Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

ज्वेलर्सच्या दुकानात रू. 30,42,000/- किंमतीच्या दागिण्यांची चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलीस ठाणेकडुन अवघ्या सहा तासांत अटक. crime branch investigation

1 Mins read

ज्वेलर्सच्या दुकानात रू. 30,42,000/- किंमतीच्या

दागिण्यांची चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलीस ठाणे

( crime branch investigation ) अवघ्या सहा तासांत अटक.

 

पवई पोलिसांची ( crime branch investigation ) पोलिसी खाकीला शोभेसी अशी दर्जेदार कामगिरी

17/6/2021

दिनांक 16.06.2021 रोजी पवई पोलीस ठाणे हद्दीतील तुंगा गाव येथील “रिया गोल्ड” या सोन्या चांदीचे दुकानाचे मालक श्री अशोक कुमार काळुराम मांडोत यांनी पोलीस
ठाणेस येऊन कळविले की, त्यांचेकडे नमुद दुकानात काम करणारा इसम नामे हिरालाल लेहरूलाल कुमावत, वय 26 वर्षे, रा.ठि. गाव चोकडी, ता. रेलमगरा, जि. राजसमंद, राज्य
राज्यस्थान हा दुपारी 14.00 वा. ते 14.30 वा. चे दरम्यान एकटाच दुकानात असताना दुकानातील काचेचे शोकेश लोखंडी मुसळीने फोडुन आतमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र,
कर्णफुले, पेंडेंट, चैन असे एकुण 676 ग्रॅम वजनाचे दागिणे, अं.कि.रू. 30,42,000/- ची लबाडीने चोरी करून घेऊन गेला अशा फिर्यादीवरून पवई पोलीस ठाणेस गु.र.क्र. 354/2021,
कलम 381 भादविसं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे घटनास्थळी ताबडतोब मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 10,
श्री महेश्वर रेड्डी, व.पो.नि. आबुराव सोनवणे, पो.नि. संतोष सावंत व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. विनोद पाटील यांनी भेट देऊन नमुद आरोपीताबाबत माहिती घेऊन मा. पोलीस उप
आयुक्त, परिमंडळ – 10, मुंबई यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स.पो.नि. विनोद पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास ( crime branch investigation ) करून त्याने

एक खाजगी ट्रॅव्हेल्स कंपनीकडुन
पवई ते राजस्थान येथे जाण्यासाठी एक इनोव्हा मोटार कार क्र. HR 55 U 8472 ही बुक केली असल्याची माहिती मिळवुन त्या आधारे सदर आरोपी गाडीसह राजस्थान येथे पळुन जात
असताना कासा पोलीस ठाणे, जि. पालघर यांचे मदतीने त्यास कासा येथे स.पो.नि. विनोद पाटील व पथक यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले व आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेली
वरिलप्रमाणे संपुर्ण मालमत्ता पंचनाम्या अंतर्गत हस्तगत करून सदरचा गुन्हा सहा तासात उघडकीस आणला.

आरोपी याचेवर खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 114/2021, कलम
381 भादविसं अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून तो दिनांक 20.05.2021 रोजी जामिनावर बाहेर आला आहे. सदरची उत्कृष्ठ कामगिरी डॉ. महेश्वर रेड्डी, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ
10, मुंबई, श्री मुकुंद पवार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग, मुंबई, श्री आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पवई पोलीस ठाणे, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली

crime branch investigation
पोलीस निरीक्षक संतोष सावंत, स.पो.नि. विनोद पाटील, पो.उ.नि. यश पालवे, विजय पाटील, सुधाकर वेलदोडे, पो.ह.क्र. 33455/ संतोष देसाई, पो.ना.क्र. 4925/बाबू येडगे,
पो.ना.क्र. 01276/नितीन खैरमोडे, पो.ना.क्र. 01488/ ब्रिजेश पवार, पो.ना.क्र. 03467/ गलांडे, 040325/प्रदिप जानकर, पो.ना.क्र. 060836/अभिजीत जाधव, पो.शि.क्र.
080190/अंबादास चौगुले, पो.शि.क्र. 111096/प्रशांत धुरी यांनी केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

powai police crime branch investigation

Powai police crime branch investigation

 

अंजनी मिश्रा

 

error: Content is protected !!