Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

karad maharashtra – माननीय कै.नामदार श्री.यशवंतराव मोहिते

1 Mins read

karad maharashtra – नामदार श्री.यशवंतराव मोहिते

 

karad maharashtra – माननीय कै.नामदार

श्री.यशवंतराव मोहिते यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

18/8/2021,

सातारा जिल्हयातील कर्‍हाड जवळील रेठरे बुद्रुक येथे ७ नोव्हेंबर १९२० रोजी यशवंतराव मोहिते यांचा

पुरोगामी विचारसरणीच्या वतनदार शेतकरी कुटुंबात जन्म झाला. विज्ञान शाखेचे इन्टरपर्यंतचे महाविद्यालयी

न शिक्षण घेतले होते. मात्र बंडखोर विचारांचा प्रभाव असलेल्या यशवंतरावांनी विद्धार्थी दशेपासूनच सामाजिक

चळवळीत भाग घेतला. मार्क्सवादी विचारांनी भारावलेले यशवंतराव पुढे शेतकरी-कामगार पक्षात (शे.का.प)

सामील झाले. राज्य विधानसभेच्या १९५२ ,१९५७ साली झालेल्या निवडणुकीत ते शेकाप तर्फे निवडून आले होते.

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या आगेमागे त्यांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला ,आणि karad maharashtra महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या

पहिल्या मंत्रिमंडळात ते गृहखात्याचे उपमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी वित्त, सहकार, परिवहन, कृषी आदी खात्यांची

धुरा सांभाळली. कोयना धरणाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. गाव तेथे एस.टी’ ही घोषणा अंमलात

 

आणून त्यांनी बससेवेचे जाळे राज्यभर पसरवले.महाराष्ट्राचे कृषी, सहकार, वित्त मंत्री म्हणून त्यांनी सामान्य

नागरिकांच्या हिताचे अनेक कायदे आणि योजना अंमलात आणल्या. ते उत्तम संसदपटू होते. काही काळ ते

लोकसभा सदस्यही होते. महाराष्ट्राच्या सर्व समस्यांची त्यांना उत्तम जाण होती, आणि यावरची त्यांची भाषणेही खूपच परखड होती.

मुंबईसाठी घरदुरुस्ती मंडळ, झोपडपट्टी निर्मुलन कायदा आणि शेतकरी हिताची कापूस एकाधिकार खरेदी

योजना म्हणजे यशवंतराव मोहिते यांचे स्मारकच मानावे लागेल.

एकदा ईंदिरा गांधी यांनी यशवंतराव मोहिते यांना साांगितले, “तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा”.

वास्तविक मोहित्यांना मुख्यमंत्री पदावर बसवून यशवंतराव चव्हाण यांना शह दयायचा इंदिरा गांधी यांचा हेतू होता.

मात्र शेतकरी कामगार पक्षात जडणघडण झालेले यशवंतराव मोहिते इंदिरा गांधींना म्हणाले ,

 

“महाराष्ट्रात एकदा धनाजी जाधवराव व संताजी घोरपडे
यांची दुही झाली.त्याचे परिणाम सगळ्या मराठी मुलुखाला भोगावे लागले. आता तसे होणार नाही.”
पक्षांकडून म्हणजे खुद्द इंदिरा गांधी यांच्याकडून
आलेली ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते मात्र एकमेव नेते होते.
गावाच्या चार पावले पुढे असलेल्या या घराला शिक्षणाचे महत्व समजले असल्याने त्यांच्या
वडिलांनी त्याना चांगलं शिक्षण दिल.अगदी त्याकाळातसुद्धा यशवंतराव मोहिते शिकायला कोल्हापूरला होते. याच काळात त्यांच्यातला राजकीय सामाजिक कार्यकर्ता जागा झाला. तालीम संघाचे ते अध्यक्ष झाले.त्यासोबत त्यांनी कोल्हापुरात द्रष्ट्या नावाचे वृतपत्र सुरू केले.

यशवंतराव मोहिते यांना लोक भाऊ म्हणायचे
ते शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत अग्रभागी

. राहिले. याच पक्षाकडून प्रथम त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवून विजयी झाले. विधिमंडळात अभ्यासू भाषणे करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा दबदबा तयार झाला. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा यशवंतराव मोहिते यांच्यावर होता.
कार्ल मार्क्स, महात्मा फुले यांच्या विचारावर त्यांची निष्ठा होती. त्याच भूमिकेतून ते आपली भूमिका मांडत होते. सरकारला धारेवर धरणारा आमदार अशी त्यांची काही कालावधीत ओळख झाली.
काँग्रेस पक्ष बळकट व्हावा असा प्रयत्न तत्कालीन काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण करत होते, त्याचवेळी त्यांच्याच शेजारच्या मतदारसंघात मात्र यशवंराव मोहिते हे विरोधी पक्षाचे आमदार होते. राज्यभर काँग्रेस मजबूत असताना karad maharashtra कराडच्या राजकारणात मात्र काँग्रेस आणि शेकाप बरोबरीत होते.

 

मग यशवंतराव चव्हाण यांनी पंडित नेहरूंच्या मार्फत मोहिते यांना आग्रह करून काँग्रेसमध्ये नेले.

काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांना गृह, कृषी गृह निर्माण, राज्य परिवहन ,अन्न नागरी पुरवठा, सहकार, वित्त व नियोजन या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मुंबई अग्निशामक दल व होमगार्डचे एकत्रीकरण, तसेच फेररचना, लष्कर भरती सैनिक शाळांची निर्मिती केली. गृहनिर्माण खाते असताना त्यांनी मुंबई गृहनिर्माण व घर दुरुस्ती कायदा तसेच गलिच्छ वस्ती सुधारणा कायदा केला. एसटी महामंडळाची फेररचना करून त्यास नवे रूप दिले. साखर उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी आयुक्तालय, सहकार न्यायालय, संशोधन व कापूस खरेदी केंद्र यांचे जाळे तयार केले. यशवंतराव मोहिते यांनी राज्यामध्ये सत्ताकारणात महत्त्वाची पदे भूषवली. महाराष्ट्राचा विकास सामाजिक परिवर्तन करण्यासाठी केला. प्रामुख्याने ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राच्या विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सहकाराच्या माध्यमातून जाळे निर्माण करण्यासाठी श्वेतपत्रिका व कायद्यात दुरुस्ती केली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस एकाधिकार योजना राबवली . महत्वाच्या खात्यात मंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली . त्यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाची स्तुती पंडित नेहरू यांच्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या इंदिरा गांधी यांनीही केली होती.
यशवंतराव मोहिते हे भारती विद्यापीठ पुणे तह्यात अध्यक्ष होते.१९८५ साली ते राजकीय जीवनातून निवृत्त झाले. सर्व सामान्य शेतकर्यांसारखे ऊर्वरित आयुष्य जगले.२२ आॅगस्ट २००९ रोजी भाऊ यांचे रेठरे बुद्रुक येथे निधन झाले. एक द्रष्टा नेता महाराष्ट्राने गमावला.
” असा दृष्टा नेता पुन्हा होणे नाही “

 

अशा या थोर विचारवंतास स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

 

Leave a Reply

error: Content is protected !!