Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

maratha reservation news – मराठ्यांना ‘मुकद्दर’ बदलावं लागेल !

1 Mins read

maratha reservation news – मराठ्यांना

‘मुकद्दर’ बदलावं लागेल !

 

 

maratha reservation news – मराठ्यांना ‘मुकद्दर’ बदलावं लागेल ! – प्रसन्ना जोशी

 

 

 

 

‘नियतीशी झालेले करार कधी बदलता येत नसले, तरी मुकद्दर बदलण्याची ताकद मराठे आपल्या मनगटात

बाळगतात हा आपला इतिहास आहे.’, ‘मुकद्दर’ या औरंगजेबावर लिहिलेल्या ग्रंथात, स्मृतीशेष लेखक

श्री. स्वप्नील कोलते-पाटील यांचे हे वाक्य आहे.

ज्या काळाबद्दल लेखकानं पुस्तक लिहिलंय त्या काळी आपण सारेच मराठे होतो. maratha reservation news

आजही महाराष्ट्रातला तो मराठा, असंच दिल्लीत मानलं जातं. मलाही तसा अनुभव आहे. पण, आज या शब्दाला

विशिष्ट सामाजिक अर्थ आहे. मराठा हा एक विशिष्ट समाज आहे आणि आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर

या समाजात, त्यातील तरूणाईत प्रचंड कोंडीची भावना आहे. आणि, त्यादृष्टीनेच मी ज्या महाराष्ट्रात राहतो

त्यातील एका मोठ्या वर्गात क्षोभ असेल, तर त्याची धग मलाच काय आपल्या सर्वांना जाणवायला हवी, कळायला हवी.

मराठा आरक्षणाबाबत समर्थन आणि आक्षेप मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले आहेत. असे आक्षेप मी स्वत: टी.व्ही.

चर्चांदरम्यान मान्यवर मराठा नेते, अभ्यासक, विचारवंत यांच्यापाशी मांडले, व्यक्त केले आहेत.

maratha reservation news मराठ्यांची गरीबी खरी पण ते सामाजिकदृषट्या मागास कसे? हा प्रश्न

आरक्षणाच्या सर्व चर्चा विश्वाचं मूळ आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मराठ्यांवर झालेल्या अन्यायाची उदाहरणे

आयोग व विचारवंतांनी दिली. त्या मुद्यांचे खंडन-मंडन हा इथे मांडण्याचा विषय नाही. मात्र, गरीब मराठ्यांच्या

आर्थिक मागास अवस्थेला आणि अस्वस्थतेला या चर्चाविश्वात; व्याख्यांच्या, घटनेतील, कायद्यातील वाक्यांमध्ये-अर्थांमध्ये

काहीच किंमत नाही का? हा मुद्दा मला गंभीर वाटतो. आरक्षण निकषांमुळे अमुक एक शैक्षणिक-नोकरीविषयक संधी न

मिळाल्यास आणि (पुढील वाक्य महत्वाचं आहे->) आणि अन्य समाजातील व्यक्तीस ती मिळाल्यास, संधी न

मिळालेल्या व्यक्तीला समजवायचं कसं? आणि हा एका व्यक्तीचा नव्हे एका मोठ्या समाजातील लाखो

तरूण-तरूणींचा प्रश्न असेल, तर तुम्ही कसे सामाजिक मागासपणाच्या व्याख्या-चर्चासत्रे-कायद्याच्या

तरतूदीत बसत नाही, हेच आपण सांगत बसणार?

मग, maratha reservation news आता या सामाजिक मागासपणामुळे मिळणाऱ्या आरक्षणाच्या फलिताकडे

तरी पाहू, काय होतं सामाजिक मागासपणामुळे आरक्षण मिळाल्यानंतर? आरक्षण हा गरीबी निर्मूलनाचा

कार्यक्रम नव्हे, मग तो जाती निर्मूलनाचा आहे काय? समता स्थापण्याचा आहे काय? त्या दिशेनं

‘मोजतायेण्याजोगी’ प्रगती सामाजिक पातळीवर झाली आहे काय? पुढील मुद्यांचा या दृष्टीनं विचार व्हावा.

 

Also Read : https://www.postboxlive.com

 

1 आरक्षणाच्या लाभार्थ्यांचे सामाजिक उन्नयन होते की आर्थिक? की दोन्ही?, त्यातील मोजता येण्याजोगे एकक सामाजिक की आर्थिक?

2 सामाजिक उन्नयन हे केवळ त्या व्यक्ती/जातीने मानून चालणार नाही तर त्याला अन्य समाजाची मान्यता गृहीत आहे. कारण, आरक्षणा मागील जातीय-सामाजिक अन्याय हा मुळात समाजातील काही घटकांनी हा सामाजिक भेद मानल्यानं तयार झाला. तेव्हा फक्त शोषितांचे आर्थिक नव्हे तर सामाजिक उन्नयन होण्यासाठी उर्वरीत समाजानं ही ‘बरोबरी’ मान्य केली पाहिजे. ही मान्यता आरक्षणाने उन्नती झालेल्या व्यक्ती/समाजास लाभते का? (माझ्या दृष्टिने नाही, कारण सभोवतालची परिस्थितीच याची साक्ष आहे, ‘जात गेली’ असा कोणताही समंजस माणूस म्हणणार नाही)

3 अशा प्रकारे आरक्षणाचा लाभ घेणारे समाज अंतिमतः भौतिक-आर्थिक प्रगती करतात, मात्र जाती अंत-समता याचे लक्ष्य कोणत्याच बाजूने साध्य होत नाही (कारण जात नष्ट करायची म्हणजे मनातून येणारी मान्यता काढावी लागेल, तोच तर प्रॉब्लेम आहे)

4 त्यामुळे जातीमुळे झालेला अन्याय, संधीची असमानता, प्रतिनिधित्व यादृष्टीने आरक्षण हे अंतिमतः भौतिक उन्नयन साधते सामाजिक नव्हे. त्यामुळे आरक्षण हा शेवटी गरिबी निर्मूलनाच कार्यक्रम ठरतो. ज्याची अपेक्षा कुणाही गरीब जनांना वाटते-जशी ती मराठा समाजातील गरीब बांधवांना वाटते.

5 आजच्या काळात तर आर्थिक उन्नती ही स्वतःच्याच मुळातील ‘क्लास’ विशेषणासह जात-वर्गीय अस्मिता टोकदारही करतेय. गरीब-मध्यम -उच्चमध्यमवर्गीय होण्याचा संघर्ष इतका आहे की सामाजिक परिमाणापेक्षा आर्थिक संदर्भच महत्वाचे ठरतायत. समान गरिबीतून आलेल्या मागास किंवा मराठा यांना समान न्याय का नाही? असा प्रश्न यातून उदभवतो. तो अकादमिक पातळीला जरी खोडता येत असला, तरी प्रत्यक्षात जीवन मरणाचा ठरतो. आजचा तिढा त्यातूनच आहे.

आपल्या maratha reservation news घटनेच्या प्रास्ताविकेत न्यायाच्या परिभाषेत सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायाबद्दल ग्वाही आहे. यातील आर्थिक घटक हा सामाजिकतेला समांतर की दुय्यम? की, आजच्या काळात सामाजिकपेक्षाही महत्वाचा? माझ्यामते कायद्याच्या किचकट चर्चांपलिकडे माणुसकीच्या प्रेरणेनेही याकडे पाहिलं जावं.

आणि म्हणूनच,

मराठा तरूणाई, मित्र-मैत्रिणींनी नाउमेद होऊ नये. आरक्षण हे साधन आहे. पण, ते एकमेव नाही. मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांतील आहे, मात्र त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व शतकानुशतकांचं आहे. आरक्षणाची नियती नियमांना बांधील असेलही, पण मुकद्दर तुमच्या मनगटात आहे !

 

 

 

प्रसन्ना जोशी

Leave a Reply

error: Content is protected !!