middle class India
middle class India
middle class India

middle class India भारतीय मध्यमवर्गाला एक सवाल

middle class India बाबांनो, असे शांतशांत का आहात ?

middle class India भारतीय मध्यमवर्गाला एक सवाल

middle class India बाबांनो, असे शांतशांत का आहात ?

सागरिका घोष

 

टाईम्स ऑफ इंडिया च्या 12 जुलै 2021 च्या अंकातील सागरिका घोष यांच्या लेखाचे भाषांतर

भाषांतर : अनंत घोटगाळकर

 

वृद्ध आणि रुग्णाईत असूनही वारंवार जामीन नाकारल्या गेलेल्या स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूमुळे संतापाची लाट उसळलीय खरी पण

ती मुख्यतः समाजमाध्यमापुरतीच मर्यादित आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती नवनवे उच्चांक नोंदवत आहेत आणि त्याची टिंगल उडवणारी

व्यंगचित्रे आणि मिम्स ओसंडून वहात आहेत. पण दुसरे काही कुठे घडताना दिसत नाही. या कोविड काळात नागरी बेरोजगारीने कळस

गाठलाय आणि आरोग्य सेवांच्या प्रचंड कमतरतेपायी शहरा शहरातल्या कितीतरी कुटुंबांवर शोककारक प्रसंग कोसळत आहेत.

पण भारतातल्या middle class India मध्यमवर्गाची काही तक्रार आहे का? प्रत्यक्ष निदर्शने, रस्त्यावर उतरून केला जाणारा निषेध या मार्गाने त्यांचा राग

व्यक्त होत असल्याची काही चिन्हे कुठे दिसत आहेत काय? तर नाही!

मृत्यूमुळे उसळलेली चेतना

मे 2020 मध्ये जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीयाच्या हत्येनंतर अमेरिकाभर प्रचंड निदर्शने उसळली.

1964 साली नागरी हक्कासाठी झालेल्या आंदोलनानंतरची वांशिक न्यायासाठी झालेली ही सर्वात मोठी निदर्शने होती.

इथे मात्र नागरी middle class India मध्यमवर्गातील बहुसंख्य लोकांनी नागरिकत्वामुळे लाभलेल्या हक्कांवर पाणी सोडल्याचे दिसून येत आहे.

मायबाप सरकारची आपल्यावर कृपा रहावी म्हणून आपले स्वातंत्र्यच नव्हे तर आत्मसन्मानही खुंटीवर टांगण्याची त्यांची तयारी दिसते.

समाजात टोकाचे ध्रुवीकरण झालेले असून परस्पर विश्वासाला पूर्ण तडा गेला आहे. परिणामी शांतताप्रेमी नागरिकांच्या एकजुटीची शक्यता

जवळपास शून्य झालेली आहे. जामीन न देता किंवा खटलाही न भरता एखाद्याला तडकाफडकी अटक करण्यासारखे राज्यव्यवस्थेचे

व्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ले पाहून middle class India मध्यमवर्ग आता खवळत नाही. निव्वळ उदासीन आणि निरुत्साही झालेल्या या समाजाला कशाचे काही देणेघेणे नाही.

अर्थातच याला अपवाद आहेत. मध्यमवर्ग काही अगदी एकसाची नाही. हक्कांसाठी लढणारे, राजकीय कैदी म्हणून तुरुंगात खितपत पडलेले,

आणि आपले मतभेद नोंदवणारे बहुतेक सगळे मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतूनच आलेले दिसतात.

पण 75-77 दरम्यान आणीबाणीचे कौतुक करणाऱ्या मध्यमवर्गीयांप्रमाणेच आजही या वर्गाचा मोठा हिस्सा सत्तेपुढे लीन आहे.

2010- 11 च्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीत किंवा 2012 च्या निर्भया आंदोलनात नागरिक रस्त्यावर उतरुन शांततामय निदर्शने करत होते.

आज डोळ्यासमोर माणसे मरताहेत, नोकऱ्या जाताहेत अशी अत्यंत उद्वेगजनक परिस्थिती असूनही अशी काही निदर्शने होताना दिसत नाहीत.

सरकारच्या कृतीचा सरळ आणि प्रत्यक्ष परिणाम भोगावे लागणारे उपेक्षित समाजघटकच काय ते आज CAA-NRC विरुद्धचे आंदोलन किंवा

शेतकरी आंदोलन अशा चळवळींद्वारा काही लोकशाही कृती करताना दिसतात.

भारतातील आजचा भेकड मध्यमवर्ग आणि इतर देशातील मध्यमवर्ग यांत टोकाचा फरक आढळून येतो. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर अमेरिकेत वंशवादविरोधी प्रचंड आंदोलन उसळले. अगदी अलीकडे भ्रष्टाचारविरोधी, बोल्सनारोविरोधी आंदोलनाने ब्राझील ढवळून निघाला. नाही म्हणायला अशी चळवळ उत्तर भारतात शेतकरी आंदोलनाच्या स्वरूपात येथे दिसली. परंतु शेतकरी समाज मोठ्या संख्येने एकवटला असला तरी या आंदोलनात शहरी लोक मोठ्या प्रमाणात सामील होताना दिसले नाहीत. विविध कारणाने हे आंदोलन केंद्रस्थानीही आले नाही.

भारतीय middle class India मध्यमवर्गाच्या अशा निष्क्रियतेची कारणे कोणकोणती असतील? एक स्पष्टीकरण असे देता येईल की हा कोविडकाळ आणि आर्थिक तंगीमुळे लोकांच्यावर मुळातच इतका ताण आलाय की शांततापूर्ण सामुदायिक कृतीसाठी त्यांच्यात काही त्राणच उरलेले नाही. लॉक डाऊनच्या बंधनांमुळे लोक एकत्र येण्याला तर मज्जावच आहे. त्यापेक्षा सरळ एखादे ट्विट करणे किंवा फेसबुक बिसबुकवर एखादी पोस्ट टाकणे -प्रत्यक्ष कृतीला पर्याय म्हणून अशी घरबसली अभिव्यक्ती करणे – कितीतरी सोपे! शिवाय अनेक लोकांना विचाराल तर पंतप्रधान मोदी अद्याप लोकप्रियच आहेत. सांस्कृतिक बहुसंख्यांकवाद आणि विकासाचे वचन असे भारतीय मध्यमवर्गाचे रम्य स्वप्नालाच तर ते प्रतिसाद देत आहेत. मध्यमवर्गीय लोक मोदीभक्तीत आता इतके गुंतलेत की त्या दीर्घकालीन मोहपाशातून आपली सोडवणूक करुन घेणे त्यांना फार कठीण जात आहे. तसेही भारतीय मध्यमवर्गाला लोकशाही न जुमानणाऱ्या नेतृत्वाचे पूर्वापार आकर्षण आहे. CSDS ने 2008 साली घेतलेल्या पोलनुसार आपल्या देशात सांसदीय लोकशाहीऐवजी भारतीय नेतृत्व एखाद्या कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्याप्रमाणे व्यवस्थापकीय स्वरूपाचे असावे असे 51 % लोकांचे ठाम मत असल्याचे स्पष्ट झाले होते.

सर्वांना चिडीचूप करणारी आणखी एक गोष्ट घडत आहे. UAPA सारख्या अजामीनपात्र दहशतवादविरोधी कायद्याचा मनमानी उपयोग केला जात आहे. पिंजरा तोड आंदोलक किंवा दिशा रवी सारख्या पर्यावरण कार्यकर्त्यांना झालेली अटक प्रचंड भय पसरवत आहे. राष्ट्रद्रोही, आंदोलनजीवी, अर्बन नक्सल असे शब्दप्रयोग वापरून प्रबळ राजकारणी नेते प्रत्येक टीकाकाराला गुन्हेगार ठरवत आहेत. एक प्रकारची राजकीय पोकळीही निर्माण झालेली आहे : मध्यमवर्गाच्या उत्साहाला उधाण आणेल किंवा त्यांचा नायक ठरेल असा एकही प्रेरणादायी नेता आज अवतीभवती दिसत नाही.

देशवासीयच आपल्या देशबांधवांच्या बाजूने उभे रहात नाहीत असा निष्क्रीय middle class India मध्यमवर्ग ही आपणा सर्वांच्याच दृष्टीने एक धोक्याची घंटा आहे. दमनकारी राज्यव्यवस्था कोणाही एका नागरिकाच्या स्वातंत्र्यावर प्रहार करते तेव्हा आपणा सर्वांचेच स्वातंत्र्य धोक्यात येत असते. लोकशाहीत शांततामय विरोधाच्या हक्काला पर्याय असू शकत नाही. असा शांततामय विरोधच सरकारला सार्वजनिक स्वरूपाच्या निर्णायक वाटाघाटींसाठी प्रवृत्त करू शकतो. आणि नागरिकांच्या खऱ्या दुखण्यांवर एक सामाजिक वेदनाहारक म्हणून असा विरोध कामीं येतो. हॉंगकाँगचा अब्जाधीश नागरिक जिमी लाय याने साऱ्या हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले स्वतःचे स्वातंत्र्य पणाला लावले. आता भारतीय मध्यमवर्गाने समाजमाध्यमांच्या सुरक्षित, उबदार , सुखदायी कवचातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. न्यायदेवतेला आणि स्वातंत्र्यदेवतेला आज सुशिक्षित मध्यमवर्गाच्या बळकट आधाराची गरज आहे ही गोष्ट ध्यानी घेण्याची ही वेळ आहे. नागरिकत्वाची ही आव्हाने आणि ही संधी सुशिक्षित मध्यमवर्गाने आज स्वीकारली नाही तर मात्र केवळ विद्यार्थी, व्यंगचित्रकार आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन हेच काय ते आमच्या स्वातंत्र्याचे शेवटचे रक्षणकर्ते म्हणून उरतील.

~ सागरिका घोष

https://timesofindia.indiatimes.com/blogs/bloody-mary/a-question-for-the-indian-middle-class-why-so-silent/

( या लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत )

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
real estate law in India
real estate law in India – घर / फ्लॅट खरेदी करताना..
error: Content is protected !!
%d bloggers like this: