job or business
job or business
job or business

job or business – नोकरी का व्यवसाय ? असा निवडा मार्ग

job or business - नोकरी का व्यवसाय ? असा निवडा मार्ग

job or business – नोकरी का व्यवसाय ? असा निवडा मार्ग

 

job or business – नोकरी का व्यवसाय ? असा निवडा मार्ग

 

 

 

 

ही लेखमाला चालू झाली त्यानंतर शंका म्हणा किंवा प्रश्न असतील तसे वाचकाचे फोन चालू झाले .

एका काकांचा जळगावहून फोन आला .मला म्हणाले ,माझ्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केलंय ,आमचं

स्वतःचं हॉटेल आहे. तुम्हाला काय वाटतं त्याने घरचं हॉटेल सांभाळावं की कुठे नोकरी करावी ??

खरंतर job or business नोकरी की व्यवसाय ह्याचं उत्तरं हेचं करा असं असू शकत नाही . प्रत्येक

गोष्टीच्या दोन बाजू असतात आणि प्रत्येकाचे असे फायदे /तोटे पण असतात .आपल्याला काय हवं आहे ,

आपले स्वभाव वैशीष्ट्य ,प्रवृत्ती ,आपली मानसिकता कशी आहे ?आपली शैक्षणिक ,आर्थिक पार्श्वभूमी काय आहे ?

आपले स्वतःचे आर्थिक प्राधान्य ,ध्येय काय आहे ?? ह्या साऱ्या गोष्टींचा नीट विचार करून , निर्णय घेणे जरुरी आहे.

बऱ्याच जणांना वाटतं की व्यवसाय म्हणजे आपण आपल्या मर्जीचे मालिक ! हवं तेव्हा ऑफिसला जाऊ शकतो .

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

हवं तेव्हा सुट्टी घेऊ शकतो. कुणाच्या ऑर्डर्स घ्यावा लागणार नाही, deadlines नाहीत.आपणचं आपले बॉस !

मिळणारा नफा/मोबदला म्हणजे पूर्ण आपलीच मिळकत . ही झाली जमेची बाजू आता दुसरी बाजू अशी की

व्यवसाय म्हटलं तर चढ-उतार आलेचं .कधी नफा तर कधी नुकसान सुद्धा सहन करावं लागते .आलेले पैसे

परत व्यवसायाच्या वाढी साठी गुंतवावे लागतात. गरज पडली तर कर्ज घ्यावे लागते . नियमित पगारासारखी

मिळकत नसते .कधी काम असेल तर सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करावं लागतं .आपला व्यवसाय ही पूर्णपणे

आपली जबाबदारी असल्यामुळे आपला पूर्ण फोकस व्यवसायावर ठेवावा लागतो. job or business व्यवसायात

तुम्हाला धोका पत्करावा लागतो. ,निर्णयाची पूर्ण जबाबदारी तुमचीच असते मग परिणाम चांगले/वाईट काही का असेना ?

उद्योग करणाऱ्यांमध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती ,धोका पत्करण्याची तयारी ,स्व-शिस्त ,आत्मविश्वास , दृढनिश्चय,

लोकांना सोबत घेऊन जाण्याची कला ,समस्यांना सकारत्मकतेने सामोरे जाण्याची वृत्ती ,नवीन गोष्टी आत्मसात

करण्याचे कसब,पैश्याचे योग्य निर्णय ,वेळेचे व्यवस्थापन ,भविष्याची दुरदृष्टी ,बदलांना सकारात्मकतेने

स्वीकारण्याची मानसिकता अश्या बऱ्याच गुणांची गरज असते. काही गुण उपजत असू शकतात तर

काही training, अनुभवाने शिकू शिकतात. आता आपण नोकरीचा विचार केला तर जमेची बाजू अशी

तुम्हाला कामाच्या वेळेत ऑफिसमध्येचं काम करावं लागत. कंपनीच्या नफ्या/तोट्याशी तसं म्हटलं तर थेट

तुमचा संबंध नसतो .दर महिन्याला मिळणार पगार निश्चित असतो. त्याव्यतिरिक्त मिळणारे बाकी फायदे

सुद्धा असतात उदारणार्थ -Medi-claim, बोनस वगैरे . शिवाय हक्काच्या सुट्ट्या सुद्धा मिळतात. जर

तुमच्यात क्षमता असेल तर तुम्ही नक्कीच वरच्या पदापर्यंत पोहचू शकता . कुठे तरी एक स्थेर्य सुद्धा अनुभवू

शकतात. तुमच्यात पुढाकार घेण्याची कुवत , सांघिक वृत्ती असेल तर कॉर्पोरेट क्षेत्र तुम्हाला नवीन आव्हानं

द्यायला सज्ज असतं. आता आपण काही न आवडणाऱ्या नोकरीच्या गोष्टी बघितल्या तर बऱ्याच जणांना ऑर्डर्स घेणे,

रिपोर्ट करणे ,निर्णय स्वातंत्र्य नसणे ह्या वाटतात . कायम बॉसच्या दबावाखाली काम करणे बऱ्याचदा त्रासदायक

ठरू शकतं .अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी वावं नसणे , कामाचे समाधान

(job satisfaction ) नसणं अश्या बऱ्याच गोष्टी नोकरीसाठी नकोश्या ठरू शकतात. म्हणजेचं आपली

आवड , गुण कौशल्य , स्वभाव ह्या सर्वांची सांगड घालून नोकरी का व्यवसाय ह्या प्रश्नाचं उत्तरं आपल्याला

आपल्याकडेचं मिळेल ,नाही का ??

 

 

 


मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]
 

 

postboxindia.com
www.postboxindia.com

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Peshwa empire
Peshwa empire पेशवाईतील स्त्रिया – गोपिका बाई.. शापीत पेशवीण
error: Content is protected !!
%d bloggers like this: