मानवाचे आरोग्यविषयक हक्क काय आहेत ? माहिती करून घ्या

आरोग्य हा प्रत्येक मानवाचा हक्क असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेने जाहिर केले होते.

 
मानवाचे आरोग्यविषयक हक्क

मानवाला इतर सर्व हक्कांप्रमाणेच आपले आरोग्य उत्तम ठेवण्याचे हक्क प्राप्त झाले आहेत . त्यासंदर्भातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही बाबी करण्यात आल्या होत्या .

25/11/2021,

मानवाचे आरोग्यविषयक हक्क ७ एप्रिल , १९४८ रोजी सर्वांसाठी आरोग्य हा प्रत्येक मानवाचा हक्क असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेने जाहिर केले होते .

मानवाला इतर सर्व हक्कांप्रमाणेच आपले आरोग्य उत्तम ठेवण्याचे हक्क प्राप्त झाले आहेत . त्यासंदर्भातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही बाबी करण्यात आल्या होत्या .

त्याचे विवेचन पुढीलप्रमाणे आहे .

१ . मानवी हक्काचा जाहिरनामा : १९४८ - संयुक्त राष्ट्रसंघटनेने मानवी हक्काचा जाहिरनामा प्रसिद्ध केला . त्यातील कलम क्र . २५ मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की ,

जगातील प्रत्येक व्यक्तीला तिच्या आरोग्यासाठी स्वत : च्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी योग्य जीवनमान राखणे गरजेचे आहे व चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार असणे हे गरजेचे आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे .

२ . स्रियांचा आरोग्यविषयक हक्क : जागतिक मानवी हक्कांच्या जाहिरनाम्यातील १२ व्या कलमामध्ये स्रियांविषयी असणारे सर्व भेद संपुष्टात आणले गेले असून , स्रियांना पुरुषांप्रमाणेच आरोग्याचा समान हक्क देण्याचे मान्य करण्यात आले .

१२ व्या कलमातील

( अ ) मध्ये आरोग्य क्षेत्रातील स्री - पुरुष भेद नष्ट करण्याचे उपाय करण्यात येतील . कुटुंब नियोजनात पुरुषांप्रमाणेच स्रियांनाही हक्क राहतील असे नमूद करण्यात आले .

( ब ) स्रियांच्या गर्भावस्थेत , बाळंतपणात आणि प्रसूतिउत्तर कालावधीत स्रियांना मोफत सेवा मिळण्याचा हक्क राहील .

त्याचप्रमाणे गर्भावस्थेच्या कालावधीत व बालकाला दुग्धपान सुरू असण्याच्या कालावधीत महिलांना योग्य व सकस आहार पुरविण्यात येईल .

३ . बालकांच्या आरोग्याचे हक्क - बालकांच्या वाढत्या वयाप्रमाणे चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा त्यांना मिळणे हासुद्धा त्यांचा हक्क आहे .

त्यासंबंधीच्या पुढील तरतुदी आहेत .

१ . बालमृत्यूच्या प्रमाणात घट करणे .

२ . सर्व बालकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे .

३ . प्रसूतिपूर्व व प्रसूतिनंतर मातांसाठी योग्य असा आरोग्यविषयक कार्यक्रम राबविणे .

४ . आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विकास करणे .

५ . मनोरुग्ण आणि त्यांच्या आरोग्याचे हक्क - इतर सर्व व्यक्तींप्रमाणेच मनोरुग्णांनासुद्धा आरोग्याचे हक्क मिळणे आवश्यक आहे . त्याकरिता वैद्यकीय सविधा आणि शारीरिक उपचार पद्धती मिळण्याचा त्यांचा हक्क आहे . त्यासाठी योग्य शिक्षण , प्रशिक्षण , पुनर्वसन , आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे . अपंगांचे आरोग्यविषयक हक्क - इतर व्यक्तींप्रमाणेच अपंगांनाही त्यांच्या आरोग्यविषयक हक्क मिळणे गरजेचे आहे .

ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत .

१ . शारीरिक , वैद्यकीय आणि मानसशास्रीय इ . उपचार मिळण्याचा हक्क .

२ . कृत्रिम अवयवरोपण करून घेण्याचा हक्क .

३ . व्यावसायिक प्रशिक्षणाचा हक्क .

४ . त्यांचे पुनर्वसन करणे .

Postbox India