Instagram
Instagram
Instagram

Instagram इंस्टाग्राम अकाउंट वापरत आहात तर सावध रहा.

Instagram इंस्टाग्राम अकाउंट वरून आर्थिक व्यवहार करताना सावध रहा

Instagram इंस्टाग्राम अकाउंट वापरत आहात तर सावध रहा.

 

Instagram इंस्टाग्राम अकाउंट वरून आर्थिक व्यवहार करताना सावध रहा

 

 

अंजनी मिश्रा रिपोर्ट

 

7/4/2021,

पो. ठाणे –
मलबार हिल पो. ठाणे

गु.र.क्र. – २१०/२१ कलम ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२०, ३४ भादवी सह कलम ६६ (सी)(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा

गुन्हा दाखल दिनांक – २४/०६/२०२१

अटक आरोपीचा नाव व पत्ता

१) अविनाश रूपकुमार जाधवानी उर्फ करण उर्फ सिद्धेश, वय २६ वर्षे, रा.ठी. प्लॅट नं. १०२, मित्तल क्रिस्ट इमारत, कल्याणी नगर, पुणे.

avinash rupkumar jadhavani
avinash rupkumar jadhavani

२) आकाश रूपकुमार जाधवानी, वय २२ वर्ष, रा. ठी. प्लॅट न. ११०४, टॉवर नं. ०३, वडगाव शेरी, पुणे.

akash rupkumar jadhavani
akash rupkumar jadhavani

अटक दि. ३०/०६/२०२१

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत –
यातील फिर्यादी यांना दिनांक 17/06/2021 रोजी कुटुंबासह लोणावळा येथे दिनांक 24/06/2021 ते 27/06 /2021 रोजी दरम्यान सुट्टी घालवण्याचे नियोजित केले होते. त्यांनी Instagram इंस्टाग्राम वर lonavala_villa77या अकाउंटवर बंगला भाड्याने मिळेल अशी जाहिरात वाचून दिलेला संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना मोबाईल क्रमांक 9529971404 यावर व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करणे बाबत रिप्लाय मिळाला. समोरील व्यक्तीने फिर्यादीस बंगल्याचे फोटो पाठवले फिर्यादीने भाडे विचारले असता त्याने एका रात्रीसाठी नाश्ता व जेवणासह 28000/- भाडे लागेल असे सांगितले तसेच बंगल्याचा पत्ता बंगला क्रमांक ते 33-34 कुणे व्हिलेज खंडाळा लोणावळा महाराष्ट्र 410405 असा सांगितला. त्यानंतर समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांनी आरबीएल बँकेचे खाते क्रमांक 309013336219 वर IMPS ने रुपये 30000/ आणि एसबीआय बँकेचे खाते क्रमांक 20316173741 या खात्यावर रुपये 20000/ इतकी रक्कम भरली व पाठवली .आरोपींनी त्यांना [email protected] हे ह्या इमेल वरून रिसीट पाठवून दिली पुढील पाठपुरावा करण्याकरता नमूद व्हाट्सअप धारकाने मोबाईल क्रमांक 9156168118 व 8390864676 दिला .दि. 24/06/2021 रोजी फिर्यादीस वर नमुद व्हाट्सअँप क्रमांक वरून मेसेज प्राप्त झाला की त्यांनी बुकिंग केलेल्या बंगल्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ब्लास्ट झाल्याने सदर बंगल्यातील एसी टीव्ही फ्रीज हे डॅमेज झाले असल्याने येऊ नका त्यामुळे फिर्यादी यांनी त्याचे पैसे परत मागण्या करता मोबाईल क्रमांक 9156168118 व 8390864676 यावर संपर्क साधला असता दोन्ही क्रमांकानी फिर्यादीचे फोन उचलणे बंद केले. त्यानंतर फिर्यादीने व्हाट्सअप वर संपर्क साधला असता त्याचा कोणताही रिप्लाय मिळाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी लोणावळा येथील त्यांच्या ओळखीच्या इसमास बंगल्याच्या पत्त्यावर जाऊन चौकशी करण्यास सांगितले सांगितले असता Instagram इंस्टाग्राम वरील जाहिराती मधील पत्ता चुकीचा असल्याचे व नमूद पत्त्यावर [email protected] या नावाने कोणताही बंगला नसल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 210/2021 कलम 465, 468, 471, 419, 420, भादवि. सह कलम 66 (क)(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा हा गुन्हा नोंद करण्यात आला.

तपास –
– गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी आरोपीचे मोबाईल क्रमांकाचे लोकेशन प्राप्त केले असता सदर लोकेशन कल्याणी नगर वडगाव शेरी पुणे शहर परिसरात असल्याचे प्राप्त झाले.

पाहिजे आरोपीचा शोध घेणे कामी सपोनि डिगे. व सायबर पोलीस पथक दिनांक 29/06/2021 रोजी रवाना झाले .पुणे शहर येथे जाऊन आरोपीचे मोबाईल क्रमांक Instagram इंस्टाग्राम आयडी व बँक खात्याची प्राप्त माहिती यांचा तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नावे अविनाश रूपकुमार जाधवांनी राहणार ठिकाण फ्लॅट नंबर 102 मित्तल क्रिस्ट बिल्डिंग कल्याणी नगर पुणे व आकाश रूपकुमार जाधवांनी राहणार ठिकाण फ्लॅट नंबर 1104, टॉवर नंबर 3 F रेसीडेन्सी ब्रह्मा सन सिटी वडगाव शेरी पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. नमूद दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना मलबार हिल पोलिस ठाणे येथे आणून दिनांक 30/06/2021अटक करण्यात आली. नमूद अटक आरोपींना माननीय महानगर दंडाधिकारी 40 वे न्यायालय गिरगाव मुंबई यांच्या न्यायालयात हजर केले. नमूद आरोपी सध्या 04/07/2021 रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नमूद आरोपींचा मलबार हिल पोलिस ठाणे मुंबई येथे नोंद इतर गुन्ह्यात ताबा घेण्यात येणार आहे.

आरोपीकडे केलेल्या तपासात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची माहिती

मलबार हिल पो. ठाणे
१ ) गु.र.क्र. :- २१०/ २१ कलम ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२०, ३४ भादवि सह ६६(सी)(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा

२) गु.र.क्र.:- २२०/२१कलम ४२० भादवी कलम ६६(सी)(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा.

डी बी मार्ग पोलीस ठाणे
३) गु.र.क्र. :- 550/2021 U/S 419, 420, IPC R/W 66(C)(D)IT ACT

दादर पोलिस ठाणे
४) गुन्हा नोंद क्रमांक ४५७/२०२१U/s ४२०, ४६८, ४७१,भादवि सह कलम ६६(क)(ड)

*ठाणे नगर पोलीस ठाणे –
५) गु.र.क्र. ११४/२०२१ कलम ४२० भादवी.

मुंलुड पोलीस ठाणे –
६) गु.र.क्र. ७२१/२१ कलम ४२० भादवी ६६ ( डी ) माहिती तंत्रज्ञान कायदा.

गुन्ह्यात वापरलेली बँक खाती

1) SBI Bank A/c no. 20316179741

2) Kotak Mahindra Bank A/c no. 7145660007

3) Kotak Mahindra Bank A/c no. 3211857159

4) RBL Bank A/c no. 309013336219

5) Standard Chartered Bank A/c no. 27011865730

6) HDFC Bank A/c no. 59143333377777

गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक

9656168118
9529971404
8390864676
8169833658

गुन्ह्यात वापरलेले IMEI क्रमांक

35530108203268
35125094427864

35194123995835
35159511857936

35377808923593
35484709683937

91110605014228

Instagram Fake Account – lonavala_villa77

Emaili ID – [email protected]

नमूद आरोपी यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याने मुंबई व महाराष्ट्रात अनेक जणांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

– सदरचा गुन्हा पोनि अमोल टमके. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डिगे, पो.शि. १११३४९/धारवाडकर, पो.शि. १११३८५/कदम, पो.शि. ०९३४४४/संदे (सायबर पथक) यांनी उघडकीस आणला असुन, तांत्रिक तपासादरम्यान परि. २ कार्यालय येथील पो.शि. 03505 / मुन्ना सिंग यांनी मदत पुरविली आहे.

तरी कोणाकडे अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्यास नमूद आरोपी यांचा ताबा घेण्यात यावा ही विनंती.

तसेच नमूद आरोपींसंदर्भात अथवा गुन्ह्या विषयी काही माहिती हवी असल्यास सपोनि डिगे. यांस संपर्क करण्यात यावा ही विनंती.

 

( सुर्यकांत बांगर )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
मलबार हिल पोलीस ठाणे,
मुंबई

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
social worker India - Dr. Gail Omvhet social scientist
social worker India – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट
error: Content is protected !!
%d bloggers like this: