Maharashtra flood
Maharashtra flood
Maharashtra flood

Maharashtra flood – महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भीषण

Maharashtra flood - राज्य सरकार पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्नशील

Maharashtra flood – महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भीषण

Maharashtra flood – राज्य सरकार पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्नशील

 

 

 

 

 

23/7/2021

 

मागील काही दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ( Maharashtra flood )हाहाकार उडाला आहे. सावित्री, वसिष्ठी,

कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांना पूर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील नद्या शेजारील भागांना हाय अलर्ट जारी केला आहे.

कृष्णा खोऱ्यातील गावांना धोक्याचे इशारे देण्यात आले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सतर्कतेचे इशारा देताना

आपत्कालीन परिस्थीचा सामना करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांना स्थलांतरीत करण्यासाठी मदत सुरु केली आहे.

एनडीआरएफ च्या तुकड्या पूर भागात मदतकार्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरॊबर लोकांचे पुनर्वसन

आणि मदतकार्य राज्य सरकार करतच आहे, केंद्रानेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आढावा घेत

सर्वोतोपरी मदत करण्याचे जाहीर केले आहे. चिपळूण आणि कोकणातील पूर परिस्थिती गंभीर स्वरूपाची झाली आहे.

पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे. त्याप्रमाणे लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भूस्खलन भागात लोकांनी सावध राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. कोयना नदीचे सहा दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर

विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांनी सतर्क राहण्याचे इशारे देण्यात आले आहेत.

 

महाड मध्ये तळये गावावर दरड कोसळली असून ३५ घरे दरडी खाली आली आहेत, आता पर्यंत ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अजूनही बचाव कार्य सुरु आहे. अजूनही ८० ते ८५ जन ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अतिवृष्टीनं (Maharashtra flood) थैमान घातलं आहे.

बऱ्याच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोक्याची पातळी 7 मीटरवर असून सध्या ती 8 मीटर वरून वाहत आहे. तर वशिष्टी नदीची

धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहत आहे. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील

गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरू केलं आहे.

चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वस्त्यांमध्ये तब्बल 10 ते 15 फुटांपर्यंत पाणी शिरलं आहे. त्याबरोबर रत्नागिरीतील एक जुना पूल वाहून गेला आहे.

याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रत्नागिरी मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अतिवृष्टीनं (Maharashtra Flood) थैमान घातलं आहे.

कोकणात अनेक ठिकाणी नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बऱ्याच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरजन्य

परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

दरम्यान पुराच्या पाण्यात अनेक नागरिक आडकले आहेत. अशा नागरिकांना मदत करण्यासाठी काल भारतीय हवाई दलाच्या

विमानानं NDRF च्या जवानांना चिपळूण परिसरात उतरवलं आहे. त्यावेळी पुराने थैमान घातलेल्या परिसराचे काही फोटो / व्हिडीओ घेण्यात आले आहे.

या व्हिडीओ मधुन कोकणातील पूरस्थितीचं भयानक रुप समोर येत आहे.

एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत.

नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

Postbox Live

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Maratha empire history
Maratha empire history २९ वर्षा नंतर मोगल कैदेतून येसूबाई राणीसाहेब
error: Content is protected !!
%d bloggers like this: