Indian national movement मेधा पाटकर
Indian national movement मेधा पाटकर
Indian national movement मेधा पाटकर

Indian national movement – जातऱ्या डाया गेला !

Indian national movement - मेधा पाटकर

history of India and Indian national movement – जातऱ्या डाया गेला !

 

 

Indian national movement – मेधा पाटकर

 

 

 

24/5/2021,


जातऱ्या डाया गेला ! नर्मदा किनाराच नव्हे तर आंदोलनाचा पसाराही सोडून! मणिबेलीच्याच भूमीत आपले तनबीज रोवून ! नर्मदा काठच्या ३३ गावांतील

सर्वात उंच माणूस हरपला! पण त्याची उंची ही केवळ शारीरिक नव्हती तर मानसिकही होती. त्याने ती आयुष्यभर जपली. गावात न कधी वाद न कधी

विसंवाद करणारा जातऱ्या डाया, जातर मगन वसावे, हा मणिबेलीच्या संघर्षाचे कारण बनला, त्यालाच सोडून गुजरातेत जमिनी एकतर्फा देऊन

शासक गावाची ‘उठाठेव’ करू लागले तेव्हा, त्याच्यासाठीच, त्याला सोडून कसे जाणार कसे मानणार, Indian national movement

हा प्रश्न गावकऱ्यांनी उठवला व शासनाला जवाब देणे भाग पाडले.

गेऱ्या, मगन अन् नोकट्या अशा तीन कूळप्रमुखांच्या कुटुंबियांचा मणिबेलीत होता, पिढ्यान्पिढ्या वसलेला भील परिवार. जातर, जेरमा, पारशी ही मगनची अपत्ये.

त्यांच्याही दोन पिढ्या निपजल्यानंतर मणिबेलीत सरदार सरोवर धरणाचे आक्रमण घुसले. त्यासमोर आपले जल, जंगल, जमीन वाचवण्याचा अहिंसक

सत्याग्रह मणिबेलीतच सुरू झाला. सगळी गावेच काय, पहाड व मध्य प्रदेशातील निमाड पट्टीचेही शेतकरी तिथे पोहोचले. देशभरातीलच काय, जगभरातीलही

काही! विश्व बँकेचे मोर्स कमिशन (स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पुनरावलोकन आयोग) ही मणिबेलीतच प्रथम अवतरले. पोलिसांची भरभरून ताकदही मणिबेलीतच लागली.

दोन आदिवासी मुलींची बेइज्जत करण्याबाबत पोलिसांशी संघर्ष झालाच. पण त्यांनी शूर्पणेश्वेर मंदीर जे मणिबेलीच्या हद्दीवर, देवनदी काठी,


महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर ठाण मांडून होते, तिथेच डेरा टाकला.

history of India and Indian national movement - जातऱ्या डाया
history of India and Indian national movement – जातऱ्या डाया

तेव्हा आम्हा सर्वांनाच भूमीगत होऊन आणि जातरडायासारखे सगळेच्या सगळेच गावकरी जेलमध्ये जाऊन लढत द्यावी लागली.

अखेरीस बायांनी पुढाकार घेतला. रात्री भूमीगत न राहता बैठका घेत, ताकद बांधली आणि एक दिवस साऱ्यांनीच पुढे येऊन पोलिसांचे बाडबिस्तरे

मंदिराच्याच काय, मणिबेलीच्या हद्दीबाहेर नेऊन ठेवले.


मणिबेलीच्या या संघर्षात जातरडाया हा नेहमीच silent initiator राहिला. गेंब्याडाया, ढेब्र्याडाया, सिंगाडाया, फुलजीडाया असे बुजुर्ग साथीला होतेच.

भाषणबाजीपासून दूर तरी गावाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वत्र हजर राहणारा जातरडाया हा मणिबेलीसाठी सतत आधारस्तंभ बनूनच राहिला.

गावाचे मुद्दे उठवत. सत्याग्रहाच्या काळात कुटुंबासह साथसोबत करत! मणिबेलीतच आंदोलनाशी कट्टर व अधिकारांसाठी विनम्र तरी ताठर

अशी तडवी समाजातील आदिवासी कुटुंबांचाही पाडा होता! या दोन जनजातींमध्ये गुजरात राज्यात अनेक भेद, मतभेद मात्र मणिबेलीने

याहीबाबत अभूत एकता दर्शविली. १९९० मध्ये मणिबेलीहून यात्रा निघाली व मुंबईला पोहोचली तेव्हाही सर्व भील, भिलाला, पावरा,

तडवी सारे मिळूनमिसळून! ठाणे शहरातील दलित समाजानेच रोटीपाणी देऊन स्वागत व सहयोग देत पुढे नेले.

तिथेच खबर पोहोचली ती पोलीसबळाने सर्वात खालच्या केसूभाईंच्या घरावर हल्ला केल्याची, त्यांच्या कुंताने दारात उभी राहून लढत देऊन

परतवल्याची, आंदोलनासाठी सर्व गावांनी मिळून उभारलेल्या कुटींच्या दारातली मोठ्ठी रायन तोडल्याची! त्याच क्षणी हुतात्मा चौकात उपोषण

जाहीर करून आम्ही बसलोच. ते १८ दिवस! या साऱ्या साऱ्यात सामील झालेल्या व्यक्ती, संघटनांना जातरडाया आठवतही असेल, नसेल.

मात्र या आदी-वासीने आपला हक्क बजावला, तो Indian national movement सात्याग्रहाचाच सर्वप्रथम!

१९९३ मध्ये पहिले बुडित आले त्यात १३ घरे मणिबेलीचीच बुडाली. जडीकाकीची गुरं तर नारायणभाईंचे दुकानही जलसैलाबात लुप्त झाले.

घरांचे वासे वर उचलून पुन्हा घरं काय, पाडे उभारण्याच्या काळात तडवी कुटुंबांना वसावे कुटुंबानी आसरा दिला. जातरडायाच्या

घरात नारायणभाईंचे कुटुंब प्रेमाने राहिले तेव्हा जातिनिर्मूलनाची गुढीच उभारली गेली. १९९४ मध्ये व २००० मध्येही जातरभाईंसह जालमा,

दामण, ढेब्र्याडाया सारे सारे बुडाले तरी आपला पूर्ण हक्क घेण्यासाठी आजही नर्मदेपासून उंचावर टिकून राहिले. खडतर जीवन जगत.

एकेकाचा हक्क मागत, घेत !


याच मणिबेलीच्या संघर्षाची गाथा दुनियेभर पोहोचली- विश्व बँकेच्या मिशनची पहिली भेट व आमच्याशी गाठभेटही तिथेच सर्वप्रथम झाली.

आणि स्पेनमध्ये, माद्रिद येथे विश्व बँकेच्या संमेलनाबाहेर या विश्वाच्या सावकाराला, त्यांच्या देशादेशात घुसून विकासाची दिशा बदलण्याच्या,

कर्जदारी वाढवण्याच्या कारभाराला प्रश्नचिन्ह लावणारे सारे ‘मणिबेली ठराव’ पारित करून चुकले ते तब्बल २००० संघटनांच्या साक्षीनेच नव्हे तर समर्थनाने!

अशा मणिबेलीपोटीच महाराष्ट्र सरकारला पुनर्वसनाची बाजू उचलून धरावी लागली. गावातला कुडीडुंगरही जंगलतोडीपासून वाचवावा लागला.

मात्र मणिबेलीतील काही कुटुंबे गुजरातला सर्वात आधी गेली व नंतरही दोन टप्यात! त्यांचे प्रश्नही गुजरात अजून सोडवत नाही व महाराष्ट्र

शासन गुजरातला वठणीवर आणू इच्छितच नाही.

धरणात सामील व भागीदारच नव्हे तर गुंतवणूकदार असूनही महाराष्ट्र न आपला विजेचा लाभ पूर्ण घेऊ शकत, न पुनर्वसनात झालेला आपल्या

आदिवासींवरचा अन्याय दूर करू शकत ! कुणाच्या नव्हे, मणिबेलीच्या पहिल्या इमानदार सरपंच राहिलेल्या नारायणभाईंच्या जमिनीवर मोठ्ठा झाडोरा

तोडत नाही तर सत्तरी पार केलेल्या मणिलालकाकांची खराब जमीन बदलूनही देत नाही. दामण गिंबाला दिलेली जमीन पुन्हा बळकाविण्याचे

कारस्थान कुणा अधिकाऱ्याच्याच संगनमताने चालू आहे तर नटवरभाईंना अजूनही सिंचन न दिल्याने, गुजरातमध्ये पूर्ण जीवन काढण्यासाठी जाणे शक्य नाही.

जातरडाया सुद्धा टांगून ठेवलेल्या आदिवासींपैकीच एक! प्रत्येकाचे काही केले, काही ठेवले. केल्याचा उद्घोषच काय, पूर्ण झाल्याची शपथपत्रे शासनाची.

तर उरलेल्यांची तळ लावून घेण्याची जिद्द नव्हे, चीकाटी आंदोलनाची! कुणाचे नाव कागदावर चुकले; कुणाची दिलेली जमीन शेतीसाठी निरोपयोगी ठरली;

तर कुणाला मालकाने कमीअधिक फसवले.


जातरडाया गेल्यावर रडून चालणार नाहीच! त्याची कहाणी व शासनाची विराणी सांगावी लागेल. त्याच्या सरख्यांच्याच संघर्षाने हजारोंना

पुनर्वसन मिळाल्याचे न नाकारता व त्याच्यासह अनेकांना शासनच कसे आयुष्यभर लढायला, तेही सनदशीर काय, अहिंसेच्या मार्गानेच भाग पाडते, ते समजावे व समजवावे लागेल!

जातरडायाला, त्याच्या दोन मुलांसह सातपुड्याच्या पायथ्याशी समतल क्षेत्रात, प्रकाशा (ता. शहादा) च्या शिवारात जमिनी मिळाल्या मात्र शासनाने

पाच पटीने किंमत देऊन विकत घेतलेल्या त्या जमिनीतील सिंचन साधन मालकाने काढून नेल्याचा आरोप करत जातरडायाच काय, सर्व कार्यकर्त्यांना

पुन्हा पुन्हा सांगावे लागले. प्रश्न सुटला नाहीच ! घरप्लॉटही जातरभाई व दोन जणांना आधी जवळच्या वसाहतीत पण स्मशानभूमीत देऊ पाहिला,

तो नाकारला. शेतजमिनिपासून सुमारे १० ते १२ कि.मी. दूर देऊ पाहिला. अखेरपर्यंत घरप्लॉट नाही म्हणून घर बांधणे नाही, म्हणूनच स्थलांतर नाही

व शेतीही भागीदारीने करवल्याविना गत्यंतर नाही. मालकाला शासनाने ५ टक्के रक्कम देणे बाकी म्हणून त्यांच्या धाकधमकी नाही

तरी सिंचन न देण्याच्या भूमिकेला आव्हान नाही ! मणिबेलीतही इतरही काही, जमीन देणे वा घरप्लॉट देणे बाकी असताना,

बुडित येणार म्हणून स्थलांतर कराच. अशा नोटीसा कुठल्या कायद्याखाली देते शासन-प्रशासन ?


महाराष्ट्राच्या Indian national movement मुख्यमंत्र्‍यांनी गुजरात, राजस्थान, म. प्रदेशच्या चार मुख्यमंत्र्‍यांच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या बैठकीत

जरी हिंमतीने “पुनर्वसन बाकी आहे व पूर्ण जलस्तरावर पाणी भरण्याची चूकच होती. मी सत्यवादीच भूमिका घेणार”,

हे सांगितले तरी तळागाळापर्यंत आणि जिल्हा पातळीवरही हे समजून गतिमानतेने व संवेदनेने काम पुढे नेणारे अधिकारी आम्ही शोधतच रहातो.

आदिवासी अधिकारीही जेव्हा आदिवासींवर अविश्वास दाखवतात किंवा एकेक वर्ष जमीन न मिळता व एकेक पाड्यावर पाणी न पोहोचवता

जगायला लावतात, तेव्हा काय म्हणावे, कुणाचे झालेल्या कार्याबद्दल कौतुक करावे अन् जातरडाया सारख्यांच्या वंचनेचा किती व कसा निपटारा करावा

तेच विचारात घेत लढावे लागते. व्यक्ती ते व्यवस्था, आपली दृष्टी व समष्टी- साऱ्याचा मेळ घालताना, जातरडायाला अग्नि देताना,

“जलादो इसे, फूंक डालो ये दुनिया. मेरे सामने से हटादों ये दुनिया.”, असेच भाव मनात पेटून उठतात.


तरी आपण जग भोगत, भीक न मागता हक्क मागत जगतोच.  ते जातरडायासारख्यांच्या, मणिबेलीच्याही प्रेरणेनेच !

 

मेधा पाटकर

Advertisement

More Stories
Sunil Datt भारतकुमार राऊत
Sunil Datt – भोला ‘पडोसन’ !
error: Content is protected !!
%d bloggers like this: