Mumbai best bus – बेस्ट करणार तुम्हाला सुटी नाणी आणि नोटांचे वितरण

Mumbai best bus – बेस्ट करणार तुम्हाला सुटी नाणी आणि नोटांचे वितरण Mumbai best bus – उच्च मूल्य नोटांच्या बदल्यात सुटी नाणी आणि नोटांचे वितरण 19/10/2021, मोदी सरकार कडून करण्यात आलेल्या नोटबंदी मुळे जुन्या १०० आणि ५०० चलनातून वगळण्यात आल्यानंतर नव्याने चलनी बाजारात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांमुळे खरेदी / विक्री च्या व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. सुट्ट्या पैशांचा तुटवडा आणि लोकांकडे असलेल्या संग्रहातल्या सुट्ट्या पैशांचे पिगी बँक, सुट्टी जमा पूंजी, आजी आजोबांचे बटवे, पॉकेटमनी म्हणून साठवलेली सुट्ट्या पैशांची नाणी The post Mumbai best bus – बेस्ट करणार तुम्हाला सुटी नाणी आणि नोटांचे वितरण appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
Mumbai best bus – बेस्ट करणार तुम्हाला सुटी नाणी आणि नोटांचे वितरण

Mumbai best bus – बेस्ट करणार तुम्हाला सुटी नाणी आणि नोटांचे वितरण

Mumbai best bus – उच्च मूल्य नोटांच्या बदल्यात सुटी नाणी आणि नोटांचे वितरण

19/10/2021,

मोदी सरकार कडून करण्यात आलेल्या नोटबंदी मुळे जुन्या १०० आणि ५०० चलनातून वगळण्यात आल्यानंतर नव्याने चलनी बाजारात
आलेल्या २००० रुपयांच्या नोटांमुळे खरेदी / विक्री च्या व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. सुट्ट्या पैशांचा तुटवडा आणि लोकांकडे
असलेल्या संग्रहातल्या सुट्ट्या पैशांचे पिगी बँक, सुट्टी जमा पूंजी, आजी आजोबांचे बटवे, पॉकेटमनी म्हणून साठवलेली सुट्ट्या पैशांची नाणी अथवा सुट्टे एक , दोन, दहा , पाच , वीस रुपयांचे नोट लोकांनी व्यवहारात आणून खर्च झाल्यामुळे चलनी नाण्यांचा , नोटांचा सुट्ट्या पैशांचा तुटवडा ग्राहक आणि व्यापारी वर्गाबरोबर वादाचा विषय झाला, रेल्वे तिकीट बारीवर सुट्ट्यांसाठी वाद, बस मध्ये कंडक्टर बरोबर वाद , बाजारात ग्राहक / व्यापाऱ्याची हमरी तुमरी सगळीकडेच पाहायला मिळाली, मुलांचे पॉकेटमनी थांबले, तर आजोबांची पान तंबाखू ची सवय , गृहिणींची बचत. मोदी सरकारने अचानक केलेल्या नोटबंदीमुळे संपूर्ण देशात अराजकता माजली होती. एटीएम मशीन बाहेर रांगा लागल्या, अनेक जेष्ठ नागरिकांचे नोटबंदीच्या काळात हाल झाले. अनेकांचे मृत्यू देखील या दरम्यान झाले. काळा पैसा देशात आला कि नाही माहित नाही पण देशातील नागरिकांचे हाल हाल झाले.

नोटबंदीच्या या आघातातून देश सावरतोय , हळू हळू २००० रुपयांच्या नोटा आपोआपच एटीएम आणि चलनातून दिसेनाश्या सुद्धा झाल्यात, तरी पण सुट्ट्या चलन आणि पैशांसाठी काही संस्था आणि उपक्रम लोकांना दिलासा द्यायला पुढे येत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बेस्ट महामंडळाकडून करण्यात येत आहे, तरी सर्व व्यापारी आणि नागरिकांनी याचा फायदा घ्यावा अशी माहीती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Mumbai best bus – बेस्ट उपक्रमामार्फत नागरिक / व्यापारी यांच्यासाठी उच्च मूल्य नोटांच्या बदल्यात सुटी नाणी आणि नोटांचे वितरण
मुंबई, १८ बेस्ट उपक्रमाकडे सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या रु.१० व रु.२० मूल्यवर्गाच्या नोटा आणि रु.१०, रु.५, रु.२ व रु.१ मूल्यवर्गाची
नाणी नागरीकांना, व्यापारीवर्गाला आणि समाजातील इतर तत्सम घटकांना उच्च मूल्यवर्गाच्या बदल्यात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याकरिता उपक्रमाच्या सर्व बस आगारांमध्ये तिकीट व रोख विभागात ( रविवार आणि सार्वजनिक सुट्टी दिवस वगळून ) ९.३० ते १६.०० या वेळेत सुटी नाणी आणि नोटा वितरीत करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नागरिक, व्यापारी आणि इतर संबंधित घटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

The post Mumbai best bus – बेस्ट करणार तुम्हाला सुटी नाणी आणि नोटांचे वितरण appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything