Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

pu la deshpande books – हसवणूक – P.L Deshpande

1 Mins read

pu la deshpande books – हसवणूक – P.L Deshpande

pu la deshpande books – हसवणूक – P.L Deshpande

 

 

मी दोन चष्मे वापरतो. दोन्ही नंबराचेच, पण एक उन्हाचा आणि दुसरा सावलीचा. रस्त्यात काळा चष्मा आणि घरात गोरा! काळा चष्मा लावून चाललो होतो आणि समोरून एक साहित्यिक मित्र आला. त्याने काही कारण नसताना कडकडून मिठी मारली आणि ती मिठी कोटाच्या वरच्या खिशात कडकडली. पापड मोडावा, तसा चष्मा काचाकाड्यांसकट मोडला. ह्या माझ्या साहित्यिक मित्राला उगीचच मिठ्या मारायची सवय आहे. त्याची एरवीची मिठी मला दोन चहा, खारी बिस्कीटे आणि एक सिगरेटचे पाकीट – माचिससह – एवढ्याला पडते. पण आजची मिठी सेल्स टॅक्स वगळून जवळजवळ चौतीस रूपयांना पडणार होती.

कोटाच्या वरच्या खिशात काचांचा आणि काड्यांचा चुरा झाला होता. आठवत असलेल्या यच्चयावत शिव्या कशाबशा दात दाबून आत अडवून धरल्या होत्या.

“काय वाजलं रे?” मिठीवाला साहित्यिक म्हणाला.
“खिशातला चष्मा फुटला!” मी शिव्यांची गर्दी मागे हटवून हे वाक्य बाहेर काढले.
“हात्त्याच्या! एवढंच ना? दॅट्स आॅलराईट! चल, चहा घेऊ या!”

आता ह्या माणसाला काय म्हणावे, मला कळत नव्हते असे नाही, पण तोंडून येईना. शिवाय, वर “चहा घेऊ या” होतेच. चहा पिताना ती फुर्र करण्याची सवय मला अधिकच जाचू लागली. बाकी माणसाला, दोन ठेवून द्याव्या असे वाटले आणि तो जर त्या ठेवून देऊ शकला नाही, तर त्याची काय विलक्षण गुदमरल्यासारखी अवस्था होते! ज्याच्या तोंडात ठेवायच्या त्याची प्रत्येक गोष्ट संताप आणते. एरवी, माझे-त्याचे संबंध त्याची पुस्तके वाचूनही ठीक होते. पण आता त्याचा आवाज, त्याचे ते गुडघा हलवणे, त्याची ती चापूनचोपून भांग काढण्याची पद्धत, त्याच्या मिशीचा आकार, नाकाजवळची चामखीळ-सगळ्यांचाच राग येऊ लागला होता. चष्मेवाल्याचा चष्मा फुटला की त्याला जे काही होते ते फक्त उपनेत्रवंतच जाणतात. आपण खुळे आहोत असे वाटायला लागते. आपल्या हातून यापुढे एकही कर्त्ृत्वपुर्ण कृत्य घडणार नाही याची खात्री होते. चष्म्याशिवाय हिंडताना सारे जग हे पायांच्या अंगठ्यांंचा सूड घेण्यासाठी घडले आहे, असे ठेचाठेचाला पटते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, चष्म्याशिवाय आपल्याला दिसत नाही हे बिगरचष्मेवाल्यांना पटत नाही. समोर येऊनही तो औट आॅफ फोकस चित्रासारखा दिसतो. चेहऱ्यावर (आपल्या) एक विलक्षण वेंधळेपणा येतो. पण तो उपनेत्र गेल्यामुळे आहे हे पाहणाराच्या ध्यानात येत नाही, आणि “एकूण पहिल्यापासूनच हा जरासा हाच!” अशा स्वरूपाची टीका अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष रीतीने ऐकु येते.

तसा काळ्या काचांचा चष्मा शिल्लक होता. परंतु दिवसभर काळा चष्मा लावून घरातदेखील वावरायला मी काही सिनेमातला हीरो, डिटेक्टिव्ह किंवा खुनी नव्हतो.

 

 

– पु.ल. देशपांडे
हसवणूक

Leave a Reply

error: Content is protected !!