Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

kalyan railway station – कल्याण रेल्वे स्थानक गुन्हेगारांस अटक

1 Mins read

kalyan railway station – कल्याण रेल्वे

स्थानक गुन्हेगारांस अटक

 

 

kalyan railway station – मुंबई ठाणे युनिट कर पथकाकडून शिताफिने अटक

 

 

कल्याण रेल्वे स्थानकात खून करुन पसार झालेल्या गुन्हेगारांस गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई ठाणे युनिट
कर पथकाकडून शिताफिने अटक.

दि. ०३/०७/२०२१ रोजी kalyan railway station कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क १ चे सीएसएमटी कडील बाजूचे टोकास
अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी धारदार हात्याराने बळीताचे मानेवर वार करुन जिवे ठार
मारलेबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ४८७/२०२१ कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा
नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य पाहता गुन्हयाचा समांतर तपास श्री कैसर खलिद, मा. पोलीस आयुक्त
लोहमार्ग मुंबई व एम एम मकानदार मा. पोलीस उप आयुक्त, मध्य परीमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे सुचना
व आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई अंतर्गत वेगवेगळे पथक तपास करीत होते. प्राप्त सीसीटीव्ही
फुटेज व माहितीच्या आधारे ठाणे युनिट क र चे पोलीस पथक देखील अहोरात्र गुन्हयातील आरोपीचा खास
बातमीदारांचे मार्फतीने तसेच प्रभावी गस्त करून मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कसारा, सीएसएमटी
ते खोपोली तसेच सीएसएमटी ते पनवेल, तसेच इगतपुरी, नाशिक, भुसावळ, त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे
मार्गावर चर्चगेट ते बोर्डी रेल्वे स्टेशन तसेच शहर हद्दीत शोध घेत होते.
दि. १२/०७/२०२१ रोजी ठाणे युनिट क र चे तपास पथक दादर ते सीएसएमटी रेल्वे स्थानक व
शहर हद्दीतील लगतच्या परीसरांत आरोपीचा शोध घेत असतांना मश्जिद बंदर रेल्वे स्थानकाबाहेरील
पश्चिमेकडील बाजूस गुन्हयातील सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपीच्या देहबोलीशी मिळता जूळत्या
वर्णनाचा एक इसम तपास पथकास दिसून आला. त्यावेळी तपास पथकाने सदर इसमांस ताब्यात घेवून
त्याचेकडे गुन्हयाचे अनूषंगाने व्यवसायिक कौशल्य वापरुन युक्ती प्रयुक्तीने तपास करता, त्याने बळीत
इसमाचा पैशाच्या कारणावरुन वाद झाल्याने मानेवर तीक्ष्ण हात्याराने वार करुन खून केल्याचे निष्पन्न
झाले आहे.
सदरची कामगिरी श्री कैसर खलिद, मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व श्री. एम. एम.
मकानदार, मा. पोलीस उप आयुक्त, मध्य परीमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे सुचनां व आदेशाप्रमाणे श्री
गजेंद्र पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांचेसह ठाणे युनिट क र चे पोलीस उप
निरीक्षक अशोक होळकर, मसहापोउपनिरीक्षक मांजरेकर, पोहवा/अतूल साळवी, अतूल थायडे, संदिप
गायकवाड, मिलींद भोजने, किशोर करपे, रविंद्र दरेकर, पोना/राजेश कोळशे, अमित बडेकर यांनी केली
आहे.

 

Anajni mishra reports

Leave a Reply

error: Content is protected !!