Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Maratha Empire – पावन खिंडीतला पराक्रम बाजीप्रभू देशपांडे

1 Mins read

Maratha Empire – पावन खिंडीतला पराक्रम बाजीप्रभू देशपांडे

 

पावनखींड – Maratha Empire

 

 

 

 

12/7/202,

पावनखींड

13 जुलै 1660 या दिवशी चित्तथरारक पराक्रम घडला.6000 विरूध्द 300 जण कसे लढले असतील ???

काय ती माणसे असतील ?

काय ती काळरात्र असेल ??

मृत्यू पाठीवर असताना केवळ आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी अग्निकुंडात देहाअर्पण करण्यास असुसलेले ते

300 मावळे,त्यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वामिनिष्ठा अलौकिकच म्हणावी लागेल.

आजही तो प्रसंग वाचनात आला तरी अंगावर काटा उभा राहतो.

एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या ‘पक्षपाती’ इतिहासकारांनी घेतली आहे,

त्यामुळे हिरडस मावळातील मावळ सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे…

पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही…”

1) घोडखिंडीतील तो इतिहास नेमका कुणाचा.?हिरडस मावळ खोऱ्याचा एक भाग असलेल्या

रोहिड खोऱ्यातील त्रेपन गावाच्या देशमुखीतील एक छोटस गाव म्हणजे ‘शिंद’. या गावातील

वैज्यप्रभू यांनी बिदरच्या मिर्झा अलिबेरीद शहाकडून काही गावचं वतन मिळवून हे घराणे

‘देशपांडे’ झालेलं. वैज्यप्रभू यांचे पुत्र पिलाजीप्रभू, त्यांचा पुत्र कृष्णाजीप्रभू आणि त्यांचा पुत्र बाजीप्रभू

पण या रोहिड खोऱ्यातील 53 गावाचे देशमुख होते ते बाजी बांदल देशमुख.

अन् त्यांचे या त्रेपन्न गावातील गाव होते ते महूड. या देशमुखांच्या त्रेपन्न गावचा कारभार शिंद गावातून देशपांडे पहायचे.
म्हणजे हे देशपांडे बांदल देशमुखांचे कारभारी होते.! देशमुखीतले बाजी बांदल देशमुख आणि कारभारी बाजीप्रभू देशपांडे हे जवळपास समवयीन असेच होते.सिद्धी जोहर याचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्यावर बहुतेक बांदल देशमुखांना सोबत ठेवल्याचा ( Maratha Empire ) इतिहास आहे. कारण हिरडस मावळ खोऱ्यातील वाटा, पायवाटा, चोरवाटा यांची सर्व माहिती या लोकांना होत्या. त्यामुळे बिकट प्रसंगी हे लोक फायद्याचे ठरतील म्हणून राजांनी हा निर्णय घेतला होता. महाराज गडावरून निसटले तेव्हा हिरडस मावळातील ही फौज सोबत घेऊनच.घोडखिंडीत उभे राहून त्रेपन्न गावचे कारभारी बाजीप्रभू देशपांडे लढल्याचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो.! पण या त्रेपन्न गावचे मालक असलेले बाजी बांदल देशमुख व ईतर मावळे हे याचं खिंडीत शहीद झाले.! मग त्यांच्या खिंडीतील पराक्रमाचा बोटभर का होईना इतिहास का वाचायला मिळत नसेल, याचे दुःख वाटल्याखेरीज राहात नाही.! की नेमके कोणाला फ्लॅश करण्यासाठी मुद्दामच कोणी इतिहासकारांनी तो लपवला असावा ,अशी शंका मनात येते.?विजापूरकडून सिद्धी जोहर आणि औरंगजेबाकडून शाहिस्तेखान ही एकाच वेळी स्वराज्यावर झालेली दोन्ही आक्रमणे शिताफीने परतावल्यानंतर शिवाजीराजांनी रायगडावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात शिवाजी महाराजांनी खिंडीतल्या पराक्रमाबद्दल बांदल देशमुखांना मानाची तलवार देऊन सत्कार केल्याचा इतिहास आहे.! मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर पावन खिंडीतला पराक्रम जर बाजीप्रभू देशपांडे यांचा होता तर महाराजांनी देशपांडे घराण्याला मानाची तलवार देऊन सत्कार करायचा सोडून तो बांदल देशमुख घराण्याचा का केला ??
★ बांदल सेना ★
●2) “भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ॥”
अर्थ- “हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत.”बांदलांच वरिल वर्णन दस्तुरखुद्द शंभुछत्रपतींनी केलंय…● “जैसे अंगद हनुमंत श्रीरामाला तैसे ‘जेधे’ ‘बांदल’ शिवाजीला”असं बांदलांचं वर्णन जेधे शकावलीत आलेलं आहे…या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो.. म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाण) लढणारी सेना.- कृष्णाजी बांदल हिरडस मावळाचे म्हणजे आळंद ते उंबर्डे या क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार..
– सन 1625 मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबरास हरवुन केंजळगड जिंकला.- 1636 मधे दादोजी कोंडदेव(आदिलशाही,विजापुर सल्तनत) याने कृष्णाजीं बांदल यांजवर हल्ला केला व पराभुत झाला…- पराभवानंतर दादोजीने कृष्णाजींना मसलतीस बोलावुन कपटाने कैद केले व खुन केला..- कृष्णाजींच्या मृत्युनंतर पत्नी दिपाऊ व पुत्र बाजी बांदल आपल्या बांदल सेनेसमवेत स्वराज्यास सामिल झाले..
– बांदल सेनेने स्वराज्यासाठी पुढील लढायांत योगदान दिल्याचे संदर्भ मिळतात… प्रतापगड युद्ध ( अफजलखान प्रकरण, पन्हाळगड वेढा ( सिद्दी जौहर प्रकरण)
▶ दक्षिण दिग्विजय मोहीम-पैकी प्रतापगड युद्धात कान्होजीराव जेध्यांसमावेत बांदल सेनेने महत्पराक्रम गाजविला यानंतर शिवरायांनी रुस्तम-ए-जम्याला हरवुन राजापुर व विशाळगड हस्तगत केला विशाळगडाच्या संरक्षणासाठी महाराजांनी बांदल सेनेला तैनात केले..
– तसंच पन्हाळगडच्या पायथ्याला पडलेल्या सिद्धीच्या फौजेला गुंगारा देऊन विशाळगडाकडे जाताना वाटेत गजापुरच्या खिंडीत अवघ्या तिनशे मावळ्यांनी सिद्दी मसुदच्या फौजेला रोखुन धरुन लढता लढता विरमरण पत्करले…
– यानंतर छत्रपतींनी राजगडदरबारी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान रायजी नाईक बांदल यांना बहाल केला.- बांदल हे जन्मजात योद्धे होते,बांदल व ईतर सेनेनं गजापुरच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे. पण आम्ही कथा, कादंबर्या वाचुन खिंड फक्त बाजीप्रभुंनीच लढवली असा समज करुन बसलो आहोत. पण याच लढाईत शंभुसिंह जाधव आणि तिनशे मावळे प्राणपणानं लढले होते.ज्या प्रमाणात बाजीप्रभुंचा उल्लेख होतो त्या प्रमाणात आजही बांदल सेनेचा ,ईतर मावळ्यांचा किंवा शंभुसिंह जाधवरावांचा साधा उल्लेख होत नाही ही मोठी खंतच…

Maratha Empire - Pawankhind

Maratha Empire – Pawankhind

खरेतर एका भयंकर घटसर्पाच्या तडाख्यांतून हिरडस मावळच्या बांदलसेनेनी व शंभूसिंह जाधवरावांनी स्वराज्याचे प्राण वाचविले.पावनखिंडीतल्या मातीला सुगंध आहे बांदलसेनेच्या त्यागाचा .जर तेथील मूठभर माती पाण्यात टाकली तर पाण्याला रंग चढेल मावळ्यांच्या रक्ताचा.जर तेथील जमिनीला कान लावले तर आवाज येईल,बांदलांच्या व शंभूसिंह जाधवरावांच्या तोंडून कडाडलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा !- हर हर महादेव! हर हर महादेव!
– दक्षिण दिग्विजय मोहीमेत रायजी नाईक बांदल छत्रपतिंसमवेत होते,मोगली सेनेने शिरुर-शिक्रापुर येथे केलेल्या लुटीमुळे रायजींनी विडा उचलुन मोगली फौजेवर हल्ला केला..- या शिक्रापुरच्या घनघोर रणसंग्रामात रायजी विरगतीला प्राप्त झाले…
– रायजीचे पुत्र सुभानजी यांना छत्रपतींनी मानाची तलवार बहाल केली.. तर अशी बांदल व ईतर मावळ्यांची ज्ञात गाथा ” एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या ‘पक्षपाती’ इतिहासकारांनी घेतली आहे त्यामुळे बांदल, शंभूसिंह जाधवराव व ईतर सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे…
पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही…”
– छत्रपतिंशी एकनिष्ठ असणार्या ( Maratha Empire ) बांदल देशमुख घराण्यातील विरांच्या समाध्या पिसावरे ता.भोर,पुणे या गावी असुन इतिहासप्रेमींनी थोडी वाट वाकडी करुन आवर्जुन भेट देण्यासारख्याच आहेत…
– या शुर परंतु अपरिचीत योद्ध्यांना वंदन
बांदलांनी शंभुराजांच्या काळातदेखील स्वराज्याशी इमान ठेवले होते

Maratha Empire - Pawankhind

Maratha Empire – Pawankhind

संदर्भ-
1- स्वराज्याचे शुर सेनानी:दामोदर मगदुम
2- जेधे शकावली:अ.रा.कुलकर्णी
3- शिवभारत:संपादक स.म.दिवेकर
4- बांदल तकरीर:संपादक ग.ह.खरे,ना.के.जोशी
3) बाजी प्रभू हे इतिहासा मध्ये
पावनखिंडीतच प्रकटले
हे प्रकरण संशयास्पद आहे!
पावनखिंडीत शुंभूसिंह जाधवराव आणि 300 बांदल सेनांनी जीवाची परवा न करता ही खिंड लढवली.जेधे यांच्या कडे मानाच पान होत ते बाजी बांदलांना शिवरायांनी दिल.बाजी बांदल आणि फुलाजी बांदल आणि त्यांची बांदलसेना या सर्वांनी मिळून खिंड लढवली.खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बांदल व त्यांच्या बरोबरीने लढणार्या मावळ्यांना “बांदलसेना” म्हणत असत.
पावनखिंडीच्या लढाईत आपल्या राजासाठी आपले प्राण ओवाळून टाकणारे शंभूसिंह जाधवराव ,बाजी बांदल आणि त्यांचे बंधू फुलाजी बांदल ,बाजीप्रभू देशपांडे व ईतर ज्ञात ,अज्ञात सर्व मावळे यांना आमचा मानाचा मुजरा
.

माहिती साभार

v. a. gavhane
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!