महाराष्ट्रात या नेत्याने कोरोना काळात केला आपला अनुभव व्यक्त. वडिलांचा जनसेवेचा वारसा जपला.

महाराष्ट्रात कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार सध्या काय करत आहे, मुख्यमंत्री रस्त्यावर का नाहीत, बाकीचे मंत्री काय करत आहेत असे प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवणाऱ्या विरोधी पक्षाच्या धेंडांना ना महाराष्ट्र द्रोही फडफडणवीस ला सुद्धा कोणी विचारत नाही. मुख्यमंत्री योग्य रित्या परिस्थिती हाताळत असल्याचे पाहून अनेक विरोधकांच्या बुडाला आग लागली आहे. सरकार मधील अनेक नेते या विरोधकांच्या टीकेला उत्तर देत वेळ वाया घालवत नाहीत ते जनता पाहात आहे.

शिवसेनेवर अनेकदा टीका करून सतत लक्ष्य ठरलेले जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

हे सर्व सुरळीतपणे असताना महाविकास आघाडीतील तरुण नेत्यांमध्ये लोकप्रिय नेते विश्वजीत कदम यांनी आपला अनुभव प्रत्यक्ष शेअर केला. यात त्यांनी आपलया वडिलांचा अर्थात मा. पतंगराव कदम यांचा वारसा कसा आपण जगत आहोत आणि पुढे कसा घेऊन जाणार याचा जनतेला दाखला दिला.
त्यांनी व्यक्त केलेला अनुभव त्यांच्याच शब्दात जसाच्या तसा.

 

वसा जनसेवेचा 

कोरोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांना कोरोनायोद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आपल्याला युद्धभूमीवर, म्हणजेच प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर येतो !

कालचा अनुभव अजूनही माझ्या मनात घर करून आहे. पुण्यातील माझ्या भारती हॉस्पिटलमध्ये थेट कोरोना वॉर्डात जाऊन मी डॉक्टर, नर्सेस आणि पेशंटसमवेत संवाद साधला. साधारण ४० ते ४५ मिनिटे या वॉर्डात मी पीपीई किट घालून होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे कोरोना योद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी !

कुणाच्या घरी चिमुकली आपल्या आईची वाट पाहत असेल, तर कोणाचे कुटुंबीय काळजीने त्रस्त असतील. पण, या कोरोना विरोधातील लढाईत स्वतःच्या जिवाची, परिवाराची तमा न बाळगता या डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे सेवाकार्य गेले वर्षभर अथकपणे सुरू आहे.

भारती हॉस्पिटल व वैद्यकीय सेवांचे जाळे उभारताना आपल्या स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा संस्कार दिला होता. आज पीपीई किटमधील देवदूत हाच जनसेवेचा वसा मनोभावे आचरत आहेत. त्यांच्या कार्याला माझा पुन्हा एकदा मनापासून सलाम !
जनसेवेच्या या संस्काराला सर्वतोपरीने पुढे नेण्याचा, त्याला पाठबळ देण्याचा निर्धार मीदेखील या निमित्ताने पुन्हा व्यक्त करतो !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here