Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Mumbai crime branch – NCB – अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिट

1 Mins read

Mumbai crime branch – NCB – अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिट

Mumbai crime branch – NCB – अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

 

 

21/9/2021

मा. पोलीस आयुक्त सो, बृहन्मुंबई यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मा.पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलिंद
भारंबे साो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विरेश प्रभु साो, मा.पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई श्री. दत्ता नलावडे साो, व मा.सहाय्यक पोलीस आयुक्त,
(अति.कार्यभार)पोलीस निरीक्षक, श्री. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७/०९/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटच्या पथकास प्राप्त
गोपनिय माहिती नुसार अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटच्या प्रभारी पोलीस निरीक्षक, लता सुतार व पोलीस पथक यांनी ‘हिंद सेना सामाजिक संस्था, सुलभ शौचालया
जवळ, घाटकोपर मानखूर्द लिंक रोड जवळ, सर्विस रोड लगत, घाटकोपरच्या दिशेने झाकिर हुसैन नगर, मानखुर्द, मुंबई ‘

या ठिकाणी कौशल्यपुर्ण रितीने सापळा लावून पाळत ठेवली असता “कोडेन फॉस्फेट” हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्सची मोठया प्रमाणात वाहतुक

आणि विक्री करणारा तस्कर नामे मुकेश राजाराम चौधरी, वय २७ वर्षे, धंदा- कफ सिरप बॉटल विक्री करणे, रा.ठि. रुम क्र. ०४, राजू किराणा स्टोअर्सच्या मागे,

बरफपाडा, विरार(पूर्व) जिल्हा पालघर हा त्याच्याकडील ‘कोडेन फॉस्फेट ‘ हा अंमली पदार्थ त्यावे गि-हाईकांना विक्री करण्याकरीता आला असता नमुद

पोलीस पथकाने त्यास शिताफीने पकडून त्याच्या ताब्यातुन “कोडेन फॉस्फेट” हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ
सिरपच्या एकुण २०० बॉटल्स किं. रु. ६०,०००/- च्या मिळुन आल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. नमुद इसमा विरोधात अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई येथे गु.र.क्र.
८३/२०२१, कलम ८(क), सह २२(क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे.

पोलीस कोठडी दरम्यान अटक आरोपीत याने गाळा क्र. ०२, साईकृपा चाळ, अंबे माता मंदीर रोड, बरफपाडा, विरार (पू) जि. पालघर याठिकाणी मोठया प्रमाणात कोडेन
मिश्रीत कफ सिरप बॉटलचा अवैधरित्या साठा करुन ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीत याने सदरचे गोडावुन दाखविल्याने दोन पंचांसमक्ष निवेदन पंचनाम्या अंतर्गत सदर
ठिकाणावरुन एकुण ७७०० “कोडेन फॉस्फेट” अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या बाटल्या किं. रु. २३,१०,000/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपी हा गेल्या दोन वर्षांपासुन कफ सिरप या अंमली पदार्थाची अवैधरित्या विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन यापूर्वी देखील त्याचे विरुद्ध विरार
पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ८९७/१८, कलम ८(क),२२(क)एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात त्याचे ताब्यात १०० बॉक्स अल्फ्राझोलम औषधी
गोळया अवैधरित्या मिळुन आल्या होत्या.

Also Visit : https://www.postboxlive.com

अटक आरोपी हा “कोडेन फॉस्फेट” हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स मोठया प्रमाणात मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये तस्करी, वाहतुक व वितरण करीत असल्याचे
तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी हा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कौशल्यपुर्ण कामगिरीमुळे अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या तावडीत मिळून आला.
“कोडेन फॉस्फेट” हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स हया “कोरेक्स” या नावाने प्रसिध्द आहेत. “कोडेन फॉस्फेट” हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरपच्या अति
सेवनाने मेंदुवर परिणाम होवुन रक्तदाब वाढतो. त्यामुळे अति झोप येणे, भूक न लागणे, हायपर होणे अशी लक्षणे व्यक्तींमध्ये येत असल्याने मारामारी, भोकसणे अशा प्रकारचे गुन्हे
घडतात. या सिरपचा वापर मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये विशेषतः शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द या झोपडपट्टी परिसरातील तरुण, मध्यमवर्गीय लोक सर्रासपणे करताना दिसुन
येत आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई श्री. दत्ता नलावडे साो यांचे मार्गदर्शनानुसार तसेच अ.प.वि.कक्ष, घाटकोपर युनिटचे प्र.पो.नि.
लता सुतार यांच्या अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक फरिद खान , पो.उप नि. सचिन पालवे, पो.उप निर. भालेराव, पो.उप नि. आनंदा पाटील, पो.ना.क्र.
०४०९५०/म्हात्रे, पो.ना.क्र. ०६०९९७/खराडे, पो.शि.क्र. ०८०२०६/उभाळे, पो.शि.क्र. ०९०७०१/शिंदे, म.पो.शि.क्र. ०९११०८/डुंबरे, पो.ना.चा.क्र. ९९०६३०/बडे, पो.शि.चा.क्र.
०९०१३०/जांभळे यांनी केली आहे.

नमुद गुन्हयाचा पुढील तपास प्र.पो.नि. लता सुतार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटचे सहा. पोलीस निरीक्षक, फरीद एच. खान हे करीत
आहेत.

 

 

postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!