Mother  of shivaji raja
Mother  of shivaji raja
Mother  of shivaji raja

mother of shivaji raja  – राजांच्या मायेचे मंदिर

जिजाऊ - mother of shivaji raja

 mother of shivaji raja  –

राजांच्या मायेचे मंदिर

 

 

346 व्या स्मृतिदिनानिमित्त माँसाहेबांना कोटी कोटी प्रणाम

17/6/2021

शिवाजीराजे आता छत्रपती झाले होते. राज्याभिषेक जिजाऊंनी  Mother  of shivaji raja  अगदी जवळून पाहिला होता. राज्याभिषेकानंतर राजांनी खूप दानधर्म केला. त्यामुळे जिजाऊसाहेबांन खूप समाधान वाटले. राजांनी अन्नछत्र कित्येक दिवस चालू ठेवले होते, प्रत्येकाची विचारपूस करून प्रेमाने त्यांचे सन्मान केले ,आशीर्वाद घेतले. मंदिर आणि त्याची व्यवस्था लावून दिली. कायमचे पुजारी नेमले. हे सर्व पाहण्यासाठी जिजाऊंना देवाने भरपूर आयुष्य दिले होते. जिजाऊंना रायगडची हवा सोसवत नव्हती. त्यांना खूप थकवा वाटत होता.त्यांना आपल्या जीवाची आशा वाटत नव्हती. म्हणून राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी पालखीत बसवून मातोश्रींना रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला पोहोचविण्यात आले होते.

राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे  Mother of Shivaji Raja  होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचा प्राण होता. सर्वस्व होते. महाराजांचे दैवत होते. आई साहेबांची प्रकृती अतिशय नाजूक तोळामासा झाली होती. गडावरची थंड हवा, वारा त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी उत्तम वाडा पाचाड येथे बांधला होता. त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले होते लखलखत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कौतुक उन्हाळे राजा म्हणजे विष्णू अवतार शिवबाला विष्णू रूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले आता आणखी काय हवे होते त्यांना त्यांना काहीही नको होते पण महाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले. आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारत होते,’ आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?

आता कैचे येणे जाणे ?

आता खुंटले बोलणे !

हेची तुमची अमुची भेटी,

येथूनीया जन्मतुटी !

पाचाडच्या वाड्यात

Mother  of shivaji raja आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल ? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! आईसाहेबांचे वय आता उताराकडे लागले होते. त्यांना आता काय हवे होते? त्यांना काहीही नको होते .पण महाराजांना मात्र त्या हव्या होत्या. सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरवले होते. त्यावर आता दहा वर्षे आईसाहेब थांबल्या होत्या पण आता त्यांना कोण थांबविणार ? आई ! कसले हे विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत. जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही. जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे ! पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !

रायगड सोडून राजे पाचाडला आले होते.

Mother of shivaji raja जिजाऊंची प्रकृती पाहून राजांना शोक आवरत नव्हता. जिजाऊ म्हणाल्या,” शिवबा, हा शोक तुम्हाला शोभत नाही. तुम्ही आता लहान नाही. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितले, ‘आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिले नाही. मासाहेब तुम्ही जाऊ नका ! तुमच आम्ही ऐकलं .आम्ही राहिलो, त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात, ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. शिवबा आम्ही का जन्माला पुरलो ? मुलांचे करते पण पहात ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचे यश नाही का? आणि मी गेले तरी कुठे जाणार? देहाने गेले तरी मनाने इथेच आहे .आमच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्यात जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलेत तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहोत, हे तुमच्या ध्यानी येईल.” छत्रपती शिवरायांना घडवण्याचे सामर्थ्य फक्त जिजाऊंच्या मध्ये होते. आणि ते त्यांनी पार पाडले होते.

आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला .वर्षे, महिने ,आठवडे ,दिवस संपले .आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पाश पडू लागले. कोणाचेही ईथे काही चालत नाही .आई साहेबांनी डोळे मिटले ! श्वासोच्छ्वास संपला!चैतन्य निघून गेले! आईसाहेब गेल्या! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले.आईवेड्या शिवबाच्या आईसाहेब गेल्या. शिवनेरीवर अंगाई गाणार्या, लाल महालात लाड करणार्या, राजगडावर स्फूर्ती देणार्या, आणि रायगडावर आशीर्वाद देणार्या आई कायमच्या निघून गेल्या. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ?ज्यांना आई आहे ना, त्यांनाच ,- नाही , नाही ,- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल.

राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी म्हणजेच १७ जून १६७४ ज्येष्ठ वद्य नवमी , बुधवारी , मध्यरात्री रोजी पाचाड येथे Mother  of shivaji raja जिजाऊ साहेबांचे निधन झाले. वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत खडतरपणे कृतार्थ जीवन जगलेल्या जिजाऊंना आलेल्या मृत्यूने महाराजांचे सर्वस्व हिरावून नेले. राजांच्या शोकाला तर पारावरच उरला नाही. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले.

धन्यती जिजाऊ माऊली ज्यांनी शिवरायांसारख्या एका महान वीराला जन्म दिला व धन्यते छत्रपती शिवाजीराजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या राजमाता जिजाऊसाहेबांची कूस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरली.

स्मृतीदिनानिमित्त माँसाहेबांना कोटी कोटी प्रमाण.

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

More Stories
www.postboxindia.com
मनमोहन राजवाडा फलटण 
error: Content is protected !!