Our Philosophy
Our Philosophy
Our Philosophy

Our Philosophy चार्वाकवाद – आस्तिकवाद नास्तिकवाद

Our Philosophy आस्तिकवाद नास्तिकवाद

Our Philosophy चार्वाकवाद – आस्तिकवाद नास्तिकवाद

 

Our Philosophy आस्तिकवाद नास्तिकवाद

 

 

4/7/2021

आस्तिकांना वाटते की नास्तिकवाद हा मूळ भारतीय नव्हे. पाश्चिमात्यांचे अनुकरण करणार्‍या कांही तथाकथित पुरोगाम्यांनी हे फॅड तिकडून आणले. या मतात सत्याचा लवलेश नाही. प्रा.सदाशिव आठवले लिखित Our Philosophy“चार्वाक: इतिहास आणि तत्त्वज्ञान ” या प्रबंधात म्हटले आहे, “इ.स.पूर्व 3000च्या काळात जेव्हा ऋषींनी पहिल्या वहिल्या ऋचा रचल्या त्या काळापासून भारतात “लोकायत” नावाने नास्तिकव अस्तित्वात आहे. पाश्चात्य देशांत तो नंतर प्रसृत झाला.
समाजात बहुसंख्य माणसे श्रद्धाळू असतात हे खरे. तरी काही विशेष प्रज्ञावंत व्यक्ती समाजात सर्वकाळी असतात. ती स्वयंप्रज्ञ माणसे ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, मानत नाहीत. गतानुगतिक नसतात. त्यांची बुद्धी जात्याच सत्यान्वेषी (सत्याचा शोध घेणारी)असते. ते श्रद्धांची चिकित्सा करतात. देव, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, मोक्ष, अशा काल्पनिक गोष्टी त्यांच्या बुद्धीला पटत नाहीत. यातून निरीश्वरवाद उदयास येतो येतो. वेदकाळी बृहस्पती हे बुद्धिमंतांचे मेरुमणी होते. ऋग्वेदात त्यांचा उल्लेख “लौक्य” (बहुजनांशी संबंधित असलेले) असाही आहे. ते नास्तिकवादाचे आद्य प्रवर्तक. म्हणून नास्तिकवादाला बार्हस्पत्य म्हणतात. या Our Philosophy तत्त्वज्ञानाला लोकायत असेही नाव आहे.
यानंतर इ.पू.500 च्या काळात चार्वाकांचा उदय झाला. त्यांनी बृहस्पतींचे लोकायतदर्शन नव्या सुसंबद्ध, लिखित स्वरूपात मांडले. पण तो मूळग्रंथ आज उपलब्ध नाही. चार्वाक निरश्वरवादी दार्शनिक होते. ते वेदनिंदक म्हणूनही प्रसिद्ध होते.
कांही चार्वाकतत्त्वे:-
..
1)विशिष्ट: देह एवात्मा। न ततोSन्यो विलक्षण:।
[शरीरातील विशिष्ट भाग म्हणजे आत्मा. देहाहून वेगळा असा अलौकिक आत्मा नाही.]

2) परलोकयायी जीव: प्रत्यक्षेण नानुभूयते. परलोकिनोSभावात्परलोकाभाव:।
[माणसे इहलोकाहून भिन्न अशा परलोकी जातात असा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. परलोकगामी माणसांच्या या अभावामुळे परलोक अस्तित्वात नाही हे ओघानेच आले.]
..
3) त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा:।
जर्भरी, तुर्फरीत्यादि पंडितानां वच: स्मृतम् ।
[वेद रचणार्‍यांना तीन विशेषणे लावता येतील.अश्लील-असभ्य बोलणारे, लुच्चे-लबाड आणि चोर. कांही ऋचापंडितांनी योजलेले जर्भरी, तुर्फरी असे ग्राम्य, असभ्य शब्द तुम्हांला आठवतच असतील.]
.
4) अग्निहोत्रं, त्रयो वेदा, त्रिदंडं भस्मगुंठनम्।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृनिर्मिता।
[अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंडी संन्यास, सर्वांगाला भस्म फासणे, या गोष्टी मतिमंद आणि कर्तृत्वहीन माणसांसाठी आहेत. त्यांच्यासाठी ब्रह्मदेवाने ही उपजीविकेची साधने निर्माण केली असे म्हणा हवे तर.]
.
5) पशु: चेत् निहतो स्वर्गे ज्योतिष्टोमे गमिष्यति।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्नहिंस्यते?।
[ज्योतिष्टोम यज्ञात बळी दिलेला पशू जर स्वर्गात जात असेल तर यज्ञ करणारा यजमान आपल्या पित्याचा बळी का देत नाही? ( पित्याला अनायासे स्वर्गप्राप्ती होईल की !)]
.
6) ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहित्स्त्विह।
मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्।
[आणि हे सगळे विधी ब्राह्मणांनी आपल्या उपजीविकेसाठी-पोटे भरण्यासाठी-रचले आहेत. नाहीतर मृतासाठी इथे असले निरर्थक प्रेतसंस्कार कदापि प्रचलित झाले नसते.]
.
7) न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिक:।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायका:।
[स्वर्ग अस्तित्वात नाही. पारलौकिक अशा आत्म्यालाही अस्तित्व नाही. म्हणून मोक्षही नाहीच . चार वर्ण आणि चार आश्रम यांत करावयाची जी कर्मे सांगितली आहेत ती केली असता कोणतीही फलप्राप्ती होत नाही. ती कर्मे निष्फळ आहेत.]

 

 

यशवंत वालावलकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
swami vivekananda death anniversary
swami vivekananda death anniversary स्वामी विवेकानंद
error: Content is protected !!
%d bloggers like this: