LPG Gas Booking एलपीजी गॅस ग्राहकांचे हक्क ! माहिती करून घ्या.

LPG Gas Booking नवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता काय प्रक्रिया आहे ?

 
LPG Gas Booking एलपीजी गॅस ग्राहकांचे हक्क

LPG Gas Booking  जर एजन्सी चालक तुम्हाला शेगडी घेण्याची सक्ती करीत असेल तर तुम्ही तेल कपंनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच कंपनीच्या बेवसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवावी . संपर्क साधू शकता . तसेच आपल्या तालुक्यातील शिधावाटप अधिकारी वा तहसील कार्यालयातील पूरवठा अधिकारी यांच्याकडेही तक्रार करू शकता .

25/11/2021,

LPG Gas Booking  एलपीजी गॅस ग्राहकांचे हक्क !

LPG Gas Booking  गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेणे बंधनकारक नाही !

सिलेंडर घेताना ते वजनकाट्यावर तोलून घ्या कॅश अँड  कॅरी केल्यास १५ रूपये रिबेट मागा दोन बुकींग दरम्यान २१ दिवस थांबण्याची गरज नाही . दोन वर्षातून एकदा शेगडी ट्युब रेग्युलेटर तपासणी करणे आवश्यक ती करून घ्या .

कोणतीही तक्रार असल्यास गॅसकंपनीच्या अधिकाऱ्यास संपर्क करा .

वेबसाईटवरुन ऑनलाईन तक्रार करा .

http://www.hindustanpetroleum.com/LPGHome 

http://www.ebharatgas.com/ 

http://indane.co.in/


प्रश्न : नवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता काय प्रक्रिया आहे ?

उत्तर : आपल्या निवासाच्या जवळ असलेल्या घरगुती गॅस वितरकाकडे LPG Gas Booking  नवीन गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करता येईल . तसेच नवीन गॅस कनेक्शनकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे .

भारत पेट्रोलियम कंपनीसाठी www.bharatpetroleum.com इंडियन ऑईल कंपनीसाठी spandan.indianoil.co.in व पेट्रोलियम कंपनीसाठी www.hindustanpetroleum.com या लिंकचा वापर करावा .

प्रश्न : नवीन घरगुती गॅस कनेक्शन मिळणेसाठी किती रक्कम भरावी लागेल ? 

उत्तर : १ एका गॅस सिलेंडर करिता - रूपये १,४५० / - ( अनामत रक्कम ) २. दोन गॅस सिलेंडर करिता- रूपये १ , ४५० / - प्रती सिलेंडर याप्रमाणे २ , ९ ०० / - ( अनामत रक्कम ) - ३. रेग्युलेटरसाठी- रूपये १५० / - ( अनामत रक्कम ) या सर्व भरलेल्या पैशाची पावती मिळते . या किंमती जूलै २०१४ अखेरच्या आहेत . यापेक्षा अधिक रकमेची मागणी केली असल्यास गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन रक्कमेची खातर जमा करावी .

प्रश्न : के . वाय . सी . म्हणजे काय ?

उत्तर : के . वाय . सी . ( Know Your Consumer ) म्हणजे ग्राहकाचे निवासाचा व ओळखीबाबतची माहिती नमूद असलेला तसेच ग्राहकाचे वैयक्तिक माहितीचा तपशील असलेला फॉर्म आहे.

प्रश्न : के . वाय . सी . फॉर्म भरणे आवश्यक आहे का ? 

उत्तर : आपणाकडे एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन किंवा वेगवेगळया कंपनीची एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन असल्यास आपणास के वाय . सी . फॉर्म भरणे आवश्यक आहे . त्यासाठी निवासाचे व ओळखपत्राचे पुराव्यासह फॉर्म भरणे आवश्यक आहे .

प्रश्न : के . वाय . सी . फॉर्म कोठे मिळेल ?

उत्तर : के . वाय . सी . फॉर्म आपले विभागातील वितरकाकडे मोफत उपलब्ध आहेत .

प्रश्न : घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी कोठे संपर्क साधावा ?

उत्तर : घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी एल.पी.जी. ग्राहक सहाय्यता केंद्र ( LPG Customer Service Cell ) किंवा जवळचे एल . पी . जी . कंपनीचे क्षेत्रिय कार्यालयात संपर्क साधावा . तसेच आपण तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता किंवा कंपनीच्या हेल्पलाइन ऑइल इंडस्ट्री : 18002333555 ( टोल फ्री ) , भारत पेट्रोलियम : 020-26345141 / 42 , 26342176 , हिंदुस्थान पेट्रोलियम : 020-26213104 / 05 आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन : 020-26332661 

प्रश्न : गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती झाल्यास संपर्क कोठे साधावा ?

उत्तर : गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे तात्काळ मदत केंद्र ( Emergency Service Cell ( ESC ) ) येथे संपर्क साधावा . गॅस रिफील पावतीचे मागील बाजूस तात्काळ मदत केंद्राचे ( Emergency Service Cell ( ESC ) ) दूरध्वनी क्रमांक नमूद आहेत . यासाठी सिलेंडर भरून घेताना गॅस एजन्सीकडून मिळालेली एक पावती जपून ठेवावी .

प्रश्न : नवीन गॅस कनेक्शन घेतेवेळी गॅस शेगडी व गॅस विषयक इतर साहित्य वितरकाकडून घेणे बंधनकारक आहे का ?

उत्तर : नाही तुम्ही गॅस वितरकाव्यतिरिक्त अन्य दुकानातून ISI प्रमाणित गॅस शेगडी खरेदी करू शकता . तुम्ही बाहेरून शेगडी घेतल्यास गॅस एजन्सीचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन व्हेरीफिकेशन करतो त्यांची योग्य ती फिस भरावी व पावती घ्यावी . गॅस एजन्सीकडून शेगडी घेणे बंधनकारक नाही असा फलक एजन्सीच्या कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेतून लावला पाहिजे असा शासन आदेश आहे . गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गॅस वितरकांचे नाव पत्ता संपर्क क्रमांक गॅस / तेल कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव पत्ता संपर्क क्रमांक ई मेल अॅड्रेस इत्यादी तपशील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे .

Hindustanpetroleum
Hindustan Petroleum Corporation Ltd. | Oil and Gas Company in India | HPCL

HPCL is a Government of India Enterprise with a Maharatna Status, and a Fortune 500 and Forbes 2000 company.

LPG Gas Booking  जर एजन्सी चालक तुम्हाला शेगडी घेण्याची सक्ती करीत असेल तर तुम्ही तेल कपंनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच कंपनीच्या बेवसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवावी . संपर्क साधू शकता . तसेच आपल्या तालुक्यातील शिधावाटप अधिकारी वा तहसील कार्यालयातील पूरवठा अधिकारी यांच्याकडेही तक्रार करू शकता . प्रश्न : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा मोटार सायकल , गिझर इत्यादी करिता वापर करता येईल का ? उत्तर : एल . पी . जी . नियंत्रण कायदान्वये घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा मोटार सायकल , गिझर इत्यादी करिता वापर करण्यास प्रतिबंध करणेत आला आहे . मोटार सायकलमध्ये Auto LPG चा वापर करू शकता . तथापि , घरगुती सिलेंडरचा वापर स्वयंपाकाचे इंधन ( cooking fuel ) म्हणूनच मर्यादित आहे .

 येथे दिलेली माहिती ही तेल / गॅस कंपन्यांनी नागरिकांच्या माहितीस्तव प्रकाशीत केलेल्या सीटीजन चार्टर चा आधार घेऊन संकलीत केलेली आहे . जर गॅस एजन्सी चालक असे काही कायदेशीर नियम आहेत हे मान्य करीत नसेल तर गॅस एजन्सी चालकांना तसे लेखी मागा . म्हणजे त्यांच्याविरोधात तेलकंपनीकडे कारवाई करण्यास एक पुरावा राहिल .

Also Visit : https://www.postboxlive.com

इकबाल शेख 

मानवी अधिकार सामाजिक कार्यकर्ता