Maratha empire शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे
Maratha empire शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे
Maratha empire शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे

Maratha empire family tree – शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे

Maratha empire family tree - शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Maratha empire family tree  –

शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे


Maratha empire family tree  – शोर्यशाली, निष्ठावंत यशवंतराव शिंदे

यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 


 

Maratha empire family tree छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात  बेळगाव जिल्ह्यातील तोरगळ येथे मराठा सरदार नरसोजीराव शिंदे यांनी छत्रपतींच्या आज्ञेवरून आपले ठाणे वसविले.१७२६ मध्ये नरसोजींच्या कन्या जिजाबाई यांचा विवाह कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्याशी झाला. छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात जिजाबाईंनी मनोळीच्या यशवंतराव शिंदे यांना कोल्हापूर दरबारात दाखल करून घेतले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी पूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार राणी जिजाबाईंनी खानवटकर Maratha empire family tree भोसले घराण्यातील पुत्र दत्तक घेतला. पेशवेपदावर आलेल्या थोरल्या माधवरावांनी बिकट परिस्थितीमुळे अखेर दत्तकाला संमती दिली. या सर्व प्रकरणात यशवंतराव शिंदेयांचे जिजाबाईंना खूप सहाय्य झाले.२७ सप्टेंबर १७६३ रोजी छत्रपती शिवाजीराजे( तिसरे ) कोल्हापूर गादीवर आले.


जानेवारी १७६३ मध्ये जिजाबाई छत्रपतींसह कोल्हापूरबाहेर देवदर्शनास निघाल्या त्यावेळी कोल्हापूरचा कारभार पाहण्यास सुबराव अमात्यांनी नकार दिला. स्वाभिमानी जिजाबाईंनी तात्काळ त्यांच्या जागी आपले विश्वासू यशवंतराव शिंदेना कारभार पहायला सांगितला .यशवंतराव हे युद्धात व राजकारणात कुशल असल्याने आपल्या कर्तबगारीने त्यांनी पुढे सेनासाहेबसुभा पद प्राप्त केले.१७६३ पासून १७८३ पर्यंत प्रथम जिजाबाई राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व नंतर त्यांच्या सवत दुर्गाबाई व छत्रपती शिवाजी महाराज ( तिसरे )यांच्या कारकीर्दीत लढायांचा भार यशवंतरावांनी सांभाळला.

जानेवारी १७६७ मध्ये सावंतवाडीचे कारभारी जीवाजी विश्राम सबनीस यांनी Maratha empire family tree कोल्हापूर राज्याचा रांगणा हा महत्त्वाचा किल्ला किल्ल्यावर फितुरी करून काबीज केला. हे महास्थळ पुन्हा घेण्यासाठी यशवंतराव फौज घेऊन गेले.रांगणा किल्ल्याला वेढा घालून मार्चमध्ये हल्ला करून त्यांनी रांगणा जिंकला. यावेळी हल्ल्यात अनेक शत्रू सैनिकांना ठार मारून,कैद केलेल्या ५० जणांचा त्यांनी फितुरीची शिक्षा म्हणून शिरच्छेद केला.


१७६४ मध्ये माधवराव पेशवेयांनी Maratha empire family tree  कोल्हापूर राज्याच्या कर्नाटकातील काही ठाण्यातील बंडखोरीचा मोड करून जिजाबाईंचा अंमल सुरळीत करून दिला. पण ह्याबद्दल पेशव्यांना द्यायच्या रकमेसाठी चिकोडी व मनोळी तालुके वसुलीसाठी पटवर्धनांकडे लावून त्यातून फेड करण्याची व्यवस्था पेशव्यांनी केली. या प्रकरणामुळे कोल्हापूर छत्रपती व पटवर्धन यांच्यात जवळपास तीस-पस्तीस वर्षे चाललेला संघर्ष निर्माण झाला.

१७७३ मधे राणी जिजाबाई निधन पावल्या. यावेळी छत्रपती शिवाजी राजे फक्त १५ वर्षाचे होते. पेशवाईत नाना फडणीस व इतरांचा बारभाईचा कारभार चालू झाला होता.ह्या काळात कोल्हापूरकरांचा पटवर्धन, इचलकरंजीकर घोरपडे व कराडकर प्रतिनिधी यांच्याशी संघर्ष चालू झाला.

१७७५ च्या डिसेंबरमध्ये प्रतिनिधींनी Maratha empire family tree वडगाववर हल्ला करून यशवंतरावांचा पराभव केला. यानंतर कोन्हेरराव व पांडुरंगराव पटवर्धन यांनी फौजेसह चालून येऊन कोल्हापूरला वेढा घातला. यशवंतराव शिंदे यांनी कोल्हापुरचे संरक्षण हिमतीने केले. कोल्हापूरच्या क्षात्रजगदगुरूंचा मठ लुटून पटवर्धन परतले .पेशव्यांचे प्रमुख कारभारी नाना फडणीस यांनी कोल्हापूर छत्रपतींना नमविण्याचे प्रयत्न चालू करताच छत्रपतींनी थेट हैदरअलीशी संधान साधले .मागोमाग पटवर्धनांच्या सैन्याचा एका लढाईत कोल्हापूरच्या फौजेने पराभव करतात नाना फडणीसांनी मराठेशाहीतील सर्वात सामर्थ्यवान सरदार महादजी शिंदे यांना कोल्हापूरवर आक्रमण करण्यास अनेक विनवण्या करून तयार केले.


१७७८ च्या जानेवारीत महादजींनी आपल्या ३० हजार फौजेसह येऊन कोल्हापूरला जबरदस्त वेढा घातला. यावेळी यशवंतरावांनी सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर रवाना केले व स्वतः कोल्हापूरला थांबून बचावाची तयारी केली. महादजींनी पन्हाळ्याकडे काही फौज रवाना करताच यशवंतरावांनी समेटाचे बोलणे लावून महादजींना दोन लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली .पण महादजींनी तीस लाखाची मागणी केली.

इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने यशवंतराव कोल्हापूरचा कोट लढवू लागले.महादजींच्या सैन्याचा मारा व हल्ले यांना यशवंतराव व सखोजी भोसले यांनी तोंड देऊन तीन महिने कोल्हापूर जिद्दीने लढवले.महादजींनी कोल्हापूरची रसद पूर्ण बंद केली व कोट उध्वस्त करण्यासाठी मोठ्या तोफा मागवल्या. हे कळताच आता आपला निभाव लागणे शक्य नाही हे जाणून यशवंतरावांनी अखेर तह केला. २० लाख खंडणी ,Maratha empire family tree चिक्कोडी, मनोळी तालुके व कागल जहागीर कोल्हापूरकरांकडून घेऊन महादजींनी अखेर आपला वेढा उठविला.


१७७८ मध्ये यशवंतरावांचे दरबारातील वाढते वजन सहन न होऊन त्यांच्यावर मारेकरी घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. यशवंतरावांच्या प्रसंगावधानाने हा प्रसंग टळला.यामागे असणार्या अमात्य व प्रतिनिधी यांच्याकडून इमानपत्रे लिहून घेऊन त्यांना माफ करण्यात आले.

Maratha empire family tree कोल्हापूरच्या इतिहासात यशवंतराव हे अत्यंत एकनिष्ठ विश्वासू पराक्रमी व मुत्सद्दी म्हणून नोंदले गेले. एकाचवेळी सेनाप्रमुख व कारभारी या जबाबदाऱ्या पार पाडून यशवंतरावांनी कोल्हापूर राज्याचे रक्षण करण्यात मोठे मोलाचे कार्य केले. त्याकाळच्या सर्वात सामर्थ्यवान अशा महादजी शिंदेच्या प्रचंड फौजेशी तीन महिने लढा देण्याची त्यांची जिद्द वाखानण्याजोगी आहे.

अशा या थोर व शोर्यशाली यशवंतराव शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा


लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
मराठी रियासत
गो.स.सरदेसाई
मराठ्यांची धारातिर्थे
प्रवीण भोसले

Advertisement

More Stories
Taimur khan - सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर
Taimur khan – सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर
error: Content is protected !!
%d bloggers like this: