space research – क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’

space research – क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ. बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ space research – पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचे संशोधन 16/10/2021, क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भर पडली असून क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्त रित्या केलेल्या संशोधनामुळे या ग्रहांचा शोध घेण्यासाठी माणसाला मदत होणार आहे, अशा संशोधना मुळे रेडिओ सिग्नलच्या The post space research – क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
space research – क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’

space research – क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ. बेंजामिन पोप

आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’

 

space research – पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचे संशोधन 

 

16/10/2021,

 

क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’

संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भर पडली असून क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्त रित्या केलेल्या संशोधनामुळे या ग्रहांचा शोध घेण्यासाठी माणसाला मदत होणार आहे, अशा संशोधना मुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर ,आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह (exoplanets) शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

या space research संशोधनात विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल. आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ताऱ्यांची निर्मिती होत असते अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात. त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्त्रोत म्हणजे गुरु आणि शनी सारखे जे मोठे ग्रह. अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश (Aurorae) तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होत असते. तेव्हा ग्रहांपासून मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होते. असं असतांना काही लाल लहान तारे ( ताऱ्यांचा एक प्रकार, आपल्या सुर्यापेक्षा लहान आकाराचे तारे ) यांच्याकडून रेडिओ सिग्नल मिळत असल्याचं संशोकांच्या लक्षात आलं. Low Frequency Array ( LOFAR ) या रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी संशोधन आणि निरिक्षणे केल्यावर संशोधकांच्या लक्षात आलं की हे रेडिओ सिग्नल संबंधित तारे उत्सर्जित करत नसून या ताऱ्या भोवती फिरणारे ग्रह फेकत आहेत. थोडक्यात सूर्यमालेत असलेल्या गुरु – शनि ग्रहांप्रमाणेच हे रेडिओ सिग्नल तयार होत असल्याचं स्पष्ट झाले आहे. आकाशंगंगेतील एकुण १९ लाल लहान सूक्ष्म ताऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी चार सूक्ष्म ताऱ्यांकडून हे रेडिओ सिग्नल येत असल्याचे दिसून आले. म्हणजेच या ताऱ्यांभेवती ग्रह तेही पृथ्वीसदृश्य ग्रह ( ज्या ग्रहांवर वातावरण आहे ) असल्याचं ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात सुद्धा नमूद  आहे.

अशा सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्यासाठी अवकाश क्षेत्रातील संस्थांनी विविध क्षमतेच्या खास दुर्बिणी या पृथ्वीबाहेर – अवकाशात पाठवल्या आहेत. यासाठी  नासाची हबल अवकाश दुर्बिण ही अवकाशात स्थिरावली आहे. अशा दुर्बिणींद्वारे विविध तरंगलांबीच्या माध्यमातून ताऱ्यांचा अभ्यास करत पृथ्वीसदृश्य ग्रह हे शोधले जात आहेत. थोडक्यात पृथ्वीवरुन सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधणे ही एक अशक्य गोष्ट होती. मात्र आता पृथ्वीवरुनच रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. यामुळे भविष्यात आणखी पृथ्वीसदृश्य ग्रह शोधले जाऊ शकतात आणि वैज्ञानिकांना यावर आपले संशोधन करणे सुद्धा उपयुक्त ठरणार आहे.

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

Postbox India

The post space research – क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड मधील ‘राष्ट्रीय वेधशाळा’ appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything