loyal world - chhatrapati loyal chitnis balaji awaji
loyal world - chhatrapati loyal chitnis balaji awaji
loyal world - chhatrapati loyal chitnis balaji awaji

loyal world – छत्रपतींचे स्वामीनिष्ठ चिटणीस बाळाजी आवजी

loyal world - छत्रपतींचे स्वामीनिष्ठ चिटणीस बाळाजी आवजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

loyal world – छत्रपतींचे स्वामीनिष्ठ चिटणीस बाळाजी आवजी

 

loyal world – छत्रपतींचे स्वामीनिष्ठ चिटणीस बाळाजी आवजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 


12/9/2021,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात अनेक विश्वासू सेवक व सहकारी होते. त्यापैकी त्यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज अगदी निष्ठेने पाहणारे त्यांचे सेवक

म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस होय.बाळाजी आवजी चिटणीस मूळचे चित्रे कुटुंबातील असून चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील होते.

बुद्धी ,शौर्य आणि इनाम हे प्रभू ज्ञातीचे वैशिष्ट .श्रीरंग प्रभू चित्रे हे या घराण्याचे मूळ पुरूष.बाळाजींचा जन्म शके १५६९ म्हणजे सन १६४७ रोजी झाला.

बाळाजींचा विवाह १६६५ मध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नाव राजसबाई असून ,त्यांना आवजी, खंडोबल्लाळ व निळोअण्णा ते तीन पुत्र होते.

सन १६४८ मध्ये त्यांना छत्रपती शिवरायांनी चिटणीसीची वस्त्रे दिली व त्यामुळे त्यांचे चित्रे या आडनावाऐवजी चिटणीस हे आडनाव सर्वश्रुत झाले .

शिवरायांचा पत्रव्यवहार; तसेच हिशेब ठेवणे हे काम बाळाजी अगदी चोख करीत. छत्रपतींची गोपनीय कागदपत्रे व खास मसलतीची पत्रे ते लिहित असत.

त्या काळी सर्व पत्रव्यवहार मोडी लिपीतून चालत असे .बाळाजींचे मोडी अक्षर अतिशय सुंदर व वळणदार होते. त्यामुळे इतिहासात ‘ चिटणीसी अक्षर ‘ हे उत्तम मोडी अक्षर मानले जाते.

दरबारात शिवरायांच्या सिंहासना पासून सहाव्या स्थानावर बसण्याचा मान चिटणीसांना होता. चिटणीसांना वतनात सातारा जिल्ह्यातील माजगाव, वडगाव ,बोरगाव व जैतापूर

या ठिकाणी जमिनी दिल्या होत्या. बाळाजी यांनी काही काळ कसबेदाराच्या हाताखाली नोकरी केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात

त्यांनी स्वतः पत्र लिहून महाराजांशी loyal world संबंध जोडले.


हे पत्र शिवरायांना मिळाल्यावर महाराजांनी आपल्या सेवेत बाळाजींना सामील करून घेतले. शिवरायांच्या निधनानंतर संभाजीमहाराजांचाऐवजी

राजाराम महाराज छत्रपती झाले.राजाराम महाराजांना छत्रपती करण्यास बाळाजी आवजी हे जबाबदार आहेत असा आरोप छत्रपती संभाजी महाराजांनी

त्यांच्यावर ठेवला. त्यानंतर बाळाजी आवजी, सोमजी दत्तो ,हिरोजी फर्जंद यांना खोपोली ते पाली या हमरस्त्यावरील पेडली या गावच्या पूर्वेला आंबा नदीच्या

पलीकडे आवंढा नावाचे एक पुरातन गाव असून, या गावातील नायकिणीच्या माळावर मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर १६८१ रोजी हत्तीच्या पायी दिले.

त्यानंतर काही दिवसानी बाळाजी आवजी संभाजी महाराजांच्या स्वप्नात आले व त्यांनी महाराजांना ‘आम्हाला मारले आमचा दोष तो काय ?’ असे विचारले.

त्यामुळे छत्रपतीं संभाजी महाराजांनी नायकिणीच्या माळावर ज्या ठिकाणी बाळाजी आवजींना हत्तीच्या पायी दिले , त्याठिकाणी त्यांची समाधी बांधली.

असे म्हणतात, की बाळाजी त्यानंतर महाराणी येसूबाई यांच्या स्वप्नात आले व म्हणाले, यात तुमचा दोष नाही ; पण आमच्या समाधीजवळ कायम दिवा लावावा.’

तेव्हापासून आजपर्यंत सुमारे ३४० वर्ष बाळाजींच्या समाधीजवळ तेलाचा दिवा लावला जातो. सध्या तेथील गावकरी नित्यनियमाने दिवा लावतात. बाळाजी यांचे

चिरंजीव खंडोबल्लाळ चिटणीस हे छत्रपती संभाजी महाराज यांचे loyal world चिटणीस होते.


“बाळाजी आवजी ,त्यांचे बंधू श्यामजी आवजी या दोघांनाही जिवे मारले हे समजले तेव्हा येसूबाई राणीसाहेबांना अत्यंत वाईट वाटले .त्या म्हणतात त्यांना मारावयाचे काहीच

कारण नव्हते .’बाळाजी प्रभू मारिले हे उचित न केले. आजवर आम्ही काही बोललो नाही ,पण एक मागणे आहे पायापाशी. अशी हुन्नराची माणस घडवितो म्हटल्याने

घडविता येत नाहीत. पुरात उफाळली आणि नुकसान करून गेली ,म्हणून वेशी वरुन काही नदी उठवून लावता येत नाही.

आपली माणसं चुकली तर सांगायचे कुणाला? दाद मागायची कोणाकडे? ही माणसं वडिलधारी आहेत, मोठी आहेत. मोठ्यांच्या चुकाही मोठ्याच असतात,

म्हणूनच त्यांना क्षमा करायलाही मन मोठं करावं लागतं .बहुता दिवसांचे आणि इतबारी व पोक्त थोरले महाराज कृपाळू त्यांचे सर्व अंतरंग त्याजपाशी होते.

चिटणीस राज्याचे व आपले प्राण ऐसे म्हणत आले. वंशपरंपरेने चिटणीशी देऊन पत्र शपथपूर्वक त्यास दिले. ते माहीत असोन ,त्यांनी अपराध ही काही केला नाही ,

असे असता लहानाचे सांगण्यावरून ही गोष्ट कशी केली? पुढे राज्य कसे चालेल? यावर छत्रपती संभाजी महाराज म्हणाले आमचेही मनात त्यांना मारावयाचे नव्हते

परंतु रागाचे समयी होऊन गेले. वाईट गोष्ट झाली खरी. तुम्ही, त्यांचे धाकटे पुत्र आहेत ते खाजगीकडे ठेवून त्यांचा बंदोबस्त दरमहा देऊन चालवावा.

त्यांचे कारकून लिहिणार, त्यांचे काम चालविण्याचे. मुले लहान आहेत .त्याजवर कृपा करावयाची, असे सांगितले. त्याजवरून येसूबाई साहेब यांनी दोन मुले खंडोबल्लाळ

व निळोबल्लाळ यांना पुत्रवत सांभाळळे. पुढे खंडोबल्लाळ यांनी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती राजाराम महाराज यांची अत्यंत निष्ठेने सेवा केली व

आपल्या स्वामीनिष्ठेने त्यांची मने जिंकली व महाराष्ट्राच्या इतिहासात loyal world ‘ स्वामीनिष्ठा ‘म्हणून त्यांची नावे अजरामर झाली.

येसूबाई राणीसाहेबांच्या संस्कारांचा हा परिणाम म्हटल्यास वावगे होणार नाही.


वरील संवादावरून येसूबाई राणीसाहेबांना राज्यकारभार करताना योग्य-अयोग्यतेची करून दिलेली जाणीव ,स्वराज्य रक्षणाची त्यांची धडपड या गोष्टी

अत्यंत प्रकर्षाने जाणवतात. छत्रपती संंभाजीराजांच्या तापट स्वभावामुळे घडू पाहणाऱ्या अनेक अप्रिय घटनांना अतिशय कुशलपणे येसूबाई राणीसाहेबांनी

प्रतिबंध घातला.शंभूराजांसारख्या रोखठोक स्वभावाच्या, अपमान अगर अन्यायाने सहज कापरासारख्या पेटणाऱ्या, हळव्या व तितक्याच कठोर, समंजस

पण अत्यंत शीघ्रकोपी नवऱ्याला सावरणे हे येसूबाई राणीसाहेबांचे प्रथम कर्तव्य होते.


येसूबाईराणीसाहेब यांनी आपल्या पतीच्या स्वभावाचा चांगलाच अभ्यास केला होता.मराठी राज्याच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजांचे स्थान पक्के

करण्यामध्ये येसूबाईराणीसाहेबांचा सिंहाचा वाटा होता. येसूबाई राणीसाहेबांच्या सुस्वभावामुळे व राज्याची सर्वांगीन माहिती त्यांना असल्यामुळे प्रत्येकाचा

विश्वास संपादन करून घेण्यात व स्वराज्याची घडी पूर्ववत करण्यात येसूबाईराणी साहेबांनी चांगलेच यश संपादन केले होते.

अशा या हिंदूपातशाही स्थापन करण्याच्या महत्कार्यात फार मोलाचा वाटा त्यांनी उचलला, त्या शिवछत्रपतींच्या स्वामीनिष्ठ सेवकाला आमचा मानाचा मुजरा.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 
संदर्भ 
महाराणी येसूबाई राणीसाहेब

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
suryaji kakade
suryaji kakade – सरदार सूर्याजी काकडे
error: Content is protected !!
%d bloggers like this: