Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Maratha empire in Marathi – शूरवीर श्रीमंत पतंगराव जाधवराव

1 Mins read

Maratha empire in Marathi – शूरवीर श्रीमंत पतंगराव जाधवराव

 

Maratha empire in Marathi – शूरवीर श्रीमंत पतंगराव जाधवराव यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

 

9/9/2021

सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे कनिष्ठ पुत्र शुरवीर श्रीमंत पतंगराव जाधवराव( मृत्यू 9 सप्टेंबर १६९५) मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या

चंदन-वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी : मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदन-वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब – किकली गावात

चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी मोगल सरदार हमीदउद्दीन खानाच्या सैन्यासोबत सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या तुकडीची लढाई झाली होती. यावेळी

संताजीराव घोरपडे यांच्या सैन्यात असलेले पतंगरावजी जाधवराव मोगलांकडून मारले गेले.या युद्धाचे वर्णन सेतुमाधवराव पगडी अनुवादित ” मोगल दरबाराची बातमीपत्रे

“यात आढळते.९ सप्टेंबर १६९५ रोजीच्या मोगल बातमीपत्रात “हमीदउद्दीन “खानाने चंदनवंदन किल्ल्याखालच्या वाड्या जाळण्यासाठी फत्तेहुल्लाखान याला पाठविले होते.

संताजीराव यांना ही बातमी समजली ,तेव्हा ते फत्तेउल्ला खानावर चालून आले .हमीउद्दीन खानही येथे पोहचला. दोघांमध्ये तुंबळ लढाई झाली .धनाजीराव जाधव रावांचा

मुलगा ,एक शूरवीर मराठा सरदार व अनेक सैनिकांचा या लढाईत पराभव झाला.गनीम किल्ल्यात जाऊन बसले.खानाने किल्ल्याखालील पेठा जाळून टाकल्या व गुरेढोरे पकडली.

या लढाईत धनाजीराव जाधवराव यांचे पुत्र पतंगरावजी जाधवराव मारले गेले. असा उल्लेख आढळतो .जांबच्या पूर्वेस कृष्णा मंदिरासमोरील बागेच्या विहिरीजवळ

शेतात पतंगरावजी जाधवराव यांची समाधी आहे. बांधकामाची शैली जाधवराव घराण्याच्या इतर समाधीप्रमाणेच आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांचे वडील लखुजीराजे जाधवराव यांचे ते ६ वे वंशज होते. छत्रपती राजाराम महाराज यांनी धनाजी जाधवराव

यांना “जयसिंगराव” हा किताब बहाल केला होता. स्वराज्यासाठी बलिदान देणारे जाधवराव घराण्यातील शंभूसिंह जाधवराव (पावनखिंड) पहिले तर पतंगरावजी

हे दुसरे शूरवीर होते. पतंगराव जाधवराव ऐन तारुण्यात शहीद झाले. ते अविवाहित होते.

त्यांच्या समाधीच्या चारही बाजूला पुष्पवेलीची कमान पसरली आहे. या समाधीवर जाधवरावांच्या घराण्याच्या समाधीवर आढळणारी शरभशिल्प ,मयूरशिल्प,गजशिल्प

ही चिन्हे आढळतात. तसेच शिवलिंगही आहे. या समाधीची लांबी 15.5 फूट ,उंची 3.5 फूट तर रुंदी 14.5 फूट आहे .धनाजीराव जाधवराव यांच्या इतर तीन पुत्रांची

समाधी सरसेनापती चंद्रसेन जाधवराव (भालकी ) सरसेनापती संताजीराव जाधवराव (मांडवे ,सातारा )श्रीमंत शंभूसिंह जाधवराव ( माळेगाव )येथे आहेत.

 शूरवीर पतंगराव जाधवराव यांच्या 325 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

 

 

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!