Krantisinh nana Patil
Krantisinh nana Patil
Krantisinh nana Patil

Krantisinh nana Patil – क्रांतीसिंह नाना पाटील

Krantisinh nana Patil - क्रांतीसिंह नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

Krantisinh nana Patil – क्रांतीसिंह नाना पाटील

 

 

Krantisinh nana Patil – क्रांतीसिंह नाना पाटील यांना जन्मदिना निमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

 

2/8/2021

नाना पाटील थोर समाजसुधारक, ‘ पत्री सरकार ‘चे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते.

महाराष्ट्रातील एक देशभक्त Krantisinh nana Patil . झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी

सांगली जिल्ह्यातील येडेमचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते.

नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६). यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली.


Buy Corel Painter 2021

पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा,

हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.

१९३० साली म. गांधींनी सुरू केलेल्या असहकारच्या चळवळीत ते सहभागी झाले. पुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर ते निवडून आले.

१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात भूमिगत राहून कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या नुसार सातारा जिल्ह्यात काही

सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले व ब्रिटिश शासन बंद पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला

सरकारी बँका, पोस्ट व तारखाते, पोलीस ठाणी यांवर छापे घातले. सरकारतर्फे हेरगिरी करणाऱ्यास तसेच जबरीने सारा

वसूल करणाऱ्या पाटील-तलाठ्यांस पायांवर काठीचे तडाके मारण्यात येत आणि पत्रेही ठोकण्यात येत. यावरून त्यांच्या या प्रतिसरकारला

पत्रीसरकार हे नाव रूढ झाले होते. ब्रिटिश सरकारने नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

 


या आंदोलनकाळातच नानांनी ग्रामराज्याची स्थापना करण्याचे कार्य हाती घेतले. खेड्यातील परकी सत्ता नामशेष करून त्यांना स्वयंपूर्ण बनवावे

व त्यांचा सर्व कारभार ग्रामस्थांच्या हाती द्यावा, अशी त्यांची ग्रामराज्याची कल्पना होती. लोकनियुक्त पंचांनी खेड्याचा कारभार पहावा

व आवश्यक वाटल्यास भूमिगतांनी त्यांना मदत करावी, अशी एकूण ग्रामराज्याची कार्यपद्धती होती. कराड, वाळवे, तासगाव इ. ठिकाणी पंचसभा स्थापन झाल्या.

न्यायदान समित्याही स्थापन करण्यात आल्या. कोरेगाव, पाटण, सातारा इ, गावी, वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे गाळली जाणारी हातभट्टीची दारू चार महिन्यांत क्रांतिकारकांनी बंद केली.

काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाल्यावर (१९४६) त्यांच्यावरील पकड वॉरंट रद्द करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला

व ते शेतकरी कामगार पक्षात गेले.अखेरच्या दिवसांत त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला व कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर ते उत्तर सातारा व बीड

येथून दोन वेळा लोकसभेवर निवडून आले. (१९५७-६७). त्यांनी भारतीय सांस्कृतिक मंडळातून रशियाचा दौरा केला.

Krantisinh nana Patil नाना पाटील हे प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. पैलवानाच्या आविर्भावात अत्यंत रांगड्या भाषेत ग्रामीण दाखले देऊन आपला विषय ठामपणे प्रतिपादीत.

अस्पश्यतेला त्यांचा विरोध होता. अज्ञानी, दुर्बल घटकांचे त्यांनी खंबीरपणे नेतृत्व केले. ते महात्मा गांधीचे अनुयायी होते; तथापि सशस्त्र क्रांतिमार्गांने ब्रिटिश

सत्ता उलथून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जनसेवा व देशसेवा हे त्यांचे जीवितकार्य होते. सत्यशोधक चळवळ, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम,

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या सर्वांना महाराष्ट्रात नाना पाटलांचे नेतृत्व लाभले.मुंबई येथील शिवाजीपार्क येथे जीवन गौरव समारंभात आचार्य प्र.के.अत्रे

यांनी नाना पाटील यांना” क्रांतीसिंह “ही पदवी बहाल केली.त्यांच्या बद्दल अत्रे म्हणत.

क्रांतीसिंह नाना पाटील
भारताचा क्रांतिसिंह तू
शिवबाचे देणे
जागृत केला महाराष्ट्र तू
सिंह गर्जनेन !

नाना पाटील यांना एकच कन्या होत्या. त्यांचे नाव हौसाबाई. नाना पाटलांच्या विषयीच्या

आठवणी सांगताना हौसाबाई सांगतात, “सांगली जिल्ह्यातल्या भवानी नगर इथल्या ब्रिटीशांच्या पोलीस ठाण्यातील शस्त्र लुटण्याची

जबाबदारी माझ्यावर सोपण्यात आली होती. दिवसाढवळया शस्त्र लुटणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं.

पण मला हे काम फत्ते करण्याची जबाबदारी दिली होती.

जिल्ह्यातल्या भवानी नगर इथल्या ब्रिटीशांच्या पोलीस ठाण्यातील शस्त्र लुटायची होती. दिवसाढवळया शस्त्र लुटणं म्हणजे वाघाच्या

जबड्यात हात घालण्यासारखंच होतं. पण मला हे काम फत्ते करायचं होतं.


Corel PDF Fusion

बरोबरीच्या सहकार्यांना कुणी काय करावयाचे

याची जबाबदारी समजावून सांगून मी माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांना घेतलं आणि पोलीस ठाण्याच्या आवारात गेले.

माझ्या सहकार्याने माझा भाऊ असल्याचे नाटक करत मी सासरी नांदायला जात नाही म्हणून मला मारहाण करायला सुरुवात केली.

More Info - Xpack

. माझा भाऊ गालावर चापटी, पाठीत धपाटे घालत मला नांदायला जा म्हणून सांगत होता.

आमच्या दोघांच्या वादावादीचं नाट्य पोलीस ठाण्याच्या समोर चांगलंच रंगात आलं. शेवटी मी काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर

माझ्या भावानं रागानं माझ्या डोक्यात मारण्यासाठी म्हणून मोठा दगड उचचला अन् तेवढ्यात आतले दोन पोलीस त्याला

थांबवण्यासाठी बाहेर पळत आले. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे बाकीचे सहकारी तेथील बंदुका आणि काडतुसं घेऊन फरार झाले.

मात्र तरीसुद्धा हा कट आम्ही रचला होता हे पोलिसांच्या लक्षात आलं नाही. अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली

अशा या थोर Krantisinh nana Patil क्रांतीसिंह नाना पाटील यांचे ६ डिसेंबर १९७६ रोजी सांगली येथे निधन झाले.

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

 

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Great womens of Indian history
Great womens of Indian history – कर्तुत्ववान महिलांची नावे
error: Content is protected !!
%d bloggers like this: