Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

indian wrestling – पैलवान टक्कल फोटो मागील रहस्य

1 Mins read

indian wrestling – पैलवान टक्कल फोटो मागील रहस्य

indian wrestling –  टक्कल केलेला फोटो दिसतोय. या फोटोचा एक किस्सा आहे.


गंगावेस तालमीचा समोरील दिग्गज पैलवानांचा, सर्वांनी टक्कल केलेला फोटो दिसतोय. या फोटोचा एक किस्सा आहे.

13 जून 1969 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाची कामगिरी बजावणारे, चित्रपट, नाटक, शिक्षण,

साहित्य, पत्रकारिता आणी राजकारणात आपल्या प्रतिभेची छाप सोडणारे तसेच कोल्हापूर मध्ये आल्यानंतर

संयुक्त महाराष्ट्रासाठी indian wrestling गंगावेश तालीम मध्ये गुप्त बैठक घेणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

(आचार्य अत्रे ) यांचे दुःखद निधन झालं होते.

indian wrestling - सर्वांनी टक्कल केलेला फोटो दिसतोय. या फोटोचा एक किस्सा आहे.

indian wrestling – सर्वांनी टक्कल केलेला फोटो दिसतोय. या फोटोचा एक किस्सा आहे. Kolhapur

म्हणून त्यावेळी गंगावेस तालीम च्या सर्व पैलवानांनी तसेच वस्ताद बाबुराव गवळी यांनी प्रत्येक पैलवानांना

टक्कल करायला लावले होते. काहीजण टक्कल करायला तयार होते , पण काहीजण टक्कल करुन घेत नव्हते ,

तर त्यावेळी वस्तादांनी जबरदस्तीने केस कापायला लावले.


सुरुवातीला नाही म्हणणाऱ्या पैलावानांना वस्तादांनी आचार्य यांच्याबद्दल सांगितल्यावर नंतर सगळे तयार झाले,

केस कापणाऱ्या नाभिकानां 50 पैसे देऊन वस्ताद बाबूराव गवळी यांनी पैलवानाना जबरदस्ती टक्कल

करायला लावले होते , त्यामुळे बरेच पैलवान पळून जात होते.

काही काही पैलवान लपुन बसले होते . त्या पैलवानाना शोधून त्यांना पकडून टक्कल केले जात होते.

आणि वस्ताद पैलवान गणपतराव खेडकर आण्णा हे आपल्या दोन्ही हातानी दोन पैलवानाना पकडून ठेवायचे

आणि निम्मे केस कापून झाले की आणि दोघांना पकडायला बिराजदार मामा जायचे.

आणखी काहींना पकडून आणले की परत त्यांचे केस कापले जायचे .त्या वेळेला केस कापून गंगावेस

तालमीच्या पैलवानांनी आचार्य अत्रे यांना अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली अर्पित केली होती .


फोटो मध्ये

मध्यभागी
बाबुराव गवळी वस्ताद
उजव्याबाजुने
हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह
वासु खेडकर (खेडकर अण्णांचे भाऊ)
जग्गु बोरगाव (ईस्लामपुर)
ताजुद्दिन वाघेरी (कराड)
तुकाराम लोहार ( शिंगणापूर)कोल्हापुर

डाव्या बाजुने
पैलवान डब्बल महाराष्ट्र केसरी पै. गणपत खेडकर अाण्णा
रुस्तम ए हिंद पै. हरिशचंद्र बिराजदार मामा
गुलाब पटेल (वाघेरि)
सिताराम काशिद (बांबवडे)
मानसिंग खांडज (बारामती)

खाली बसलेले
बाघ पैलवान (फैजाबाद अयोध्या) दिनानाथ अाण्णा यांचे जेवन बनवनारै .
मानसिंग
जयसिंग बंधु (खांडज बारामती)
भिकाजी कुलकर्णी इत्यादी त्यावेळचे पैलवान होते.

हा दुर्मिळ फोटो हिंदकेसरी दीनानाथ आण्णा यांचे पुत्र अभयसिंह दादा यांनी पाठवलेला आहे .
1969 सालची अविस्मरणीय अशी दुर्मिळ आठवण.


 

indian wrestling – कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

error: Content is protected !!