Nehru ji
Nehru ji
Nehru ji

Nehru ji – Nehru No More- Nehru Lives

Nehru ji - पंडीत जवाहरलाल नेहरु

Nehru ji – Nehru No More- Nehru Lives

Nehru ji – पंडीत जवाहरलाल नेहरु

 

 

 

 

27/5/2021,


27 मे 1964 रोजी सकाळी साडेसहा वाजता Nehru ji पंतप्रधान पंडित नेहरूंना हृदयविकाराचा मोठा झटका आला आणि ते कोमात गेले.

नेहरूंची मृत्यूशी झुंज चालू असतांना सारा भारत देश समजून गेला होता की आपल्या प्रिय राष्ट्रीय नेत्याबद्दलची अप्रिय अशी बातमी कधीही येऊ शकते.

अशा परिस्थितीत ‘ब्लिट्ज’ या वृत्तपत्राच्या कार्यालयात संपादक रुसी कारंजिया यांनी आपले महत्वपूर्ण स्तंभलेखक के ए अब्बास यांना बोलावून घेतले

व नेहरू वरील मृत्युलेख लिहावयास सांगितला. के ए अब्बास आपल्या केबिनमध्ये लेख लिहितच होते तेवढ्यात एक कर्मचारी आला व त्याने नेहरूंचे

निधन झाल्याची बातमी सांगितली. मृत्यूलेख लिहिल्यानंतर अब्बास यांनी आधी हेडलाईन लिहिली ‘Nehru Dies’ नंतर दुसरी हेडलाईन लिहिली

‘Nehru Ded’ नंतर तिसरी हेडलाईन लिहिली’Nehru No More’ नंतर त्यांनी या तीनही हेडलाईनवर रेषा मारल्या व नव्याने डेडलाईन लिहिली,

आणि दुसऱ्या दिवशी ‘ब्लिट्ज’ची हेडलाईन होती ‘Nehru Lives!’


'Nehru Lives
‘Nehru Lives

. पंडीत नेहरू Nehru ji यांचे निधन होऊन आज 57 वर्ष झाली आहेत पण के ए अब्बास यांनी दिलेली ‘Nehru Lives!’ हेडलाईन

किती सार्थ होती याची प्रचिती आपल्याला दररोज येते.

* लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांचा प्रचार पाहिला तर नेहरू हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटावेत

ऐवढी प्रचंड टीका पंडित नेहरू यांच्यावर झाली—Nehru Lives!


* सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांमध्येही पंडित नेहरूंनी आज मोठी जागा व्यापून टाकली आहे— ‘Nehru Lives!

* विसाव्या शतकात मृत्यू पावलेल्या नेहरूंवर एकविसाव्या शतकात जन्मलेल्या भारतीय तरुणाईचा एक मोठा वर्ग नेहरूवर प्रचंड टीका करतो

आणि दुसरा मोठा वर्ग नेहरूंचे अभ्यासपूर्ण असे भरभरून समर्थनही करतो—Nehru Lives!

* आज कोणताही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अथवा प्रादेशिक प्रश्न आपल्यासमोर उभा राहिल्यानंतर पंडित नेहरू यांचा

अपरिहार्यपणे संदर्भ येणार म्हणजे येणारच—Nehru Lives!

. ब्रिटनचा राजा मृत्यू पावल्यानंतर ” राजा मृत्यू पावला! राजा चिरायू होवो!” असे म्हटले जाते. याचा अर्थ हा होतो की,

राजा ही व्यक्ती मृत्यू पावली परंतु राजपद चिरायु होवो! Nehru Lives! ही हेडलाईन पण हीच भावना व्यक्त करते की,

‘नेहरू ही व्यक्ती मृत पावली असली तरी नेहरू विचार हा चिरायू राहणार आहे.’

आधुनिक भारताचे शिल्पकार असलेल्या नेहरूंनी राष्ट्रबांधणीसाठी, आपल्या राष्ट्रांतर्गत राजकीय सामाजिक आर्थिक व्यवहारासाठी

आणि परराष्ट्र व्यवहारासाठी, आंतरराष्ट्रीय जगतात वावरण्यासाठी एक मूलभूत वैचारिक व मूल्यात्मक चौकट दिली आहे.


ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्याच्या निकालामध्ये हे स्पष्ट केले आहे की, “संविधानामध्ये कालानुरूप बदल करण्याचा

अधिकार संसदेला असला तरी भारतीय संविधानाची मूलभूत चौकट मोडता येणार नाही.” तसेच राष्ट्रनिर्माणासाठी व परराष्ट्र व्यवहारासाठी

कालानुरूप असे अनेक फेरबदल आपल्या राज्यकर्त्यांना जरुर करता येतील परंतु नेहरूंनी दिलेल्या मूलभूत वैचारिक व मूल्यात्मक

चौकटीला तडा जाईल अशी कृती करता येत नाही.

*सुरुवातीपासून नेहरूंच्या अलिप्ततावादावर टीका करत अमेरिकेच्या मैत्रीचे समर्थन करणाऱ्यांना, ‘हाऊडी’ आणि ‘नमस्ते’ चे

इव्हेंट साजरे करणाऱ्यांनाही कळते भारत संकटात असताना अमेरिका लशीच्या कच्च्यामालाचा पुरवठाही काही काळ थांबवते

परंतु रशियाची स्फुटनिक लस भारताला सहज उपलब्ध होते—Nehru Lives!

* आयटी सेलच्या माध्यमातून कितीही standwithisrael असे ट्रेंड चालवले तरीही भारत सरकारला मात्र अधिकृतरीत्या पॅलेस्टाइनचेच

समर्थन करावे लागते— Nehru Lives!
* निवडणूक प्रचारसभेच्या व्यासपीठावरून नेहरूंची कितीही बदनामी केली तरीही संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय

व्यासपीठावर पंडित नेहरुंचेच नाव घ्यावे लागते—Nehru Lives!

ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थींची राख विमानातून भारतभूमीवर पसरवण्यात आली आहे,


तो नेहरु आजही जिवंत आहे,
इथल्या मातीच्या कणाकणात!
इथल्या माणसाच्या मनामनात!

मरते हम तुम है
नेहरू नही मरते.
#NehruLives!

 

 

 

 

 

पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विचार व कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन !

 


 

 

प्रा. विशाल रावसाहेब पतंगे
राज्यशास्त्र विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
satara police
Satara स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई
error: Content is protected !!
%d bloggers like this: