maharashtra culture
maharashtra culture
maharashtra culture

maharashtra culture – भामट्या पुरोगामींचा मराठा द्वेष

maharashtra culture - भामट्या पुरोगामींचा मराठा द्वेष, पत्रकारितेची भरकटलेली नाविका,सत्याचा तपास, मुलाखतकार नापास

Maharashtra Culture – भामट्या पुरोगामींचा मराठा द्वेष

 

maharashtra culture – भामट्या पुरोगामींचा मराठा द्वेष,

पत्रकारितेची भरकटलेली नाविका, सत्याचा तपास – मुलाखतकार नापास

 

लेखक : ज्ञानेश महाराव

 

 

 

 


भामट्या पुरोगामींचा मराठा द्वेष

“यशाला अनेक बाप असतात, अपयशाला बाप नसतो !” ह्या उक्तीच्या चालीवरच्या “यशाला जात नसते ;

अपयशाची जात मात्र आवर्जून सांगायची असते!” अशा प्रकारच्या उपदेशाला ‘भालाफेक’पटू नीरज चोप्रा याने

‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये सुवर्णपदक मिळाल्यावर ‘सोशल मीडिया’तून ऊत आला होता. कारण

maharashtra culture नीरजचं कौतुक करताना काही जणांनी तो ‘मराठा’ असल्याचा उल्लेख केला.

नीरज हा हरियाणा राज्यातल्या पानिपतचा. शेतकरी कुटुंबातला. कुस्ती खेळात ‘सिल्व्हर मेडल’ मिळवणारा

रवी कुमार दहिया हादेखील हरियाणातला. सोनपतचा मराठा ! maharashtra culture हरियाणा आणि मराठा,

हा संबंध ऐतिहासिक आहे. त्याला उजाळा नीरज आणि रवी कुमार यांनी आपल्या क्रीडा नैपुण्याने दिलाय.

दिल्लीपासून ९० किलोमीटर दूर असलेल्या पानिपत येथे एप्रिल १७६१ मध्ये अफगाण सेनानी अहमदशाह

अब्दाली आणि पेशव्यांचे सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांच्या मराठा सैन्यात घनघोर लढाई झाली.

सदाशिवराव भाऊच्या साथीला मल्हारराव होळकर, विश्वासराव पेशवे, इब्राहिम खान गारदी, जनकोजी शिंदे,

महादजी शिंदे, सोनाजी भापकर, सिधोजी घार्गे, आरवंदेकर, पुरंदरे- विंचुरकर आदि मराठा सरदार सैन्यासह होते.

ही लढाई ‘पानिपतचे तिसरे युद्ध’ म्हणून ओळखली जाते.


‘पानिपतची पहिली लढाई’ १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर

(अयोध्येतील वादग्रस्त ‘बाबरी मशीद’वाला) यांच्यात झाली होती. जहिरूद्दीन बाबर

(जन्म :१४ फेब्रु १४८३; मृत्यू : २६ डिसेंबर १५३०) हा मूळचा कझाकीस्तानचा. आईकडून तो चंगीझखान मुघलाचा वंशज.

मध्य आशियात साम्राज्य स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याने आपल्या पूर्वजांची राजधानी- समरकंद, दोनदा

लढाई करून जिंकली होती. १५१९ ते १५२४ ह्या दरम्यान बाबराने हिंदुस्थानावर चार स्वार्‍या केल्या. पण तो

अपयशी ठरला. १५२६ च्या पानिपतच्या लढाईत मात्र तुलनेने कमी सैन्य असूनही त्याने सैन्याची शिस्त आणि

तोफांच्या बळावर लोधीचा पराभव करून हिंदुस्थानात मुघल सत्तेचा पाया रोवला.


‘पानिपतचे दुसरे युद्ध’ उत्तर भारतातील ‘हिंदू शासक सम्राट’ हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ ‘हेमू’ आणि

‘मुघल सम्राट’ अकबर यांच्या सैन्यात नोव्हेंबर १५५६ मध्ये झाले. ‘हेमू’कडे १,५०० हत्ती आणि १ लाखाचे सैन्य होते;

तर अकबराजवळ केवळ २० हजारांचे सैन्य होते. ‘हेमू’ व त्याचे सैन्य त्वेषाने लढत होते. अकबराच्या सैन्याचा

पराभवच होणार होता. पण ‘हेमू’च्या डोळ्यास बाण लागल्याने तो घायाळ होऊन पडला. त्याने त्याचे सैन्य बिथरले.

‘हेमू’ पकडला गेला. अकबराने त्याचा शिरच्छेद करून पानिपतची दुसरी लढाई जिंकली.

पानिपतची पहिली आणि दुसरी लढाई; ज्यांचे सैन्य कमी होते, त्यांनी जिंकली! तिसऱ्या, १७६१ च्या

लढाईतही तेच झाले. पानिपतावर लढण्यासाठी जाणाऱ्या पेशव्यांचा ताफा तीन-साडेतीन लाख लोकांचा होता.

पण त्यात प्रत्यक्ष लढणाऱ्यांची संख्या ७०-७५ हजारांच्या आसपास होती. बाकीचे ‘बुणगे’ म्हणजे- यात्रेकरू,

महिला, मुले व भोजनभाऊ होते. अब्दालीचे प्रत्यक्ष लढणाऱ्याचे सैन्य पेशव्यांच्या सैन्यापेक्षा अधिक होते.

ते पेशव्यांच्या सैन्यासारखे बेशिस्तीचे नव्हते. ते लढण्यासाठी पानिपतात आले होते. म्हणून जिंकले.

अब्दालीने पेशव्यांचा, पर्यायाने मराठा साम्राज्याचा मोठा पराभव केला. ह्या पराभवातही लढवय्या

मराठ्यांनी maharashtra culture मोठा पराक्रम निर्माण केला. त्याची चिकित्सा इतिहास अभ्यासक

आजही विविधांगाने करीत असतात. त्यातूनच हरियाणातील मराठ्यांची ओळख जगजाहीर झाली.

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित हानी झाली. हे ‘लग्नात मुंज’ उरकण्याच्या

पेशव्यांच्या देव-धर्माच्या ‘बुणगे’पणामुळे घडले. यामुळेच ”मराठ्यांना झाडाला बांधून ठेवले, तर झाडासकट पळतील,

” अशा वर्णनाची वेळ मराठ्यांवर ओढवली. ही संधी अब्दालीच्या सैन्याने साधली आणि लाख मराठे पानिपतावर कापले.

त्यातून जे वाचले ते पळाले, परतले. ज्यांच्याकडे परतण्यासाठी काहीच शिल्लक राहिले नव्हते; ते पानिपतसह

भोवतालच्या कर्नाल, सोनपत, कुरुक्षेत्र ह्या भागात राहिले. हरियाणाच्या मातीत, संस्कृतीत आपली ओळख

ठेवून मिसळले. ‘राजा रोड’ ह्या संस्थानिकांच्या आश्रयाने राहिले म्हणून स्वतःची ‘रोड मराठा’ अशी ओळख

सांगू लागले. त्यांनी अडीचशे वर्षं टिकवून ठेवलेली ही ओळख कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे

यांनी मोठ्या परिश्रमाने लिखित स्वरूपात पुढे आणली आणि रोड मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांशी

जोडण्याचं कार्य २००४-०५ च्या काळात ‘मराठा सेवा संघ’चे संस्थापक-अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

maharashtra culture या ‘मराठा मीलन’च्या कामात त्यांना ‘आयएएस’ अधिकारी वीरेंद्र वर्मा यांची

विशेष साथ लाभली होती.


आज ७ ते ८ लाख लोकसंख्या असलेल्या हरियाणातील मराठ्यांना ‘मीडिया’ पेशवाईशी जोडत असले, तरी ते पहिल्या-दुसऱ्या बाजीरावचा जयघोष करीत नाहीत! maharashtra culture तर सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमातही छत्रपती शिवाजी महाराजांची ‘प्रतिमा पूजन’ करून ‘जय जिजाऊ! जय शिवराय!’ अशा घोषणा देतात. ‘शिंक’ आली तरी ‘छत्रपती की जय!’ म्हणतात. नीरजने ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवण्यासाठी पानिपतच्या ज्या स्टेडियममध्ये नियमित सराव केला, त्याचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम’ असं आहे.
ह्यात गैर काही नाही. महाराष्ट्राबाहेर गेले की, बहुतेक जण आपली ओळख maharashtra culture ‘महाराष्ट्रीयन’ अशी न सांगता ‘मराठा’ अशीच सांगतात; किंवा तेथील स्थानिक तुम्हाला ‘मराठा’ म्हणूनच ओळखतात, स्वीकारतात. कारण मराठा शब्दात अनेक जाती-जमातींच्या लोकांना सामावून घेण्याचं सामर्थ्य आहे. त्यांचे बळ वाढवण्याचे चैतन्य आहे. म्हणूनच तिसर्या पानिपतात मागे राहिलेल्यांनी अपमानातीत जिण्यातही आपला स्वाभिमान आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ‘मराठा’पण स्विकारलं. त्यात सगळेच ‘जातीचे मराठे’ नाहीत. त्यात पाटील, भोसले, खोपडे, चोपडे, खंडागळे यांच्या प्रमाणे म्हात्रेही आहेत. प्रांतिक भाषेनुसार, त्या आडनावात थोडा बदल झाला आहे. परंतु, म्हैस, भिंत, पुरणपोळी असे शेकडो शब्द त्यांच्या वापरात आहे. हे महाराष्ट्राशी असलेले नाते दाखवण्यासाठी वीरेंद्र वर्मा आणि डॉ. वसंतराव मोरे यांनी एकत्रितपणे ‘रोड मराठों का इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. त्याचे प्रकाशन २०१०मध्ये तेव्हाच्या ‘राष्ट्रपती’ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. शेती आणि जोडधंदा ‘पोल्ट्री’ याच्या आधारे सधन झालेल्या ह्या ‘रोड मराठा’ समाजातील लोक स्वतःच्या नावापुढे आणि घराच्या पाटीवर ‘मराठा’ maharashtra culture असा उल्लेख करतात.
तथापि, हा शब्द जातीच्या मराठ्यांनी वापरायचा नाही. तसा वापरल्यास प्रदेश वाचक ‘मराठा’ जातीवाचक होतो. तो पुरोगामी, समतावादी, जाती निर्मूलक म्हणवून घेणाऱ्यांच्या डोक्यात जातो. तेच नीरज चोप्राचे ‘मराठा’पण सांगताच झाले.
‘चपातीला पोळी’ म्हणत ब्राह्मण्य किंवा बरबटाचे कढावर कढीत जातीचे दलितत्व सांगितले- दाखवले तर चालते! एकलव्यावरचा पौराणिक अन्याय सांगत गुणवंत-यशवंत आदिवासी असल्याची ओळख सांगितली, तर खपते. सात पदरी करंज्यांच्या रेसिपीतून ‘सीकेपी’ वा ‘बोलाईचे मटना’तून धनगराची आठवण जागवलेली चालते. पण ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताला बारा वर्षांनी सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा ‘मराठा’ असल्याचे थेटपणे सांगितलेले चालत नाही. maharashtra culture  ही वैचारिक अस्पृश्यता झाली.
जात- वर्णव्यवस्था, जातीयता, जातिभेद हे अमानुष, अमानवी आहेत. त्याचा कुठल्याही काळातला व्यवहार-अंमल निषेधार्हच आहे. पण त्याने वास्तव बदलत नाही, जातव्यवस्था संपत नाही, ह्याचेही भान हवेच. हजारो जाती जमातीचा, भाषा-प्रांताचा विविध आहार-विहार वेशभूषेचा मिळून भारत देश बनला असल्याचे अभिमानाने सांगायचे! जाती-जमातीच्या संघटनांचे सन्मान-पुरस्कार महामानवांच्या नावाने घ्यायचे! पण नीरज चोप्राचे ‘मराठा’पण दाखवले की कोल्हेकुई करायची, maharashtra culture ही भामटेगिरी आहे.
अशानेच ‘संविधान’चीही पोथी झालीय. जातीचा अहंकार बाळगणे चुकीचे. तर त्या अहंकाराला जातीनिशी विरोध करणे, हे महाचुकीचे ! हे असेच चालू राहिल्यास, लवकरच भारतीय लष्करातल्या ‘मराठा रेजिमेंट’ मधला आणि ‘जनगण’मधील ‘मराठा’ शब्द उच्चारणे, हे जातीच्या मराठ्यांसाठी गुन्हा ठरेल!

Also Read : https://www.postboxlive.com

——–2——


पत्रकारितेची भरकटलेली नाविका

टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या ‘राजकीय संपादक’ नाविका कुमार यांनी गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरचे

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मुलाखत घेतली. ती प्रसार माध्यमांच्या जगतात बहुचर्चित ठरली. ‘टाइम्स ऑफ इंडिया ग्रूप’च्या ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचा हिंदी अवतार ‘टाइम्स नाऊ- नवभारत’ हे टीव्ही चॅनल लवकरच सुरू होतंय. या हिंदी वृत्तवाहिनीचा गाजावाजा व्हावा, ह्या प्रमुख हेतूने ओमर अब्दुल्ला यांच्या मुलाखतीचे नियोजन करण्यात आले असावे. ‘टाइम्स ग्रूप’ची पत्रकारिता हा फक्त आणि फक्त नफ्याचं गणित मांडणारा धंदा आहे, याबद्दल ग्रूपच्या मालकांच्या मनातही शंका असण्याचे कारण नाही. येनकेन प्रकारे धंदा करणे, तो वाढवणे यासाठी जे जे करायचे ते ते करण्याची त्यांची तयारी असते. यासाठीच ‘टाइम्स नाऊ’ ही त्यांची इंग्रजी वाहिनी सतत चर्चेत असते.
अर्णब गोस्वामी यांच्या आक्रस्ताळेपणामुळे ही वाहिनी लोकप्रिय झाली. ती किती लोक पाहतात, हा भाग वेगळा! परंतु, ती सतत चर्चेत असते, हे नाकारता येत नाही. आपल्याकडे एकूण इंग्रजी बोलणारा- वाचणारा वर्ग दहा-पंधरा टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातही पुन्हा ‘इंग्रजी वृत्तवाहिन्या’ पाहणारा वर्ग तर साडेतीन टक्क्यांतच मोडतो. परंतु, हा वर्ग प्रशासनापासून ते उद्योग व्यवसायांपर्यंत सर्व निर्णय प्रक्रियांत असल्यामुळे टक्केवारी कमी असूनही इंग्रजी वाहिन्यांना महत्त्व असते. त्यांचा प्रभाव मोठा असतो. मात्र निवडणुकीच्या मैदानात त्या फारशा प्रभावी ठरत नाहीत. तिथे हिंदी आणि प्रादेशिक वाहिन्या प्रभावी ठरत असतात. कारण त्यांनी सामान्य माणसांना जोडून घेतलेले असते.
‘भारतीय जनता पार्टी’ने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा  निवडणुका ‘सोशल मीडिया’चा प्रभावी वापर करून जिंकल्या. पहिल्या वेळी त्यांना वृत्तवाहिन्यांचीही साथ मिळाली. तेव्हा ‘मनमोहन सिंग सरकार’च्या विरोधात प्रस्थापितविरोधी लाट होती. सत्तेवर आल्यानंतर मात्र ‘मोदी सरकार’ने सर्व वृत्तवाहिन्यांचे गळे दाबले. त्यासाठी जिथून-जिथून विरोधी आवाज निघत होता, अशा सगळ्या आवाजांना प्रवाहाबाहेर ढकलण्यात आले. जे उरले त्यांच्या गळ्यात भक्ताचे पट्टे बांधून, त्यांनी फक्त ‘मोदी महिमागान’ गायचे, असा हुकूम केला गेला. हे पट्टा बांधून घेणारे एवढे हौशी की, ते महिमागान गाता-गाता नाचायलाही लागले!


आजही भारतातील वृत्तवाहिन्यांचा प्रेक्षक प्रगल्भ नाही. ‘टीव्ही’वर जे सुरू असतं किंवा वृत्तपत्रांमध्ये छापून येतं, तेच खरं असतं ; अशी त्यांची धारणा असते. त्याचा फायदा घेण्यासाठी ‘मोदी सरकार’ने सरकारी दट्ट्या वापरून सगळी चॅनल आपल्या गोठ्यात आणून बांधली. जी आहेत, ती पुरेशी नाहीत; हे लक्षात आल्यावर आपल्या अंकित असलेल्या कंपन्यांना नवनवी चॅनल्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक मीडिया नेटवर्क’चे ‘रिपब्लिक भारत’ (दोन फेब्रुवारी २०१९) आणि ‘टीव्ही ९ ग्रूप’चे ‘टीव्ही नाईन भारतवर्ष’ (३० मार्च २०१९) अशी दोन चॅनल्स सुरू झाली. त्यांनी राष्ट्रवादाचा मुद्दा सातत्याने तापवत ठेवला. उत्तर भारतातील प्रेक्षकांची नाडी ओळखून त्यांना भावेल अशा भडक, बटबटीत स्वरूपात; ही दोन्ही चॅनल्स चालवली गेली. त्याचा ‘भाजप’ला उत्तर भारतात निश्चितच फायदा झाला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘रिपब्लिक बांगला’ हे नवे चॅनल सुरू झाले. त्याद्वारेही ‘भाजप’ आणि मोदींचे ढोल वाजवले! परंतु, ममतांच्या झंझावातापुढे त्याचा निभाव लागला नाही.
पश्चिम बंगालमधील जनता तुलनेने अधिक प्रगल्भ, सुसंस्कृत असल्यामुळे तिथे ह्या बटबटीतपणाला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, उत्तर भारतात अशाच गोष्टी चालतात. त्याचमुळे आता उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना टाइम्स ग्रूपची ‘टाइम्स नाऊ-नवभारत’ ही नवी वाहिनी सुरू होत आहे. ‘भाजप’ला मदत करणे आणि अन्य विरोधकांचे प्रतिमाहनन करणे, या एकाच उद्देशाने ही वाहिनी सुरू करण्यात आली असावी, अशी शंका घेण्यास वाव आहे. नाविका कुमार यांनी ज्याप्रकारे ओमर अब्दुल्ला यांना प्रश्न विचारले आणि केंद्र सरकारची चमचेगिरी केली; ते पाहता पुढच्या काळात या वृत्तवाहिनीची दिशा काय असू शकेल, याची कल्पना येऊ शकते! आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारखा देशातला सर्वात जुना ‘माध्यम समूह’ धंदेवाईकपणासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, ह्याचाही अंदाज बांधता येतो.

—–3—–


सत्याचा तपास, मुलाखतकार नापास

Also Read : https://www.postboxlive.com

नाविका कुमार यांनी घेतलेली ओमर अब्दुल्ला यांची मुलाखत ही खरेतर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवी. कारण, ”मुलाखत कशी घ्यावी,” हे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवले जाते. त्याचप्रमाणे ”मुलाखत कशी घेतली जाऊ नये,” हेही शिकवायला हवे. त्यासाठी ओमर अब्दुल्ला यांची ही मुलाखत उपयुक्त ठरू शकेल!
ओमर अब्दुल्ला हे देशातील एक गंभीर प्रकृतीचे राजकीय नेते आहेत. म्हटलं तर, ते ज्येष्ठ आहेत. कारण त्यांना राजकारणातला दीर्घ अनुभव आहे. ‘नॅशनल कॉन्फरन्स पक्षा’चे उमेदवार म्हणून त्यांनी १९९८, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुका जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून जिंकल्या. ११ वर्षं ते लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर २००९ मध्ये ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाले. म्हटलं तर ते तरुण आहेत. कारण भारतीय राजकारणातलं ज्येष्ठत्व सत्तरीनंतर मोजलं जातं. ओमर अब्दुल्ला हे सध्या ५१ वर्षांचे आहेत. पण ओमर ज्या परिस्थितीत राजकारणात आहेत, ती परिस्थिती अत्यंत गंभीर आणि देशाच्या इतिहासातली अत्यंत गुंतागुंतीची आहे. ती ओमर त्यातीलच एक होऊन अनुभवत असल्याने, ते ज्येष्ठ नसले तरी अनुभवी नक्कीच आहेत.


‘मोदी-शहा सरकार’ने जम्मू-काश्मिरातील ३७० कलम रद्द केल्यापासून तिथे गेली दोन वर्षं राष्ट्रपती राजवट आहे. ह्या काळात ओमर यांनी अनेक महिन्यांचा बंदीवास भोगला आहे. अवतीभोवती राजवटीच्या क्रौर्याचा अनुभव घेतला आहे. हिंसाचाराचा नंगानाचही पाहिला आहे. अशा नेत्याची केवळ आणि केवळ उलटतपासणी घेता-घेता मुलाखतकार नाविका कुमार ह्या ‘मोदी-सरकार’ची ज्याप्रकारे चमचेगिरीही करत होत्या, ते किळसवाणे होते.
एखादा ‘ट्रोलर’ कसा ‘सोशल मीडिया’वर एखाद्याचा पिच्छा करीत असतो, तशा नाविका कुमार ओमर अब्दुल्ला यांच्यामागे लागल्या होत्या. परंतु, ओमर अब्दुल्ला संयम न सोडता अत्यंत गंभीरपणे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे, आक्षेपाचे मुद्देसूदपणे उत्तर देऊन निरुत्तर करीत होते. एकेका प्रश्नाचे उत्तर थोबाडीत दिल्यासारखे होते. पण अनेकदा थोबाड फुटल्यावरही नाविका कुमार निर्लज्जासारख्या हसत होत्या. सगळे लिहून आणलेले किंवा कुणीतरी लिहून दिलेले प्रश्न विचारताना; कोणत्याही टप्प्यावर त्यांना मुलाखतीचा सूर बदलता आला नाही; किंवा बदलावासा वाटला नाही. अर्थात, तो त्यांना बदलायचा नसावा. कारण, त्यांचा अजेंडा ठरलेला होता.
”३७० कलम रद्द करण्याचा ‘मोदी सरकार’चा निर्णय क्रांतिकारक आहे. त्या निर्णयामुळे जम्मू- काश्मीरमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांच्यात परस्पर मतभेद आहेत. सगळे पाकिस्तानचे सहानुभूतीदार आहेत. दगडफेक करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणारे देशद्रोही घटक आहेत!” अशी ठाम मते घेऊन नाविका कुमार ह्या ओमर अब्दुला यांची मुलाखत घेत होत्या.


दहशतवादी संघटना ज्याप्रमाणे तरुणांच्या डोक्यात विष भिनवून, आपल्या उद्दिष्टासाठी त्यांना तयार करीत असतात. त्यांचा ‘मानवी बॉम्ब’ही बनवतात. तशाच प्रकारे हिंदुत्ववादी विद्वेषी घटकांनी अनेक पत्रकारांचे मेंदू ‘करप्ट’ केले आहेत. ह्याची साक्ष नाविका कुमार यांनी घेतलेल्या ह्या मुलाखतीतून मिळत होती. त्यातून नाविका कुमार यांचाही मेंदू ‘करप्ट’च नाही, तर तो दुरुस्तीच्याही पलीकडे गेलाय, हे लक्षात येत होते. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि तेथील परिस्थिती संदर्भातील प्राथमिक माहितीही त्यांनी मुलाखतीपूर्वी घेतली नव्हती, हे स्पष्ट झाले.
‘व्हाॅट्सअॅप युनिव्हर्सिटी’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांची जंत्री घेऊन त्या ओमर यांची मुलाखत घेण्यासाठी बसल्या होत्या. एरव्ही दुसरा एखादा ऐरागैरा नेता असता तर, त्यांचा हा वाह्यातपणा खपून गेला असता. परंतु, ओमर अब्दुल्ला यांच्यासारखा गंभीर प्रकृतीचा राजकीय नेता समोर असल्यामुळे नाविका कुमार यांनी स्वतःची बेइज्जती करून घेतली! उरली सुरली जी काही होती, ती ‘सोशल मीडिया’वरील लोकांनी काढून टाकली.
नाविका कुमार ”जम्मू-काश्मिरात ७० वर्षांत काहीच घडले नाही; ते ३७० वे कलम रद्द केल्यानंतर घडले,” असा दावा करीत होत्या. पण ”३७० कलम रद्द केल्यावर जम्मू-काश्मिरात दोन वर्षांत काय झाले,” या ओमर अब्दुल्ला यांच्या प्रश्नावर त्यांच्याकडे सांगायला काही नव्हते. ”सुरुवात तर झाली आहे,” या त्यांच्या युक्तिवादावर ओमर अब्दुल्ला यांनी ‘मनमोहन सिंग सरकार’च्या काळात सुरू झालेल्या विकास कामांचा पाढाच वाचला. त्यामुळे नाविका कुमार यांची हालत वाचा गेल्यासारखी झाली.


मोदींची चमचेगिरी करण्यासाठी येऊन स्वतःची बेइज्जती करून घेण्याचा हा प्रकार भारतीय पत्रकारितेत नोंद करावा, असा आहे. पत्रकारितेची भरकटलेली ही नाविका, नव्या पत्रकारांना दीर्घकाळ दिशादर्शन करीत राहील!

 

 

 

 

ज्ञानेश महाराव

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
karad - वेणूताई चव्हाण
karad – यशवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय वेणूताई चव्हाण  
error: Content is protected !!
%d bloggers like this: