पॅलेस्टाईन समर्थक तरुणीचे हे गाणे सध्या जगभरात वायरल होत आहे.
पॅलेस्टाईन समर्थक तरुणीचे हे गाणे सध्या जगभरात वायरल होत आहे.
पॅलेस्टाईन समर्थक तरुणीचे हे गाणे सध्या जगभरात वायरल होत आहे.

पॅलेस्टाईन समर्थक तरुणीचे हे गाणे सध्या जगभरात वायरल होत आहे.

सोशल माध्यमांचा वापर आणि ताकद इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

पॅलेस्टाईन समर्थक तरुणीचे हे गाणे

सध्या जगभरात वायरल होत आहे.

 

 

 

23/5/2021,

पॅलेस्टाईन समर्थक तरुणीचे हे गाणे सध्या जगभरात वायरल होत आहे, पॅलेस्टाईन मधील काही युवा वर्गाने कलेच्या माध्यमातून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

one day palestine will be free ! so be on the right side of history : By : emmasworld.101

 

पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यात नेमका संघर्ष काय आहे, जाणून घेऊया.

पॅलेस्टाईन स्वतंत्र करण्यासाठी पॅलेस्टाईन समर्थक तरुण वर्गाने महात्मा गांधीजींच्या शांतीच्या मार्गाने जात कलेचा आधार घेतला आहे. आणि आजही महात्मा गांधीजींचे शांतीचे विचार जगभरात प्रेरणादायी आहेत. आज याच तरुण पिढीने समाज माध्यमावर आपल्या गाण्यांच्या आधाराने व्यथा मांडत सर्व जगाला विचार करण्यास भाग पाडले आहे. बदलते सोशल माध्यम मोठ्या प्रमाणात ताकदीचे आहे, प्रभावी आहे, अनियंत्रित सत्तांकुशाना ताळ्यावर आणणारे आहे. फक्त याचा वापर कसा आणि कशासाठी करायचा हे सर्वच भारतीयांना ज्या वेळी समजेल त्यावेळी भारतावर योग्य सत्ताकेंद्रे अस्तित्वात असतील. पॅलेस्टाईन समर्थक आंदोलक आणि इस्रायली पोलिसांदरम्यान संघर्ष अनेक वर्षांपासून विकोपाला गेलाय.

आता त्यात ठिणगी पडली आणि युद्धाचे स्वरूप आले, या संघर्षामुळे जेरुसलेममधील तणाव अधिकच वाढला होता आणि कमी अधिक प्रमाणात युद्धबंदी झाल्यावर अजूनही दिसत आहे. दोन्हींबाजूंनी एकमेकांवर रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे यांचा मारा केला जात होता. आतापर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. भारतीय वंशाची केरळ निवासी संतोषी हि सुद्धा एका हल्ल्यात मारली गेली, हा जो काही वाद सुरु आहे तो जेरुसलेम शहरावरील मालकी हक्कावरुन. जेरुसलेम बाबतचा नेमका वाद काय आहे? पॅलेस्टाईन मधील समर्थकांचं काय म्हणणं आहे ? या सर्वात हमास संघटनेचा काय रोल आहे आणि त्यांचा इस्रायलसोबत काय वाद आहे, ? याला धार्मिक रंग दिला जातोय काय आणि किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात.

इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या समर्थकां मधला वाद खूप जुना आहे. पण सध्या तो पुन्हा उफाळून आला होता आणि अजूनही धगधगत आहे. कारण, इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात पूर्व जेरुसलेम संदर्भातल्या खटल्यावर सुनावणी होणार होती. इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढलं जाण्याची भीती वाटत होती. जेरुसलेम मध्ये इस्त्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये वाद झाल्यानंतर हमास आणि इस्त्रायलमध्ये हे युद्ध पेटले. हमास तशी पाहायला गेले तर कट्टरपंथी मुस्लिमांची एक प्रकारची दहशतवादी संघटना म्हणा किंवा दबावगट. ही जागा मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र आहेत. मुस्लिम याला हराम अल् – शरीफ म्हणजेच ‘पवित्र ठिकाण’ असं म्हणतात तर ज्यू या ठिकाणाला ‘टेंपल माऊंट’ म्हणून ओळखतात.

: What’s happening in Sheikh Jarrah is not new to Palestinians but today is not yesterday, Palestinians won’t let it happen again!

 

पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचाही जेरुसलेम या शहरावर दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून याबाबत संघर्ष सुरु आहे. याबाबत पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन करणाऱ्या हमासने इस्त्रायलवर रॉकेट्स ने हल्ला केला होता. हमासने या आधीच इशारा दिला होता की, आंदोलकांच्या विरोधात सुरु असणाऱ्या इस्त्रायली कारवाईबाबत हमासकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. पण संघर्षाची ठिणगी पडली यात गाझा ला याचे परिणाम भोगावे लागले.

इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता पण बहुतांश देशांना हे कृत्य अमान्य होतं. पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेमवर हक्क सांगितल्याने हा वाद चिघळला आहे. पूर्व जेरुसलेमवर हक्क सांगणारे ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हुसकावून लावत असल्याचा आरोप केला जात होता. इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार होती, पण कोरोना आणि हिंसाचारांच्या घटनांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

पॅलेस्टाईनमधील लोकांना असं वाटतं की एकदा का त्यांचा देश स्वतंत्र झाला की पूर्व जेरूसलेम त्यांच्या देशाची राजधानी असणार. पूर्व जेरूसलेममधील शेख जर्रा इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे पॅलेस्टाईनचं म्हणणे आहे. त्यावरून हा सगळा वाद सुरू झाला.

: After ceasefire Protest in London

हमास आणि या सगळ्यात तिचा रोल काय आहे ? नक्की हमास काय आहे ?
दहशतवादी संघटना हमास ही एक पॅलेस्टाईन समर्थक राजकीय दृष्ट्या पॅलेस्टाईन च्या स्वतंत्रतेसाठी त्यांची बाजू घेणारी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी 1987 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच इस्रायलच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. हमास इस्रायलवर सातत्याने रॉकेटद्वारे हल्ले करुन निशाणा साधतो. इस्रायलला एक पॅलेस्टाईन राज्य बनवायची हमासची इच्छा आहे. या दहशतवादी संघटनेच्या ध्येयधोरणामध्येच इस्त्रायला उद्धवस्त करण्याचा उद्देश लिहला गेला आहे.अरब राष्ट्रे आणि मुस्लिम राष्ट्र या संघटनेला मदत करत असल्यामुळे याला धार्मिक रंग येत आहे , त्यामुळे आपल्या जगातील सर्वात प्रगत आणि ताकदवर सैन्य बाळ असणाऱ्या इस्रायल ला पॅलेस्टाईन आणि हमास नकोसे झाले आहेत.

शत्रू हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलच्या विरोधात 1990 आणि 2000 च्या दरम्यान आत्मघातकी हल्ले केले होते. मात्र, अलिकडच्या वर्षांमध्ये हमासने आपली शस्त्र सज्जता वाढवली, याचाच परिणाम त्यांनी रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले चढवणे सुरुच ठेवले होते. या संघटनेद्वारे पॅलेस्टाईनच्या लोकांना राजकीय आणि सामाजिक सेवा देण्याचा देखील प्रयत्न करण्यात येतो.

दहशतवादी संघटना हमास इस्रायलला देश म्हणून मान्यता देत नाही. हमास चे म्हणणे आहे की, इस्रायलने पॅलेस्टाईन लोकांच्या जमीनीवर अवैधरित्या ताबा मिळवला आहे. गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवल्यानंतर इस्रायलने या भागाला शत्रूंचा प्रदेश म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर इस्रायलने आपल्याबाजूने गाझा प्रदेशातील वीजेचा सप्लाय थांबवला आहे आणि त्यावर इतरही प्रतिबंध लादले आहेत. त्यानंतर हमास आणि इस्रायलच्या दरम्यान वाद वाढतच गेला आणि आता एकमेकांवर रॉकेट्स आणि बॉम्ब डागले जात आहेत. 2008 मध्ये दोघांच्या दरम्यान शांतीसाठी समझोता देखील झाला होता. मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. 2014 नंतर दोन्ही पक्षांमधील वाद वाढू लागले आणि याप्रकारच्या हवाई हल्ल्यांमध्ये आणखीनच वाढ होऊ लागली.

इस्राईल खरे पाहता अमेरिकेकडून शस्त्र सज्ज झाला आहे असे प्राथमिक अंदाज जगाला आहेत. अमेरिकेला अरब राष्ट्र आणि तिथल्या खनिज संपत्ती सोबत ऑइल संपत्तीवर आपले नियंत्रण हवे आणि गाझा पट्टी ज्या देशाच्या ताब्यात त्याचे या भागावर आणि या राष्ट्रांवर नियंत्रण. त्यामुळे गाझा चे महत्व दोन्ही कडच्या लोकांना ठाऊक आहे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग देखील असू शकतो. कारण अमेरिकेला त्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका चौकीदाराची गरज आहे. आणि इस्रायल मार्फत अत्याधुनिक शस्त्रांची ओळख व्हावी यासाठी देखील असे संघर्ष सुरु राहावेत अशी अमेरिकेची इच्छा देखील आहे, कारण इस्रायल मार्फत अनेक देशांना आपली शस्त्रे अधिक ताकदीने मार्केटिंग न करता अमेरिकेला इतर देशांना विकता येणे शक्य होत आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोना च्या विळख्यात असताना अमेरिकेने भारताला प्यादा बनवून चीन विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला पण भारताने तटस्थ भूमिका घेत छुपे मनसुबे ओळखले कारण यात तोटा चीन आणि भारताला होणार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने प्रगतशील देशांना हे युद्ध परवडणार सुद्धा नाही, अमेरिका आपली शस्त्रे विकून तटस्थ राहील आणि हेच अमेरिकेचे छुपे मनसुबे असतात. शेती करण्यासाठी माणसाला जुंपत नाहीत बैलालाच जुंपतात, इस्रायल आणि अमेरिका किती शिक्षित आणि शस्त्राने ताकदवर आहे याचे आकर्षण आजच्या भारतातल्या काही तरुण पिढीला आहे. पण आपल्याला बुद्धीने विचार आणि कृती करणारी पिढी आवश्यक आहे, सध्या पॅलेस्टाईन समर्थक आपल्या स्वातंत्र्यासाठी सोशल माध्यम याचा वापर कसे करत आहे आणि हेच सोशल माध्यम जबाबदार नागरिकांची ताकद आहे याची भारतीयांनी नोंद घेणे काळाची गरज आहे.

 

 

 

 

 

वैभव जगताप
More Stories
भारतकुमार राऊत
भोला ‘पडोसन’!
error: Content is protected !!