Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

lakhuji jadhav – विठोजी भोसले यांचे पुत्र संभाजी भोसले

1 Mins read

lakhuji jadhav – विठोजी भोसले यांचे पुत्र संभाजी भोसले

 

 

lakhuji jadhav – राजे लखुजीराव जाधवराव यांचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव व विठोजी भोसले यांचे

पुत्र संभाजी भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता. दरबाराचे काम संपवून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे

सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला. हत्तीवरती माहुत होता. तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता.

पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना,

त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना.कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून

दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजीचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजीला खुप झोंबला.

दत्ताजी हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले. स्वतः दत्ताजी हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळे केली.

खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले. यावेळी मालोजीराजांचे बंधू विठोजी व

त्यांची दोन मुले संभाजी व खेळोजी खंडागळे यांच्या मदतीला धावून आले. दत्ताजी जाधवरावांनी रागाच्या भरात आपला मोर्चा संभाजी भोसले यांच्याकडे वळवला.

संभाजी भोसले यांची तलवार सपासप वार करू लागली. दोघांची खडाजंगी लढाई सुरू झाली. खडाखड एकमेकांवर घाव पडू लागले.दत्ताजीची व संभाजी भोसले

या दोघांची झटापट पाहून दोन्ही बाजूची मंडळी हत्यारे घेऊन धावली व एकच झुंबड उडाली. दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली. क्षणभरातच

दत्ताजी जाधवराव व संभाजी भोसले एमेकावर तूटून पडले. हत्तीचे बिथरले बाजूलाच राहिले. जाधवराव व भोसले आपआपसात भांडू लागले .

नाते-गोते विसरून एकमेकावर हत्यार चालवू लागले. हे पाहून एकमेकांचे सैनिकही एकमेकांवर हल्ला करू लागले.

दत्ताजी जाधवरावांनी सैनिकावर प्रतिहल्ला करून अनेक लोकांना ठार मारले. हे पाहून विठोजी भोसले यांचे पुत्र संभाजी यांनी दत्ताजी जाधवराव

यांच्यावर हल्ला करून त्याचे शीर धडावेगळे केले. लखुजी जाधवराव त्यावेळी तेथे नव्हते.त्यांना व शहाजीराजांना हे वृत्त समजताच दोघेही माघारी फिरले.

आपापल्या लोकात मिसळून एकमेकांच्यावर तुटून पडले. आपला पुत्र ठार झाल्याचे पाहून लखुजीराजे यांच्या डोळ्यात अंगार फुलला.भयानक ज्वालामुखी भडकला.

संतापाने जाधवराव लाल झाले. अंगाची लाही लाही झाली. त्यांच्या क्रोधाने अवघ्या दशदिशा शहारल्या.

लखुजीराजे lakhuji jadhav यांना समोर दिसले ते आपले जावई शहाजीराजे. प्रत्यक्ष जावई .लाडक्या लेकीचे कुंकू. कसली माया आणि कसली नाती.

आपल्या पोटच्या गोळ्याचा अंत करणाऱ्याचा नायनाट करण्याकरता त्यांनी आपली तलवार उपसली.त्या रागातच त्यांनी संभाजी भोसले यांना ठार केले.

आपला भाऊ वाचत नाही हे पाहून शहाजीराजे मध्ये पडले. परंतु लखुजी राजाने संतापून जावई शहाजीराजे भोसले यांच्या दंडावर तलवारीने वार केला .

झालेल्या जखमेने दंडातून भळाभळा रक्त वाहू लागले.त्याचा परिणाम होऊन शहाजीराजे बेशुद्ध पडले.शहाजीराजांच्या अंगरक्षकांनी त्यांना उचलून नेले.

या घटनेने सारे आवाक झाले.सगळीकडे हाहाकार उडाला.

निजामशहा मलिक अंबर पर्यंत ही बातमी गेली. तेव्हा त्यांनी मध्ये पडून दोन्ही पक्षाला बाजूला सारून सर्व आपसातील भांडणे मिटवली. lakhuji jadhav

लखुजी जाधवरावांना असे वाटले की निजामशहाने शहाजीराजांची बाजू घेतली.लखुजीराजांनी या गैरसमजातून निजामशाहीचा धिक्कार करून पुन्हा

मोगलांची नोकरी पत्करली. तसेही निजामशहाचा लखुजी राजांवर विश्वास नव्हता. निजामाने लखुजीराजांनाच दोष दिला.लखुजीराजे अत्यंत मुत्सद्दी,

अनुभवी व वजनदार सरदार होते.ते रागापोटी मोगलांकडे निघून गेले. मोगलांनी त्यांना २४,००० स्वारांची मनसब आणि १५,००० घोडेस्वारांचा सरंजाम दिला.

मोगलांना दक्षिणेतील राजकारणात लखुजी राजांसारखा चांगला मोहरा मिळाल्याचा आनंद झाला. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे लखुजीराजे

यांची एकाद्या शहजादा प्रमाणे बडदास्त ठेवली गेली .लखोजीराजे जाधवरावांनाही आपल्या महत्वाकांक्षेची पूर्ती झाल्याचा अनुभव आला.

पण या सर्व प्रकरणात जाधव-भोसले कुटुंबातील दोन जीव विनाकारण बळी गेले .या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

एक तासापूर्वी कोणालाही कल्पना नव्हती की इथे असा काही भयंकर प्रकार घडेल.जाधवराव – भोसले यासाठी लग्नबंधनाने एकत्र आले होते का?

ढाली – तलवारी घेऊन लढण्यासाठी ? आपल्या बायकांच्या कपाळाचे कुंकू रक्षणासाठी का पुसण्यासाठी ? भोसले संभाजीसाठी तर जाधवराव दत्ताजीकरिता

अश्रू ढाळत बसले .जिजाऊंनी कोणासाठी रडावे भावासाठी की दिरासाठी.हत्ती आपसात झुंजले. जिजाऊंचे माहेर कायमचे परके झाले. भोसले जाधव राव कायमचे अंतरले .

परंतु जिजाऊंनी सासर – माहेरच्या भांडणाचा राग आपल्या संसारावर अजिबात होऊ दिला नाही.

खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती. या प्रकरणामुळे जाधव-भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले पण ते फार काळ टिकले नाही.

मलिक अंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र कायमचे दूर केले .मलिक अंबर लखुजीराजे यांचा कायमचा द्वेष करत होता.

शहाजीराजे व लखुजी राजे यांच्यामध्ये कायमचे वितुष्ट निर्माण करण्याचे निजामाचे प्रयत्न होते, पण त्यात त्याला फारसे यश आले नाही.

आता काय म्हणायचे या दैवगतीला ? काय नाव द्यायचे ह्या यादवीला ? दत्ताजींच्या आणि संभाजीराजांच्या राण्यांचे ! दोघींच्याही भाळी वैधव्य आले.

बांगड्या फुटल्या… कशासाठी ? काय कारण ?.. काही नाही ! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला. पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?

आज दत्ताजी जाधवराव व संभाजी भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा

 

 

 
लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!