Mpsc world
Mpsc world
Mpsc world

Mpsc world च्या मायाजाळात, कर्जबाजार वस्त्या आन गाव गाळात !

MPSC world दोनदा यशस्वी देणाऱ्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या या घटनेनंतर mpsc मायाजाळ आहे का ? सुनील कदम यांचा विचारपूर्ण लेख

Mpsc World च्या मायाजाळात,

कर्जबाजार वस्त्या आन गाव गाळात !

 

MPSC World दोनदा यशस्वी देणाऱ्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या

या घटनेनंतर mpsc मायाजाळ आहे का ? सुनील कदम यांचा विचारपूर्ण लेख

 

 

Mpsc world हे एकमेव करिअर आहे असा गावाकडे सगळ्यांचा समज करून दिला गेला आहे, ही भयंकर मोठी चूक आहे,

याला पालक, peer force आणि खाजगी कलाससेस जबाबदार आहेत. वास्तविक MPSC world मध्ये जागाच मुळी किती असतात,

फक्त 400 च्या अलीकडे पलीकडे आणि या परीक्षेला बसतात किमान 5 लाख मुलं मुली. म्हणजे साधारणपणे लाखात 1 अशी

निवड होत असते. याला जबाबदार सरकार आहेच परंतु समाजाने आपली जबाबदारी झटकु नये. जे जे सरकार आलं ते या बाबतीत

बेदरकार च होतं व आहे पण समाज का एवढा बेदरकार आहे याचं कोडं नक्की आहे. लाखात एक आपलं मुल येऊ शकत का हा

विचार एकही पालक करत नाही, शिवाय ते करिअर करण्या करता आपल्याकडे तेवढे resources आहेत का हा विचार ही होतांना

दिसत नाही. इतर अनेक करिअर च्या संधी उपलब्ध असतांना केवळ प्रतिष्ठा म्हणून मुलांच्या डोक्यात हे करिअर करण्या बदल

जवळपास जबरदस्ती केली जाते. मुलं ही बहुतांश वेळा सहज पैसा आणि प्रतिष्ठा हेच समोर ठेवून या Mpsc world

करिअर कडे वेड्या सारखे धावत असतात आणि यातले फक्त 1 टक्का विध्यार्थी यशस्वी होतात.

आपल्याकडे करिअर संबंधी मार्गदर्शन करण्या बदल प्रचंड उदासीनता आहे, ग्रामीण भागात तर आहेच परंतु शहरात ही आहे.

येवढ्या सामाजिक संस्था असतात पण या क्षेत्रात काम करणाऱ्या खूप कमी असतात, अनेक उत्सवावर पैसे खर्च केले जातात परंतु

करिअर बदल मार्गदर्शन करणारे अत्यल्प आणि जे करतात तेही चुकीच्या पद्धतीने करतांना दिसतात, एखादा राजकारणी

आणायचा त्याच भाषण हारतुरे मग जयजयकार एवढं सगळं झाल्यावर जो वेळ मिळतो तेवढ्यात जो मार्गदर्शन करायला येतो

त्याला बिचाऱ्याला एखादा तास मिळतो त्यात ही अनेक अडथळे येत असतात. कार्यक्रम आपल्या नावावर लागण्या पुरता, तोंड

देखले असले कार्यक्रम उरकले जातात. पूर्ण वेळ यावर सेवाभावी पद्धतीने काम करणाऱ्या संस्था अत्यंत कमी आहेत. आपले

राजकारणीही प्रचंड उदासीन आहेत या विषयात.

मला इथं फक्त एक उदाहरण द्यायला खूप अभिमान वाटतो आणि ते उदाहरण येवढ्या साठी देणं गरजेचं आहे की त्यातुन प्रेरणा

घेता येईल. समाजाने व मुलांच्या आत्महत्या थांबवून त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करता येईल. 1924 मध्ये डॉ बाबासाहेब

आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना केली त्या काळात या संस्थेची चे कार्यक्रम आणि उद्धिष्ट काय होती तर

मॅट्रिक च्या मुलांची अभ्यासाची शिबिरे घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे, कोणता course घ्यावा या साठी मार्गदर्शन करणे, अभ्यासा

साठी लागणारे साहित्य पुरवणे थोडक्यात शिक्षण घेण्या करता लागणारे सर्वोतोपरी साहाय्य करणं हे या संस्थेची उद्धिष्ट आणि

कार्यक्रम होते जे डॉ बाबासाहेब स्वतः जातीने करून घेत होते. मुंबईत social league मध्ये ऑफिस सुरू केल्या नंतर

विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल टीम, क्रिकेट teams केल्या होत्या, मुलांनी लिहिलं पाहिजे म्हणून त्यांच्या साठी खास एक magazine

त्यांनी चालवल होतं. पुढे समता सैनिक दल याची उद्धिष्ट व कार्यक्रम पाहिले तर हेच होते, सेवाभावी संस्थांनी याच अनुकरण

करायला काहीच हरकत नाही नव्हे यातून प्रेरणा घेतलीच पाहिजे एरवी राजकारण, समाजकारण होतच असतं.

मला वाटतं यातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सहज थांबतील !

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
shambhu raje छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव
shambhu raje – छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव
error: Content is protected !!
%d bloggers like this: