भाड्याने गाडी घेणारेच निघाले चोर ! ​​​​​​​

नेवासा पोलिसांनी केले चार जण गजाआड

 
नेवासा पोलिसांनी केले चार जण गजाआड

नेवासा :- भाड्याने गाडी घेऊन गाडीचीच चोरी करणारे चार आरोपी नेवासा पोलिसांनी गजाआड केले

25/11/2021,

(आदित्य सुकाळकर सा.पोलीस तपास प्रतिनीधी नेवासा तालुका)

नेवासा:- भाड्याने गाडी घेऊन गाडीचीच चोरी करणारे चार आरोपी नेवासा पोलिसांनी गजाआड केले
याबाबत अधिक माहिती अशी की
दि .१९.११.२०२१ रोजी दिपककुमार हरिश्चंद्र गुप्ता वय- ३० वर्षे धंदा ड्रायव्हर रा.सांताकुन मुंबई यांना
( स्विष्ट कार एमएच -०२ सीआर -७६४२) जस्ट डायल वरुन फोन आला की मुंबई ते औरंगाबाद भाडे आहे आरोपिंच्या मोबाईलवरून फोन आल्याने सायंकाळी ०७.०० या सुमारास तीन इसमांना गाडीमध्ये बसवुन वांद्रे येथुन दि 20/11/2021 रोजी औरंगाबाद ला जात असतांना गाडी। सायंकाळी ५ वाजता सुमारास अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतं हांडीनिमगाव शिवारात आली असता फिर्यादी गाडीचे ड्रायव्हर गाडीला चावी तशीच
ठेऊन लघुशंका करण्यासाठी खाली उतरला असता आरोपीनी सदर गाडी चालु करुन गाडी चोरुन नेली अशी फिर्याद
नेवासा पोलीस स्टेशन गुरनं ८८८/२०२१ भादवो ३७९,३४ प्रमाणे दाखल करण्यात आली होती

सदर गुन्ह्याचा अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर यांचेकडील मोबाईल सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत
असतांना सदर आरोपो पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत चोरलेली स्विफ्ट कार फिरत असलं बाबत माहिती मिळाली असता
सपोनि ज्ञानेश्वर थोरात , पो ना अशोक कुदळे. पो कों अंबादास गिते केवल रजपुत , संजय माने यांनी पाटोदा पोलीस स्टेशन पोलीस नाईक एन ए माने तसेच पोकॉ जो व्हो सानप यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला तेव्हा गुन्ह्यात चोरलेल्या स्विष्ट कार सह रिजवान मोहम्मद पटयण (वय .३० वर्षे रा निरगुडी ता.पाटोदा जि.बीड) महेश रामकृष्ण आघाव (वय ३५ वर्षे रा – खांकरमोह ता.शिरूर कासार जि – बीड) वागवान अफताव वागवान रहीमुद्दीन (वय २३ वर्षे रा प्रकाश आंबेडकर नगर वार्ड क्र -२५ बीड
जुबेर मुसा भागवान( वय २१ वर्षे रा . टाफरवन ता . माजलगाय जि . बीड )यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपी क्र ०१ व ०२ यांनी त्याच्या इतर एका साथीदारासह सदरची गाडी चोरुन आरोपी क्र.०३ व ०४ यांना विक्री करत असतांना पकडले आहे.
सदर आरोपीना न्यायालयात हजर केले असता आरोपीना ०५ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली

आरोपीकडून अशाच प्रकारे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील . अहमदनगर, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे . श्रीरामपुर . उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पो नि बाजीराव पोवार सपोनि ज्ञानेश्वर थोरात , सपोनि माणिक चौधरी, पोसई नितीन पाटील,पोसई समाधान भाटेवाल , पो ना अशोक कुदळे. बबन तमनर, बाळासाहेब कोळपे, पो को अंबादास गिते, केवल रजपुत , संजय माने अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर सायबर सेल यांचे कडील पो ना फुरकान शेख तसेच पाटोदा पोलीस स्टेशन कडील पो ना एन माने व पो कॉ जी. सानप यांनी केली.

Postbox india