interview tips for freshers
interview tips for freshers
interview tips for freshers

interview tips for freshers – नोकरी शोध मोहिमेत पहिली पायरी बायो-डेटा

interview tips for freshers - नोकरी शोध मोहिमेत पहिली पायरी बायो-डेटा

interview tips for freshers – नोकरी शोध

मोहिमेत पहिली पायरी बायो-डेटा

 

 

 

interview tips for freshers – नोकरी शोध

मोहिमेत पहिली पायरी बायो-डेटा

 

 

 

 

प्रभावी बायो-डेटा :


नोकरी शोध मोहिमेत पहिली पायरी असते आपला बायो-डेटा.प्रभावी बायो-डेटा

आपल्यासाठी नक्कीच मुलाखतीचे दरवाजे उघडू शकतो. कॉर्पोरेट मंत्रा मध्ये बायो-डेटाबद्दल

जरा सविस्तरपणे जाणून घेऊया.

जेव्हा आपण बायो-डेटा सॉफ्ट कॉपी म्हणजे संगणकावर बनवणार असू तेव्हा आपलं स्वतःचं

नाव फाईल नाव म्हणून दया आणि कोणत्या महिन्यात,वर्षी तुम्ही सुधारित(updated)केलाय

ते कंसात लिहा .उदा : Nisha_Roy (Sep_2019).तुम्ही वर्ड /PDF कोणतही स्वरूप(Format )

वापरू शकता .बायो-डेटा हार्ड कॉपी साठी तुम्ही चांगल्या प्रतीच्या कागदावर प्रिंट घेऊ शकता.


interview tips for freshers – खूप जण शीर्षक म्हणून मोठ्या अक्षरात रेझुमे /CV /

बायो-डेटा लिहतात. त्याची खरंच गरज नसते. सुरवात आपण आपलं नाव ,पूर्ण पत्ता ,

ई-मेल आयडी .शक्यतो स्वतःचा मोबाइल नंबर ,जो चालू आहे अशी करावी. बऱ्याचदा

कंपनीची HR टीम जेव्हा मुलाखतीसाठी कॉल करते,तेव्हा हा नंबर अस्तित्वात नाही असा

संदेश येतो. मोबाइल फोन हे सर्वात जलद संवादाचे माध्यम असल्यामुळे आपण त्याच

महत्व जाणलं पाहिजे. आपला ई-मेल आयडी सुध्दा व्यावसायिक असावा .शक्यतो

आपलं नाव आणि आडनाव येईल असं. उदा : [email protected]

आपला उद्देश (objective) हा १-२ ओळीत थोडक्यात सांगणे महत्वाचे. उद्देश हे तुमचं

करिअर ध्येय ( career goals)सांगते.ह्यात तुम्ही कोणत्या प्रकारचं काम बघताय,हुद्दा

(JobPosition/Title )आणि महत्वाचं म्हणजे तुमची कौशल्ये ह्याबद्दल माहिती देणं अपेक्षित आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com


शैक्षणिक पात्रता (educational qualification)ह्यात टेबल स्वरूपात कोणती परीक्षा ,

कोणते विद्यालय, महाविद्यालय ,विद्यापीठ,उत्तीर्ण वर्ष आणि मिळालेले गुण व्यवस्थितपणे देणे

जरुरी आहे. इतर पात्रता मध्ये संगणक ज्ञान आणि काही केलेले अभ्यासक्रम ह्याबद्दल लिहू शकता.

इतर माहिती मध्ये जेन्डर (male/female),आपली जन्म तारीख,वैवाहिक स्थिती (विवाहित /अविवाहित)

ह्याबद्दल लिहावं. धर्म (Religion),राष्ट्रीयत्व (Nationality) आणि जात (Caste) ह्याबद्दल बायो-डेटातर

लिहावं कि नाही हे प्रत्येकाच्या स्वतःच्या इच्छेवर आहे.आपले छंद /आवड हे सुध्दा ऐच्छिक आहे. आपल्याला

येणाऱ्या भाषा मात्र नमूद कराव्यात. अनुभव (Experience) सुद्धा आताच्या कामापासून सुरवात करून मग

शेवटी पहिली नोकरी अश्या स्वरूपात द्यावा. त्यात आपला हुद्दा ,कामाचं स्वरूप , जबाबदाऱ्या ह्याबद्दल माहिती

देणं महत्वाचं. संदर्भ (Reference) तुम्ही प्रत्यक्ष मुलाखती वेळेस देऊ शकता. फोटो हा सुरवातीलाच attach

करावा.जो पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचा असावा. तुमचे पिकनिकचे फोटो पाहण्यात नोकरी देणारयाला

बिलकुल रस नसतो. आपल्याला मुलाखतीला बोलवण्या आधीच येणारे अडथळे कसे टाळावे याचा बायो-डेटा

बनवताना नक्कीच विचार करायाला हवा. रंगीबेरंगी fonts, highlight,वेगळेवेगळे चिन्ह ह्याचा वापर टाळण

उत्तम. पूर्ण बायो-डेटा बुलेट्स च्या स्वरूपात वाचणं त्रासदायक ठरू शकत,म्हणून शक्य तिथेचं बुलेट्स

वापराव्यात . आपली पूर्ण आणि खरी माहिती देणं जरुरी आहे.

interview tips for freshers – बायो-डेटा आपण English मध्ये बनवत असल्यामुळे सर्वात शेवटी

Spelling चेक करायला विसरू नका .१ /२ पानांचा बायो-डेटा तुम्ही तुमच्या आवडीने डिझाइन करू शकता.

Simple ,Short & Smart बायो-डेटा जो एक ठसा उमटवेल तो बनवणं आता नक्कीच तुमच्या हातात आहे.

 

मेघना धर्मेश
Success Mantra

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
socialism in India
socialism in India – ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते लेखक पत्रकार
error: Content is protected !!
%d bloggers like this: