Indian freedom fight
Indian freedom fight
Indian freedom fight

Indian freedom fight – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी !

Indian freedom fight - भारतीय स्वातंत्र्य संग्राम - भारतकुमार राऊत

Indian freedom fight – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी !

Indian freedom fight – भारतीय स्वातंत्र्य संग्राम – भारतकुमार राऊत

 

पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी !


ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या युद्धाला आज १६४ वर्षे झाली. १८५७ च्या या स्वातंत्र्य युद्धाला

`शिपायांचे बंड’ म्हणून हिणवणाऱ्या ब्रिटिशांना व त्यांची मुजोरी सहन करणाऱ्या भारतीय राव-उमरावांना सणसणीत चपराक

म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड’ नव्हे, तर भारताचे पहिले Indian freedom fight `स्वातंत्र्ययुद्ध’ होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले.

हुतात्मा मंगल पांडे यांच्यासारख्या शूर वीरांनी गोऱ्यांच्या राजवटीला सशस्त्र विरोध केलेलाच होता. देशाच्या अनेक भागांत,

विशेषत: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांत ब्रिटिश विरोधी युद्धाचा भडका १८५७ मध्ये मेरठच्या लष्करी छावणीत

आजच्या दिवशी देशभक्त भारतीय जवांनांनी केलेल्या बंडामुळे उडाला. उत्तर भारतातील ही ईस्ट इंडिया कंपनीची सर्वात

मोठी लष्करी छावणी. यामध्ये देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते.


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली. असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश

हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानास्पद धिंड काढली.

त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी,

१० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी

उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच

करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.


या उठावाचे वृत्त बघता बघता सर्वत्र पसरले व राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बहाद्दरशहा जाफर, नानासाहेब या व अशा लढवय्यांनी

ठिकठिकाणी कंपनी सरकारविरुद्ध युद्ध पुकारले. या लढाया आणखी सुमारे वर्षभर चालू राहिल्या. अखेर हे युद्ध संपले.

पण त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्तासुद्धा संपून ब्रिटिश सरकारने भारताची राजवट ताब्यात घेतली.


१८५७ Indian freedom fight च्या युद्धात जे उतरले, त्यापैकी बहुतेकांना कंपनी सरकारबरोबर आपले वेगवेगळे हिशेब चुकवायचे होते.

पण त्यामुळे गोऱ्यांच्या सत्तेविरुद्धचे अंगार चेतवले गेले, हे वास्तव आहे. त्यानंतरच देशात स्वातंत्र्य प्राप्तीची विविध आंदोलने सुरू झाली.

त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या बिनीच्या नेत्याबरोबरच चापेकर बंधू,

भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व 90 वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात मराठेशाहीतील सरदारांनी उडी घेतली. महाराष्ट्रात औंध संस्थानातही उठाव झाला.

पण पंजाबमधील शीख संस्थानिकांनी कंपनी सरकारचीच पाठराखण केली. बंगालही अलिप्त राहिला. या युद्धाचे लोण दक्षिण भारतात पसरलेच नाही.

या युद्धात हिंदुस्थानी वेगवेगळे लढले व म्हणुन हरले, असे लोकमान्य टिळकांनी म्हटले, ते खरेच आहे.

असो. ज्या हिंदुस्थानप्रेमी सैनिकांनी या युद्धात सर्वस्वाचा होम केला, त्यांच्या स्मृतींना सलाम ! 

– भारतकुमार राऊत

Advertisement

More Stories
charlie chaplin birthday
charlie chaplin birthday – चार्ली चॅपलिन यांची आज जयंती
error: Content is protected !!
%d bloggers like this: