objectives of communication
objectives of communication
objectives of communication

objectives of communication – मुलाखतीला सामोरे जाताना..

objectives of communication - मुलाखतीला सामोरे जाताना

objectives of communication –

मुलाखतीला सामोरे जाताना

 

 

objectives of communication – मुलाखतीला सामोरे जाताना

 

 

 

बिनधास्त बोला !

आज आपण दररोजच्या पण महत्वाच्या मुद्द्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. भाषा मग

ती लिहण्याची असू देत को बोलण्याची आपल्या मनात त्याबद्दल नाही म्हटलं तरी प्रश्न असतातचं.

असं म्हणतात की बारा कोसावर भाषा बदलते,भागाप्रमाणे भाषा बदलते. महाराष्ट्राचं उदाहरण

घ्यायचं झालं तर बघा ना मुंबई,कोकण,विदर्भ,मराठवाडा ,खान्देश प्रत्येक भागाच्या भाषेची एक

खासियत आहे,objectives of communication लहजा आहे. एखादा विशिष्ट शब्द ऐकला की लगेच

तुम्ही इथले का हो ? असं अगदी सहज विचारलं जातं. आपण कॉर्पोरेट विश्वाच्या दृष्टीनेच भाषेचं काय महत्व

आहे ते बघूया. जेव्हा आपण नोकरीसाठी एका शहरातून /गावातून दुसरीकडे जातो तेव्हा नक्कीचं आपली

बोली भाषा objectives of communication ही वेगळी असते. आपण आलेल्या भागातल्या भाषेचे

शब्दप्रयोग म्हणा किंवा बोलण्याची पद्धत नकळतपणे वापरली जाते . तेव्हा एक लक्षात ठेवायचं शक्यतो

आपण आपल्यापरीने शुध्द्व बोलायचा प्रयत्न करायचा. वाटतं ते बिनधास्त बोला हे मनात ठेवायचं. आपल्या

भाषेला /बोलण्याला कोणी हसतील ,नाव ठेवतील हा विचार केला तर तुम्ही स्वतःचं तुमच्या प्रगतीच्या मध्ये याल.

समजा ऑफिसमध्ये महत्वाच्या विषयाची मिटिंग सुरु आहे. सर्वाना आपापले विचार/मत मांडायला सांगितले आहे.

तुमच्याकडे अतिशय वेगळी संकल्पना आहे पण माझं बोलणं शुद्ध नाही हा तुम्हीच पूर्वग्रह करून घेतल्यामुळे

तुम्ही काहींचं बोलत नाही. नुकसान तुमचंच होणार कारण आलेल्या संधीला तुमच्या मनातल्या भीतीने गमावलं.

आपण इंग्लिश सुद्धा मराठी बोलल्या प्रमाणे नकळतपणे बोलतो. इथे पण आपण स्वतःचं सराव करून आपले

उच्चार जास्त परिपूर्ण आणि स्पष्ट(perfect and clear) कसे होतील ते बघितलं पाहिजे. मराठीत आपण पेन

जरा ताणून म्हणजे पे… नं असं बोलतो मग इंग्लिश मध्ये सुद्धा तसंच बोललं जातं. त्या पेन चा अर्थ मग लेखणी

नाही तर पेनं (pain)म्हणजे वेदना असा होतो . अनावश्यक शब्दाला ताणल्यामुळे उच्चार चुकीचा होऊ शकतो.

बऱ्याचदा इंग्लिश शब्दाचा उच्चार करताना कुठेतरी मातृभाषेची छाप जाणवतेचं . नक्कीच आपल्या सर्वाना

आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो ,असावा पण कॉर्पोरेट जगात पुढे जाताना हे लक्षात असू द्या objectives of

communication बिनधास्त बोला ! शुद्ध बोला ! मित्रांनो ,इथे हे लक्षात घ्या प्रत्येक भागातली भाषा ही वेगळी

असणारचं ,आपला प्रयत्न हा शुद्ध बोलण्याचा असावा.आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून स्पष्ट आणि शुद्ध

बोलायला शिकायचा सराव नक्की करता येईल.आपल्या शब्दांच्या उच्चारावर स्वतःचं काम करा . मनातला

भाषेचा न्यूनगंड काढून टाकणे महत्वाचे आहे.आपला शब्दसंग्रह वाढवणे,विविध विषयाचे ,भाषेचे पुस्तकं वाचणे,सराव

आणि सराव हे सर्व नक्कीच तुम्हाला भाषेचा आत्मविश्वास मिळवायला मदत करतील . ऐकणे, बोलणे, वाचन करणे

आणि लिहिणे ह्याचा पण फायदा चांगल्या भाषेच्या संस्कारासाठी जरुरी आहे. स्वतःच्या सर्वागीण विकासासोबत

आपली भाषा आपल्या कॉर्पोरेट वाटचालीसाठी महत्वाची आहे हे विसरू नका !

 

 

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]
 
postboxindia.com
www.postboxindia.com

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
sant sarvadnya dasopant maharaj
sant – संत सर्वज्ञ दासोपंत महाराज विनम्र अभिवादन 
error: Content is protected !!
%d bloggers like this: