kolhapur police - local crime detection team kolhapur police performance
kolhapur police - local crime detection team kolhapur police performance
kolhapur police - local crime detection team kolhapur police performance

kolhapur police – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथक इचलकरंजी यांची कामगिरी

kolhapur police - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथक इचलकरंजी यांची कामगिरी

kolhapur police – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथक इचलकरंजी यांची कामगिरी

kolhapur police – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथक इचलकरंजी यांची कामगिरी

 

 

 

तारीख – २४.०९.२०२१

पोलीस रेकॉर्डवरील आंतर राज्यीय घरफोडी चोरी करणारे ०१ गुन्हेगारांसह दोन इसमांना पकडुन त्यांचेकडुन
एकूण ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून सोन्याचांदीचे दागीने व इतर साहित्य असा एकूण
१,०५,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा kolhapur police कोल्हापूर पथक इचलकरंजी यांची कामगिरी
मा.पोलीस अधीक्षक, श्री.शैलेश बलकवडे यांनी सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या
घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या
अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद जाधव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर सह इचलकरंजी यांची
तपास पथके तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हयासह इतर मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी विशेष
मोहिम राबविण्यात आली.
मा.पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर kolhapur police यांनी दिले सुचनांप्रमाणे तपास करुन मालाविरुध्दचे घरफोडी चोरीचे
गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी वेगवेगळी तपास
पथके तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने सुचना दिल्या त्या प्रमाणे प्रयत्न चालू असताना
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर पथक इचलकरंजी कडील पोलीस अमंलदार महेश खोत यांना त्यांचे गोपनीय
विश्वासू बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम मेहबुब सनदी, रा.अथणी व
त्याचा साथीदार असे दोघेजण चोरीचे दागीने विक्री करणेकरीता कोंडीग्रे फाटा येथील हॉटेल कॉर्नरचे समोर येणार
आहे अशी माहिती मिळालेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा इचलकरंजी येथील सहा पोलीस निरीक्षक किरण भोसले
व पोलीस अमंलदार महेश खोत, अमर शिरढोणे, खंडेराव कोळी, बबलू शिंदे, संभाजी भोसले, शहनाज कनवाडे,
रणजित पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, संजय इंगवले, सुरज चव्हाण, फिरोज बेग व आयुब गडकरी यांनी
कोंडीग्रे फाटा येथील हॉटेल कॉर्नरचे आसपास सापळा लावून इसम नामे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम मेहबुब
सनदी, व.व.२८, सध्या रा. खोतवाडी,ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर मुळ गांव अथणी,ता. अथणी, जि.बेळगांव
कर्नाटक हा व त्याचा साथीदार इजाज मेहमुद्दीन मकानदार, व.व.३२, रा. संगमनगर, सिध्दीविनायक सायझींग
समोर तारदाळ, ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर यांना पकडले आहे. त्यांचे कब्जात ३१.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व
१७२ ग्रम वजनाचे चांदीचे दागीने व इतर साहित्य असा एकूण १,०५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला
आहे.
तसेच आरोपी यांनी चोरलेले सोन्याचे दागीन्यापैकी ५५ ग्रॅम वजनाचे अंदाजे १,५०,०००/- रुपये किंमतीचे
सोन्याचे दागीने रामदुर्ग कर्नाटक येथील आय सी आय बँक व मनप्पुरम गोल्ड लोन येथे तारण ठेवलेले असून सदरचे
दागीने जप्त करणेची कार्यवाही चालू आहे. आरोपी अस्लम मेहबुब सनदी, व.व. २८,सध्या रा. खोतवाडी,ता.
हातकणंगले, जि.कोल्हापूर मुळ गांव अथणी,ता. अथणी, जि बेळगांव कर्नाटक हा कर्नाटक पोलीस रेकॉर्डवरील
दिवसा घरफोडी चोरी करणारा गुन्हेगार असून त्याचे विरुध्द कर्नाटक राज्यात अथणी,कागवाड, चिक्कोडी,गांधी
चौक व विजापूर या पोलीस ठाणेकडे दिवसा घरफोडी चोरीचे एकूण १६गुन्हे दाखल आहेत.
आरोपी यांचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागीन्याबाबत त्यांचे सखोल तपास केला असता आरोपीत
यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतून दानोळी, ता.शिरोळ येथुन एक व शहापूर पोलीस ठाणे हद्दीतून संगमनगर व
आर के नगर अशा दोन ठिकाणी असे एकूण तीन ठिकाणी घरफोडी चोरी केलेची कबुली दिली आहे. नमुद आरोपीत
यांना पुढील कारवाई करीता जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे रिपोर्टाव्दारे हजर केलेले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, श्री.शैलेश बलकवडे साो, अपर पोलीस अधीक्षक, श्री.तिरूपती काकडे
सो यांचे मार्गदर्शनाखाली kolhapur police स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, प्रमोद जाधव,सहा पोलीस निरीक्षक
किरण भोसले व पोलीस अमंलदार महेश खोत, अमर शिरढोणे, खंडेराव कोळी, बबलू शिंदे, संभाजी भोसले, शहनाज
कनवाडे, रणजित पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, संजय इंगवले, सुरज चव्हाण, फिरोज बेग,आयुब गडकरी,
संजय पडवळ,यशवंत कुंभार व खरात यांनी तसेच सायबर पोलीस ठाणेकडील अमर वासुदेव व सचिन बेंडखळे यांनी
केली आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

अंजनी मिश्रा

Advertisement

More Stories
Crime branch Police
crime branch police माटुंगा पोलिसांच्या नेटवर्क ची जबरदस्त कामगिरी
error: Content is protected !!
%d bloggers like this: