Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRA

Police Station – पोलीस स्टेशन मध्ये खोटी तक्रार देणारे / घेणारे यांच्यावर कारवाई होणार.

1 Mins read

Police Station –  पोलीस स्टेशन मध्ये खोटी तक्रार देणारे / घेणारे यांच्यावर कारवाई होणार.

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

कल्याणकारी राज्याच्या निर्मिती साठी कायदे महत्वाची भूमिका बजावतात, कायद्याचे राज्य असेल तर समाजात दुही माजत नाही. समाज कायद्याच्या अमलाखाली असल्याने इथे प्रत्येकाला सुरक्षितपणाची भावना कायम राहते.

काळ बदलला तसे लोक बदलले. परिस्थिती, राहणीमान ,आणि सत्ता ( पैसा / मसल पावर ) या जोरावर गुंड/झुंड शाही वाढू लागली, कायद्याचा गैरवापर आणि पळवाटा समाजद्रोही लोक शोधू लागले, कायद्याचे रक्षक Police Station – पोलीस हे सुद्धा भ्रष्टाचार आणि फास्ट मनी च्या चक्कर मध्ये समाजात भक्षक म्हणून पण समोर आले.
अनेक निर्दोष लोकांना त्यांच्यावर अन्याय सहन करून घ्यावा लागला.

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

ईर्षा / अहंकार याच्यामुळे सूडबुद्धीने वागणारी समाजद्रोही Police Station – पोलिसांना पैसे/ लाच देऊन भ्रष्टाचार करत खोट्या एनसी / तक्रारी टाकण्याच्या प्रकरणांची वाढ होऊ लागली. हळूहळू परिस्थिती आणखी बदलत जात होती, सोसायटी , झोपडपट्टी, चाळीत आणि मनुष्य वास्तव्य करत असणाऱ्या ठिकाणी जुन्या भांडणाच्या कारणावरून, प्रॉपर्टी च्या वादावरून, जागेवरून, वहिवाटीवरून , थट्टा मस्करी सहन न झालेली, विचार न पटलेले, गाणी लावण्यावरून, सोसायटी सभेत कॉलर पकडल्यावरून अपमानित झालेले, अहंकार दुखावलेले, प्रॉपर्टी वादावरून, पैशाच्या
देवाण घेण्यावरून, अथवा वैयक्तिक कारणांवरून Police Station – पोलीस ठाण्यात खोट्या एनसी / आणि पॉस्को कायद्यांतर्गत अथवा विनयभंगाची तक्रार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करण्यात येते. काही वेळा अशा तक्रारी काही आर्थिक फायद्यासाठी पोलीस अधिकारी सुद्धा घेत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

जिथे न्याय अपेक्षित असतो त्या ठिकाणीच अन्याय सहन करावा लागतो, जे सहन करतात ते अनुभवातून शहाणे होतात आणि जे हा अन्याय नाही सहन करू शकत ते कधी कधी मृत्यूस कवटाळतात. कोणाच्या चुकीची शिक्षा नाहक निर्दोष व्यक्तीला भोगावी लागते.

या अशा काही भ्रष्ट Police Station –  पोलिसांच्या कर्म दरिद्री संस्कारांमुळे सामान्य माणसाला Police Station –  पोलीस स्टेशनची पायरी चढावीशी वाटत नाही, त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल याची शक्यता कमी होते.

या बाबत सविस्तर माहिती अशी, नुकतेच बोरीवली येथील आकार एंटरप्रायझेसचे भागीदार आमू शाह, दिपक शाह, किरण शाह हे गुन्हेगारी प्रवेत्तीचे बांधकाम व्यावसायिक बोरीवली रेल्वे स्थानकालगत असलेली जवळजवळ २५० कोटी रूपये किंमतीची सिंधी समाजाच्या ट्रस्टची मालमत्ता मयत लोकांच्या खोट्या सह्या करून हडप करण्याचा प्रयत्न मागच्या १५ वर्षांपासून करीत आहेत अशी तक्रार होती.

परंतू या ट्रस्टच्या मालमत्तेची काळजीवाहू व प्रस्तावीत विश्वस्त श्री. संजय छाब्रिया यांची सजगता व तत्परतेमूळे या समाजकंटकांना सदर मालमत्ता हडप करणे कठिण जात आहे. या समाजकंटक बिल्डरांनी त्यांच्या वाटेतील हा अडथळा दूर करण्यासाठी श्री. छाब्रिया यांच्यावर गुंडाकडून प्राणघातक हल्लाही करून त्यांना जबर जखमी करण्याचेही काम केलेले आहे. याआधीही त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवीण्याचाही प्रयत्न केलेला आहे.

परंतू तरीही या समाजकंटकांचा मालमत्ता हडप करण्याचा हेतू साध्य होत नसल्याने या बिल्डरांच्या सांगण्यावरून चारकोप Police Station – पोलिस ठाणे येथील काही भ्रष्ट पोलिस अधिकार्यांनी बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. संजय छाब्रिया यांच्या विरोधात एका समाजकंटक महिलेला हाताशी धरून POCSO अंतर्गत गुन्हा नोंद केला. जेणेकरून श्री. छाब्रिया यांना पाच- सहा महिने तुरुंगात ठेऊन खोट्या व बनावट दस्तऐवजांच्या आधारे न्यायालयीन आदेश प्राप्त करून या समाजकंटक बिल्डरला ही मालमत्ता हडप करणे सोपे होईल.

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

सदर गुन्हा नोंद केल्यानंतर त्याआधारे या षड्यंत्रात सामिल असलेले चारकोप Police Station – पोलिस ठाणे येथील भ्रष्ट पोलिस अधिकारी व कर्मचारी झुंडीने छाब्रिया यांच्या बोरिवली येथील राहत्या घराभोवती स्वतःची ओळख न सांगता संध्याकाळी अंधारात घिरट्या घालत राहीले व जबरदस्तीने घरात घुसून छाब्रिया यांचं अपहरण करून पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

ऍड. विजय कुर्ले यांनी मा. विशेष न्यायालय दिंडोशी येथे पोलिसांकडून मागणी होत असलेल्या पोलिस कोठडीसाठी घटनात्मक व कायदेशीर तरतूदी तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे याचा आधार घेत आक्रमकपणे विरोध केला व मा. न्यायालयानेही पोलिस कोठडी नाकारली. त्यानंतर लगेचच जामिनासाठी अर्ज करून मी श्री. छाब्रिया यांची सुटका केली.

या सर्व प्रक्रियेत श्री. छाब्रिया यांना कोणताही गुन्हा नसताना केवळ किचकट न्यायप्रणालीमूळे व मा. विशेष न्यायालयातील संवेदनहीन महिला न्यायाधीशामूळे जवळजवळ सात दिवस श्री. छाब्रिया यांना कोठडीत रहावे लागले.

सदर बाब ऍड. विजय कुर्ले यांनी मुंबईचे प्रामाणिक व कर्तव्यदक्षतेसाठी ख्याती असलेले मा. पोलिस आयुक्त श्री. संजय पांडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

मा. पोलिस आयुक्त श्री. संजय पांडे यांनी गंभीर घटनेची दखल घेत सदर प्रकरणी चौकशीअंती फौ. का. प्र.च्या कलम १६९ अंतर्गत ‘बि’ समरी दाखल करून श्री. छाब्रिया यांची या खोट्या गुन्ह्यापासून मुक्तता केली. सदर प्रकरणी संबधित समाजकंटक महिला, भ्रष्ट पोलिस अधिकारी व बिल्डर यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी या हेतूने ऍड. विजय कुर्ले पाठपुरावा घेत आहेत.

त्याचप्रमाणे व्यापक जनहीत लक्षात घेता POCSO या कायद्याचा दुरूपयोग होऊन भविष्यात इतर कोणीही निरपराध अशाप्रकारे खोट्या तक्रारी अथवा खोट्या गुन्ह्यात अडकू नये अशीच भावना राहावी.

यासाठी मा. पोलिस आयुक्त यांनी राज्यघटना व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना अधिन राहून अशाप्रकरच्या कोणत्याही गुन्ह्यांची पोलिस अधिकाऱ्यानी दखल घेताना प्राथमिक चौकशीची प्रक्रिया अवलंबून अशाप्रकारे खोटे गुन्हे नोंद होण्या प्रकरणी पोलिस उपायुक्त अधिकारयापर्यंत जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक नुकतेच जारी केले.

 

Police Station - Notice

Police Station – Notice

या परिपत्रकाप्रमाणे सदर अशा प्रकारच्या गुन्हयांत कोणतीही शाहनिशा न करता आरोपीस तात्काळ अटक केली जाते हे आता होणार नाही. तपासा दरम्यान
केलेली तक्रार खोटी झाल्याचे निष्पन्न झाल्यास व त्यानंतर आरोपीस कलम १६९ सीआरपीसी अंतर्गत डिस्चार्ज करण्याची कारवाई केली जाते.
तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अटकेमुळे निर्दोष व्यक्तीची आरोपामुळे नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेस धक्का लागतो व मोठया प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक / आर्थिक नुकसान होते. अशा गोष्टीना आळा घालण्यासाठी गुन्हा दाखल करतांना सदर प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त यांची शिफारस आल्यानंतर परिमंडळीय पोलीस उप आयुकत यांच्या परवानगी नंतरच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी
सूचना देण्यात येत आहे. परिमंडळीय पोलीस उप अयुक्त यांनी परवानगी वा निर्णय घेतांना मा. सर्वोच्च
न्यायालयांचे ललीता कुमारी प्रकरणातील न्यायनिर्णयाचे पालन होईल यावी दक्षता घ्यावी लागणार आहे.

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

Police Station –  पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यात समन्वयाची, न्यायाची , विश्वासाची भावना वाढीस लागावी हीच पोलीस आयुक्त यांची भावना आहे.
आर्थिक लाभ अथवा अन्य भौतिक लाभ यासाठी खोट्या तक्रारी / एनसी तसेच गुन्हे दाखल करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर यामुळे वचक राहणार आहे, आणि दोषींवर योग्य ती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे सामान्य जनतेला न्याय आणि विश्वास संपादन करण्यात या निर्णयाची महत्वाची भूमिका असणार आहे.

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!