतानाच महादजी नाईक निंबाळकर यांचा गाॅल्हेरच्या किल्यातच मृत्यू झाला. त्या नंतर सखुबाई राणीसाहेब फलटणला येऊन सती गेल्या.त्यांची समाधी फलटणमध्ये बांधली आहे. छत्रपती शिवाजी राजांनी मौजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती.व हे गाव आपल्या मुलगी सखुबाई राणीसाहेब यांना चोळी बांगडीसाठी आंदण म्हणून दिले होते. महादजींचे पुत्र बजाजी दुसरे हे स.१७७४ पर्यंत हयात होते. महादजीचे धाकटे भाऊ मुधोजी. त्यांचा मुलगा बजाजी (तिसरे) यांना छत्रपती रााजाराम महाराजांची मुलगी सावित्रीबाई दिल्या होत्या. पहिले बजाजी स.१६७६ च्या सुमारास वारले त्या नंतर त्यांचे तिसरे पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आले. याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. त्यांचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजी यांना दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण झाले.. त्या वेळीं मुधोजीच्या Iron woman of India पत्नी सगुणाबाई राणीसाहेबांनी लढाई केली व सगुनाबाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिल्या. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). जहागिरीचा कारभार सगुणाबाईराणीसाहेब करीत असत.नाईक निंबाळकर या घराण्यांत या बाई फार प्रख्यात होत्या.अत्यंत शूर व धाडसी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. मालोजीराजे हे कर्नाटकांत हरिपंत तात्याच्याबरोबर असतां मृत्यू पावले. (१७७७). त्यांनी जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हे आपल्या पित्याप्रमाणेच पेशव्यांच्या सैन्यांत असत व सगुणाबाई राणीसाहेबच जहागिरीचा कारभार पाहात असत. सगुनाबाई राणीसाहेब यांच्या कारकीर्दीत फलटणमध्ये रामाचे मंदिर, मनमोहन राजवाडा यांची निर्मिती झाली. त्या स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागले. ते स. १८२५ मधे ते वारले. त्यावर त्यांची बायको साहेबजीबाई यांनी स.१८५३ पर्यंत कारभार केला. त्यांनी मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर होते.आता मालोजीराजे यांचे वारस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर हे वास्तव्यास आहेत.

Also Visit : https://www.postboxlive.com

लेखन

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

The post Iron woman of India – श्रीमंत सगुणाबाईसाहेब नाईक निंबाळकर appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything