never give up meaning
never give up meaning
never give up meaning

never give up meaning – कधीही  हार  मानू  नका

never give up meaning - कधीही  हार  मानू  नका

never give up meaning – कधीही  हार  मानू  नका

 

 

never give up meaning – कधीही  हार  मानू  नका

 

 

रचना तिच्या ऑफिसच्या प्रोजेक्ट वर काम करत होती. सुरवातीलाचं  आता करू, मग करू  असं  तीचं चालू  होतं. त्यात पण मध्ये अजून एक-दोन महत्वाची कामं आली, मग हे प्रोजेक्टचं काम होतंय  की  नाही ,जमेल की  नाही करत सुरवात तर केली. पण मग जाऊ दे जमणारच नाही म्हणत तिने तो  प्रोजेक्ट आपल्याला नको म्हणतं आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला दिला. आपल्या जमणार नाही हे आधीच का मनात   येतं ? never give up meaning एका प्रकारे आपल्याला जमणार नाही म्हणजे हरण्याची भीती का वाटते बऱ्याच जणांना ? काम करण्या आधी फक्त विचारांनी हरायचे ?

आपण झाडासाठी बी लावल्यावर त्याला अंकुर फुटून ते मोठं होण्यासाठी, रुजण्यासाठी जोपासण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. कुठलीही गोष्ट ही  काही  झटपट होत नाही. त्यासाठी आपल्याला वेळ,मेहनत ,विश्वास आणि संयम ह्यची गरज असते. यश ,अपयश ह्या पैकी आपल्याला कशाचा ही सामना करावा लागेल. महत्वाचे असतात ते आपले  प्रयत्न ! अपयश स्वीकारण्याची तयारी हे सुद्धा आपल्या आयुष्याचा भाग असतो. पण अपयशाच्या विचाराने कामं सोडून देणे हे काही उत्तर नव्हे. आपण आपल्या कामासाठी आपले १००% देणे जरुरी आहे.  जमणार नाही ,होणार नाही ,जाऊ दे,नकोच करायला असं स्वतःशी बोलून, मनात ठरवून आपण स्वतःचं खच्चीकरणं करू नये आणि इतर कोणी केले तर सरळ दुर्लक्ष करावे. धरपकड वृत्ती ही आपल्याला काहींचं साध्य करू  देतं नाही. हार /जीत पेक्षा महत्वाचं असतं आपले उद्देश,ध्येय  ह्यावर आपले लक्ष्य केंद्रित करणे. never give up meaning काम करताना अडचणी /अडथळे नक्कीच येतील पण त्याला सामोरं जाऊन  त्यावर उपाय शोधायला हवा .

1. मनातल्या अपयशाच्या भीतीला खत -पाणी घालण्यापेक्षा आपल्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला हे सांगा की  मी काही झालं तरी माझे प्रयन्त सोडणार नाहो.

2. वेळ द्या , धीर धरा, हिंमत सोडू नका.

3. अपयश आले , तर सोडून देऊ नका ,परत सज्ज व्हा , कामाला लागा.

4. हवं तर थांबा, ब्रेक घ्या पण काम चालू  ठेवा .

5. आपण अगदी ध्येय गाठण्याच्या टप्य्यावर असतो ,तेव्हा लक्षात असू देतं अजून थोडंच काम बाकी आहे

6. जर आपल्याला अपयश जरी आले तरी त्यातून आपण शिकतोच ना ? ते महत्वाचे.

7. सोडून देणे तर खूपच सोपं आहे ,कठीण असतं ते पुढे जाणं .

8. अपयशाची भीती मनात ठेऊन कामं करू नका.

9. अडचणी / अडथळे हे काही आपण टाळू शकत नाही.त्याचा सकारात्मकतेने सामना करणं हे कधीही चांगलं . 

10. कुठलाच मार्ग हा साधा, सोपा, सरळ नसतो. आपला स्वतःचा दृढनिश्चय आपल्याला मदत करतो पुढे जाण्यासाठी.

11. कारणं  सांगून ,सबबी सांगून स्वतःला मागे ओढू नका. वेळ कठीण  असेल पण ,ती पण जाईल हे लक्षात ठेवा.

12. काम सोडून देणे हे अपयश असू शकतं , हार  मानू नका ,काम करत राहा.

13. संघर्ष हा तर असणारचं ,तेव्हा स्वतःला आपल्या कामासाठी प्रेरित ठेवा.

14. एखादं काम जमत नसेल तरी आपले  प्रयत्न चालू ठेवा ,कणखर व्यक्ती सहजा -सहजी हार मानत  नाही.

15. काम पूर्ण करेपर्यंत ते अशक्य  / अवघड नकीच वाटू शकतं ,पण एकदा ते साध्य झालं तर तुम्हाला अरे हे तर  जमण्यासारखंचं होतं ,त्यात काय असं नक्की वाटेल.

16. समस्यांचं समाधान  असतं ते फक्त आपल्याला शोधायचा असतं.

समाजा, तुम्ही नोकरी  शोधता आहात तर पहिल्याचं  प्रयत्नात नोकरी मिळेल असं नाही.मग काय तुम्ही नोकरी शोधणे सोडून द्याल का ? नाही ना ? प्रयत्न करत राहाल ,जोपर्यंत  नोकरी मिळत नाही. म्हणजेचं  कोण काय बोलतय, म्हणतंय ? ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याला काय हवय त्याकडे लक्ष्य द्यावं.

 

हार /अपयश ह्याला का घाबरायचं  ?

हार के आगे जीत है .

लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती

हेचं लक्षात ठेवायचं

 

postboxindia.com
www.postboxindia.com
मेघना धर्मेश

9321314782

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
commissioner of police pune
commissioner of police pune – पोलिसांची मोठी कारवाई
error: Content is protected !!
%d bloggers like this: