Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

nagpur places to visit – नागभूमीचा प्यारे खान

1 Mins read

nagpur places to visit – नागभूमीचा प्यारे खान

 

nagpur places to visit – करोना रुग्णांचा ऑक्सीजन दाता,

नागभूमीचा प्यारे खान – समीर मणियार

 

 

करोनाच्या जीवघेण्या महामारीने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे. सुपरपॉवर मिरवणाऱ्या महाशक्तींनासुद्धा

करोनाने दाती तृण धरण्याची पाळी आणली आहे. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात अफाट प्रगती केली.

दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती झाल्याने माहितीचा विस्फोट झाला आहे. सारे जग मोबाईलमुळे एका हाताच्या

कवेत आले आहे. ग्लोबल खेडे झालेल्या जगात माणूस सध्या कमालीचा अस्वस्थ आहे. कारण करोनामुळे

उद्याचा दिवस, उगवत्या सूर्याचे दर्शन होईल की नाही अशा अनाठायी भिती जनमाणसांवर गारुड करीत आहेत.

सर्व धर्मांची धार्मिक स्थळे कुलुपबंद झाली आहेत. डरके आगे जीत आहे या प्रचंड तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर

आपण करोनावर मात करणार हा संकल्प तडीस न्यायला हवा. पण करोनाला सहज घेण्याची मानसिकता

आज अनेकांना जीवघेणी ठरत आहे.


Gretchen Handtasche - Discover Gretchen

मराठी साहित्य विश्वातील कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विष्णु वामन शिरवाडकर यांना शेक्सपिअरच्या किंग लियरने

मोहिनी घातली होती. रंगभूमीवर मुखवटे चढवून हयात घालविणाऱ्या बुजूर्ग कलावंत नटश्रेष्ठ अप्पासाहेब बेलवलकर

आणि त्यांची धर्मपत्नी कावेरी अर्थात सरकार यांची आयुष्याची संध्याकाळी त्यांच्याच पोटच्या मुलामुलीने केलेली

विमनस्क अवस्था नटसम्राट नाटकाने जगापुढे आणली. त्या नाटकातील दाहक वास्तव आणि आजच्या जमान्यातील

जन्मदात्या आईबापाशी त्यांच्या कुलदिपकांचा होणारा संवाद आजही वेगळा नाही. थकलेल्या वादळाला विसावा

घेण्यासाठी कोणी घर देता का घर हे वाक्य मनाला भिडून काळजाला हात घालते.

www.postboxindia.com

#प्यारेखान

 

तशीच अवस्था महाराष्ट्रात करोना बाधित झालेल्या रुग्णांची झाली आहे. कोणी बेड देता का बेड, श्वास

घेण्यासाठी प्राणवायू असलेल्या ऑक्सीजनचे नळकांडे देता का कोणी? कोणी रेमडेसिवीर अथवा टोसली झुंबाव

इंजेक्शन देता का? व्हेंटीलेटर असेल तर तेपण द्या, कृत्रिम श्वसनावर जगण्यासाठी असा धावा सुरु आहे. मनुष्य

जीव हा नश्वर आहे. याची पक्की माहिती असतानाही आपला लाखमोलाचा जीव वाचविणे, आणखी जगण्याची

इर्षा मनी बाळगणे आणि मृत्यू आपल्या कदापि येता कामा नये या एकाच विवंचनेत अनेकांची जगण्या


Gretchen Handtasche - Discover Gretchen

मरण्याची लढाई सुरु आहे. काहीही म्हणा करोनाच्या महाभयानक विषाणुने साऱ्या लोकांना एकाच पातळीवर

आणून ठेवले आहे. आता धर्म कुठला तो सोडा केवळ जीव वाचविण्याचा एकच धर्माचा आकांत पृथ्वीतलावर सुरु आहे.

अशात गेल्या आठवड्यात एक बातमी येते. ती बातमी असते विदर्भातील. nagpur places to visit नागभूमी

समजल्या नागपूरची. सध्या देशात भारतीय जनता पक्षाची चलती आहे. भाजपचा ब्रेन असलेल्या

nagpur places to visit राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले रेशीमबागसुद्धा नागपूरलाच आहे.

कैक पिढ्या अन्याय करणाऱ्या धर्माचे जोखड फेकऊन देत व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या महामानव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतरांचा साक्षीदार असलेल्या nagpur places to visit दिक्षा

भूमीसुद्धा या नागपूर शहरातच आहे. कापसाचे सोने पिकविणाऱ्या कापूस कोंड्याच्या गोष्टीपेक्षा

बोईंग ७३७ या अत्याधुनिक विमानाचे माहेरघर बनणाऱ्या nagpur places to visit मिहान प्रकल्पाची.

सध्या ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या आमच्या नागभूमीच्या नागपूरची. nagpur places to visit सूफी

परंपरेतील हजरत ताजुद्दिन बाबांच्या दर्गाहची, न्याय दानाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत निष्णात विधिज्ञ अथवा

व्यासंगी न्यायमूर्ती देणारी कायद्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या नागपूर शहराची.


Gretchen Handtasche - Discover Gretchen

महाराष्ट्रात सत्ताकारणाचे राजकारण अद्यापही सुरु आहे. मी पुन्हा येणारच असा युक्तीवाद काही केल्या

वास्तव स्वीकारायला तयार नाही. दिल है की मानता नही अशी अवस्था काही व्यक्तींची झाली आहे.

परिणामी नागपूर शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही मोडीत निघते की काय अशी परिस्थिती होती.

तथापि, विकासाचे प्रचंड व्हिजन असलेले व्यासंगी राजकारणी नितीन गडकरी यांनी जातीने लक्ष घातल्यामुळे

नागपूरची अवस्था आरोग्याच्या दृष्टीकोणातून चांगली होईल यात वाद नाही. सध्या ऑक्सीजनचा प्रचंड तुटवटा

जाणवत होता. अशात प्यारेखान नावाचा माणूस पुढे आला. प्रस्थापितांच्या भाषेत यवन म्हणा की मुस्लिम म्हणा.

नागपूरच्या प्यारेखान उर्फ प्रिय खान या व्यक्तीने ८५ लाख रुपये किंमतीचा प्राणवायू अर्थात ऑक्सीजन हा गंभीर

करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करुन दिला आहे. यापेक्षा माणुसकीचा धर्म कोणता मोठा असू शकतो.

 

Also Watch : खासदार डॉ. अमोल कोल्हे, विषय :- ऑक्सिजन

वैदर्भिय असलेला प्यारे खान हा व्यक्ती १९९५च्या सुमारास नागपूर nagpur places to visit रेल्वे स्थानकाबाहेर संत्री विकायचा. संत्री म्हणजे देशी दारु असलेल्या मोसंबी नारंगीमधील नव्हे. तर नागपूर शहराची ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या लिंबू वर्गिय फळातील संत्री या आंबट गोड फळाची प्यारेखान हा किरकोळ विक्री करायचा. अर्थात दोन बोटाची खळगी भरण्यासाठी.

नागपूरच्या ताज बाग परिसरातील एका चंद्रमौळी झोपडीत प्यारेखान यांचे कुटुंब डोक्याला निवारा हवा म्हणून राहत असे. एका झोपडीत प्यारे खानचा जन्म झाला. गरिबी खूप वाईट असते. हे जावे त्यांच्या वंशा त्यालाच कळत असते. प्यारेखान यांची आई लहानसे किराणा दुकान चालवित असे. तर त्यांचे वडिल गावखेड्यात जाऊन कपडे विकण्याचा धंदा करायचे. पण घराचा चरितार्थ चालविणे मुश्किल होत असते.

मग प्यारेखान यांनी नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात नागपूरची संत्री विकण्याचे काम सुरु केले. चांगले शिक्षण घ्यायची भारी हौस पण गरीबी आडवी आली. दहावीच्या परीक्षेत प्यारेखान नापास झाले. ऑटोरिक्षा हा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आईचे दागदागिने विकून आलेल्या ११ हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करुन ऑटोरिक्षा खरेदी केली. हा सिलसिला २००१ सालापर्यंत सुरु होता.

काही तरी मोठे काम करायला हवे असे प्यारेखान यांच्या मनी स्वप्न होते. पण पैशांचे सोंग कसे आणणार हा प्रश्न कायम होता. नातेवाईकांना ५० हजार रुपये उसनवार मागितले. तेंव्हा जिवलग नातेवाईकांनी चंद्रमौळी झोपडीच्या घराचे कागद तारण ठेवण्यास भाग पाडले. ते काही पसंद नव्हते. बँकांच्या दारात चकरा मारण्याचा उद्योग सुरु झाला. झोपडपट्टीत राहत असल्यामुळे बँकवाले कर्ज देत नव्हते. शेवटी २००४च्या सुमारास आईएनजी वैश्य बँकेने ११ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्या पैशातून प्यारेखान यांनी एक ट्रक विकत घेतला. तो ट्रक नागपूर ते अहमदाबाद मार्गावर मालवाहतूक करायचा.


Gretchen Handtasche - Discover Gretchen

आता नशीब फळफळणार असा भाबडा आशावाद असताना प्यारेखानच्या ट्रकला सहा महिन्यात अपघात झाला. आता ट्रान्सपोर्टचा धंदा सोडून दे बे असा सल्ला प्यारेखानचे मित्र आणि नातलग द्यायला लागले. पण प्यारेखान यांनी हार मानली नाही.

काळाचा महिमा अगाध असतो तो असा की प्यारेखान यांच्या अश्मी ट्रान्सपोर्टला काम मिळणे सुरु झाले. ट्रकचा काफीला वाढायला लागला. वाहतूक करणारे मनुष्यबळही वाढले. २०१३ साली भूतानला काही सामान घेऊन जाण्याचे मिशन त्यांना मिळाले. भूतानला जाणाऱ्या रस्त्यात एक अडथळा होता. त्या मार्गात १३ फूट उंचीचे प्रवेशद्वार होते. पण ट्रकची उंची १७ फूट होती. अन्य वाहतूकदारांनी हे काम घेण्यास नकार दिला होता. पण प्यारेखान यांनी ते काम आव्हान म्हणून स्वीकारले. भूतानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मार्गात असलेल्या त्या प्रवेशद्वाराखाली जमिनीचे खोदकाम करुन प्यारेखान यांनी माल भरलेला तो ट्रक तेथून सहीसलामत बाहेर काढला. आणि त्यांचा यशाचा दरवाजा उघडला गेला.

त्यांच्या वाहतूकदार कंपनीला पंख फुटले. भूतानसह नेपाळ आणि दुबईपर्यत प्यारेखान यांचा वाहतूक व्यवसाय वाढला. पाहता पाहता त्यांचे कंपनीचे अडीचशे ट्रक झाले. ७०० पेक्षा अधिक मनुष्यबळ त्यांच्या वाहतूक कंपनीत आहे. एका झोपडीत राहणाऱ्या माणसाचे कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचा आलेख वाढत राहिला. प्यारेखान नावाचा व्यक्ती हा वर्षाकाठी ६०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करु लागला. फाटक्या झोपडीत राहणारे प्यारेखान थेट कोट्याधीश झाले. सध्या पवित्र रमजानचा महिना सुरु आहे. मग प्यारेखान यांनी नागपूर आणि नागपूरच्या परिसरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर करोना रुग्णांच्या उपचारासाठी एका आठवड्यात ८५ लाख रुपये खर्च करुन ४०० मेट्रिक टन वैद्यकीय कारणासाठी लागणारे मेडिकल लिक्वीड ऑक्सीजन खरेदी करुन दान केले. आणि करोनाबाधित रुग्णांचा जीव वाचविण्याचे सत्कर्म केले. माणुसकी आणि मानवता या भूमिकेतून रमजानमध्ये जकात म्हणून संकटकाळात सर्व धर्मिय रुग्णांना ऑक्सीजन दान केले. त्यांची दानत वाखाणण्याजोगी आहे.

खूप गरज पडली तरी विमानाने ब्र्रुसेल्स येथून आणखी ऑक्सीजन टँक मागविण्याचा प्यारे खान यांचा प्लॅन आहे. प्यारेखान यांचे सध्या नेपाळ, भूतान, बांगलादेशसह भारतात सुमारे दोन हजार ट्रकचे नेटवर्क आहे. तातडीच्या काळात प्यारेखान यांनी दामदुप्पट नव्हे तर तिप्पट पैसै मोजून बंगळुरु येथे दोन क्रायोजेनिक गॅसचे टँकर नागपुरात आणलेले आहेत. अतिशय उच्च दर देऊन प्यारेखान यांनी ऑक्सीजन टँकरच्या प्रत्येक खेपेला १४ लाख रुपये मोजले आहेत. केंद्रीय मंत्री आणि जिंदादिल व्यक्तीमत्व असलेले नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे करोना रुग्णांचा लाखमोलाचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी देशाच्या विविध भागातून ऑक्सीजन आणण्याचे मिशन सुरु ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने छत्तीसगढ राज्यातूनही त्यांनी दोन ऑक्सीजनचे टँकर आणण्याचे काम केले आहे.

www.postboxindia.com

#प्यारेखान

सर्वशक्तीमान अल्लाह हा एकच ईश्वर असून, त्यापेक्षा कोणीही वरचढ नाही अशी इस्लाम धर्माची धारणा आहे. हजरत महंमद पैगंबर हे परमेश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत. दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे, आयुष्यातील एकदा हाज यात्रा करणे, आपल्या मिळकतीत अडीच टक्के मिळकत गोरगरीबांसाठी दरवर्षी दान करणे. त्यालाच जकात असे म्हणतात. कलमा, रोजा, नमाज, जकात आणि हाज या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्वाच्या मानल्या जातात. त्यात पवित्र रमजानमध्ये जनाब प्यारे खान यांनी जकातीपोटी ८५ लाख रुपयांचा प्राणवायू जकात ऑक्सीजन हे करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी देऊ केले आहे. यापेक्षा कोणता मानवता धर्म मोठा असू शकतो.


Gretchen Handtasche - Discover Gretchen

जगात अस्तित्वात आलेल्या सर्व धर्मांचा माणुसकी हाच एकमेव गाभा आहे. समाजातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण करणे, धर्माचा अथवा धर्मग्रंथांतील वचनांचा आधार घेऊन समाजातील नैतिकता आणि नैतिक धाक मनुष्य प्राण्यांवर निर्माण करणे. दुराग्रह अथवा पराकोटीची अस्मिता यापेक्षा परस्परांशी माणुसकीच्या नात्याने मानवी सहजीवन जगणे, प्रामाणिकपणा, वागण्या बोलण्यात पारदर्शकता आणि रंजल्या गांजलेल्या व्यक्तीची शक्य ती मदत करणे. धार्मिक कर्मकांडापेक्षा जिवंत असलेल्या हाडामासाच्या गोळ्याला म्हणजे दोन पायांच्या गरजू मानवाला त्याचा स्वाभिमान, शल्य, वैगुण्य न दुखावता अजाणतेपणाने निर्मळ मनाने मदत करणे. कोणालाही मदत करताना त्याचे अवडंबर माजविता कामा नये. आपले समाजभानाचे कर्तव्य म्हणून दानत अथवा दान करण्याची नम्र भावना मनाशी बाळगणे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. यामुळे मोठी संपत्ती, अफाट धन, श्रीमंतीचा बडेजाव यापेक्षा विनम्रपणे आयुष्याचा सदसदविवेकबुद्धीने सारासार विचार करुन मानवाला मिळालेले आयुष्य सत्कारणी लावण्याचे प्रयत्न करणे. यातच मनाला पराकोटीचे समाधान मिळते. हा माणुसकीचा धर्माचा ढोबळ अर्थ मानायला हरकत नाही.

नागभूमीतील ऑक्सीजन दात्या प्यारेखान उर्फ प्रिय खान यांच्या माणुसकीला, त्यांच्या दानत करण्याच्या दार्तृत्वाला लाख लाख सलाम. हिंदुस्थानातील गंगाजमना तहजीबचे प्यारेखान हे मूर्तिमंत प्रतिक आहेत.

 

 

 

समीर मणियार

 


Gretchen Handtasche - Discover Gretchen

Also Watch :

 

Leave a Reply

error: Content is protected !!