Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

pandemic synonym करोनाने लावली वाट – पुढचे पाठ, मागचे सपाट 

1 Mins read

Pandemic Synonym करोनाने लावली वाट – पुढचे पाठ, मागचे सपाट 

 

Pandemic Synonym एक प्रचंड महामारी

 

 

 

2/7/2021

करोना सारखे Pandemic Synonym कांड दर शंभर वर्षात दोन-तीनदा तरी होते. १९१८ ते १९२० मध्ये आजच्या करोना प्रमाणेच  Pandemic Synonym एक प्रचंड महामारी आली.

तिचे नाव ‘स्पॅनिश फ्लू’ असे ठेवण्यात आले. ती काही स्पेनमधून झालेली नाही, तिचा उगम चीन, अमेरिका किंवा फ्रान्समध्ये झाला असावा.

या Pandemic Synonym महामारीमध्ये जवळजवळ १० कोटी लोक मारले गेले. त्यात जवळजवळ २ कोटी लोक भारतीय होते.

लाखो भारतीयांच्या मृत्यूचे कारण हे पूर्णपणे बेदरकार असलेले ब्रिटिश सरकार आहे. आज देखील फार वेगळी परिस्थिती दिसत नाही.

भारतात जवळजवळ ३ कोटी लोकांना करोना झाला आहे आणि ५ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत.

करोनाची लाट वाढतच चालली आहे आणि आज काल तर करोनाच्या नवीन नवीन जाती निर्माण होत आहेत. त्यामुळे धोका प्रचंड वाढलेला आहे.

१९१८ च्या मानाने आज भारतात प्रवासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या आणि त्यामुळे करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.

१९१८ चे मृत्युकांड झाले ते पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर झाले आहे. पहिल्या महायुद्धामध्ये जवळजवळ २ कोटी लोक मारले गेले होते.

त्यानंतर हे १० कोटी लोक मारले गेले. मानवजातीला अतोनात यातना सहन कराव्या लागल्या.

त्यानंतरच्या काळामध्ये अनेक साथी आल्या सार्स, इबोला, एड्स Pandemic Synonym अशा प्रचंड महामारी मानवजातीला त्रस्त करत आहेत.

त्याच बरोबर फ्लूची महामारी १९५७, १९६८ आणि २००९ ला मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पसरली होती.

पण या सर्व गोष्टी पासून आपण काय शिकलेले दिसत नाही. आरोग्य व्यवस्था तर कमजोर होतीच, पण ती आणखी कमजोर होत गेली.

लोकसंख्या वाढत गेली पण आरोग्य व्यवस्था व त्यातल्या रोग होऊ नये / आजारी पडू नयेत म्हणून जी पावले उचलायची असतात,

ती कधीच उचलली गेली नाहीत. देश रोगमुक्त व्हायच्या आधीच रोगयुक्त झालेला आहे.

आता करोना कांडमध्ये अनेक लोक काळाबाजार करत आहेत, गरिबांना लुटत आहेत, गरिबांना मारताहेत,

पण त्याविरुद्ध सरकारकडून आणि समाजाकडून कुठल्या प्रकारचा उपाय दिसत नाही आणि म्हणून

मानव जातीतले गरीब लोक अत्यंत संकटात आज जीवन जगत आहेत.

फ्लूमुळे २ कोटी लोक १९१८ ला मारले गेले. Pandemic Synonym भारत ह्या महामारीचे केंद्र होते. मृत्यूची संख्या एवढी मोठी झाली,

त्याचे कारण लोकसंख्या जास्त होती आणि म्हणून मरणार्‍याची संख्या जास्त होती. १९१८ ला ज्याप्रमाणे ब्रिटिश सरकार बेदरकार होते

त्याप्रमाणे आज देखील तशीच स्थिती आहे. कारण अनेक वर्ष आरोग्यावरचा खर्च सरकारने अत्यंत कमी केला आहे आणि

आता तर खाजगीकरणाला चालना दिली आहे. खाजगी हॉस्पिटल वाढलेली आहेत. या हॉस्पिटलमधून गरिबांना उपचार केले जात नाहीत.

वास्तविक गरीबांना पुर्णपणे चांगली आरोग्य सेवा देण्याचे संविधानातील वचन कधीच पुरे झाले नाही.

काही कारणास्तव मला वाराणसीला जावं लागलं आणि त्यावेळी आम्ही बघितले गंगेमध्ये वाहणारे प्रेतांचे लोंढे. हे बघून मला प्रचंड धक्का बसला.

मृतांची संख्या वाढत असताना मृतांना अंतक्रियेसाठी व्यवस्था नाही आणि त्यामुळे मृतांना कुठे फेकले जाते, कुठे पुरले जाते किंवा कुठेही जाळले जाते.

करोनाच्या नवीन लाटेने जगभर थैमान माजवले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व ब्राझील मध्ये अनेक लोक मरत आहेत.

भारतामध्ये करोनाची पहिली लाट आली. ती ओसरण्याच्या आधीच निर्बंध काढून घेण्यात आले. त्यावेळी अनेक जिल्ह्यांमध्ये करोना पोचलाच नव्हता.

सिंधुदुर्गात तर एकही पेशंट नव्हता. निर्बंध उचलले गेले आणि गणपती गौरीसाठी लोकांना मुंबईतून कोकणात पाठवण्यात आले.

इथून जे लोक गेले त्यांनी आपल्याबरोबर करोना सुद्धा घेऊन आले आणि आज सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना ग्रस्त झाला आहे.

याचा अर्थ राज्य आणि केंद्र सरकारने करोनाच्या पहिल्या लाटेला गंभीरपणे घेतले नव्हते त्याचा परिणाम म्हणजे ज्यावेळी दुसरी लाट आली

, त्यावेळेला सरकार तयार नव्हते. ती प्रचंड प्रमाणात शहरातून महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या ग्रामीण भागात पसरली

आणि करोनाची लाट अजून काही सरत नाही. इतक्यात बऱ्याच भागातून निर्बंध काढून घेण्यात आले. त्यामुळे जर तिसरी लाट आली

तर तिला आटोक्यात घेण्यामध्ये आपल्याला प्रचंड त्रास होणार आहे.

Pandemic Synonym करोना पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय निर्बंध कमी करणे किंवा उठवणे, हे लोकप्रियतेला बघून सरकार करत आहे.

अनेक लोक म्हणताहेत की करोना नाहीच आहे आणि हे सरकारचे षड्यंत्र आहे. अंधश्रद्धेने ग्रासलेले लोक म्हणतात की

लस घेण्याची गरज नाही, देवाला जे मंजूर आहे ते होईल. आणि अशा स्थितीत असे लोक मृत्युमुखी झपाट्याने पडत आहेत.

करोनामुळे गरिबाचे अतोनात नुकसान झाले आहे व होत आहे.  त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतामध्ये आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे.

चांगले डॉक्टर, चांगले नर्स असून देखील आरोग्य व्यवस्थापन अत्यंत गलिच्छ आहे. करोना झाल्यावर लोक सरकारी हॉस्पिटलला गेले तर तिथे जागा नसते.

त्यांना महागड्या हॉस्पिटलमध्ये जावे लागते. तिथे लाखो रुपये खर्च करावे लागतात. मग ते कायमचे कर्जबाजारी होऊन बाहेर निघतात.

अशा महागड्या हॉस्पिटलमध्ये जीव वाचला तरच नवल. गरिबांना घरात बसून चालत नाही, पोटापाण्यासाठी गरिबांना घराबाहेर निघावे लागते,

काम करावे लागते आणि करोना सारख्या परिस्थितीत त्यांना करोना लगेच होतो. श्रीमंत लोक लपून बसले आहेत. घरातून बाहेर निघत नाहीत.

ऑनलाइन वर्कच्या नावाखाली सगळे काम ऑनलाईन होत आहे. त्यामुळे ते जास्त सुरक्षित आहेत. करोनामुळे गरिबी श्रीमंतीचा खेळ उघडपणे बाहेर आला आहे.

अनेक लोक बेकार झाले आहेत. सरकारने आणखी बेकारी वाढवली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गेली २ वर्ष भरती बंद केली आहे.

असंख्य मुलं प्रशिक्षित झाली आहेत. सैन्य, पोलीस भरती, सीआरपीएफ, बीएसएफ, नेव्ही, एयरफोर्स, अनेक संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या लाखोने उपलब्ध आहेत.

आज जवळजवळ १ कोटी लोकांना नोकरी देण्याची सरकारची क्षमता आहे. पण भरती बंद करून टाकली आणि बेकारांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ केली आहे.

अनेक लोक सिलेक्ट होऊन वेटिंग लिस्टवर आहेत. २०१८ मध्ये पोलीस भरती झाली, त्यात ८०० लोक प्रतीक्षा यादी मध्ये आहेत. त्यात १८० माजी सैनिक आहेत.

म्हणजे ४० हजार रिक्त पदे असून देखील पोलिसांना रिक्त जागेवर का घेत नाहीत? हे मोठे गौडबंगाल आहे. अशाच प्रकारे ५० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

कृषी सहाय्यकांची पदे रिक्त आहेत आणि बेकार युवक तडफडत आहेत. त्यांची दया कोणाला येत नाही हा सर्वात मोठा अन्याय आणि अत्याचार आहे.

२ वर्ष करोना स्थितीमध्ये देश भरडला गेला आहे.   करोना स्थितीत दिसलं की ज्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यांना करोना होत नाही.

 प्रतिकारशक्‍तीचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून एकच आहे. ज्याच्या शरीरामध्ये श्वासोश्वास मोठ्या प्रमाणात होतो तो करोनापासून मुक्त राहतो.

साधारणत: दिवसाचं जो २ किलोमीटर पळतो किंवा ३ किलोमीटर जोरात चालतो त्याला करोना होत नाही.

मी रोज ५०० कपालभारती व ५० अनुलोम विलोम करतो, त्यामुळे करोनापासून मुक्त राहिलो आहे.

दुसरा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे उत्तम आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये विटामिन सी,  कॅल्शियम आणि इतर चांगली तत्त्वे राहिली

तर प्रतिकार शक्ती चांगली राहते. वरील सर्व गोष्टी या चांगल्या जीवन पद्धतीचे उदाहरण आहेत.  आम्ही नुकतीच ‘समृद्ध आणि आनंदी’ गावाची कल्पना मांडली.

ही कल्पना आणि योजना सरकारला आम्ही दिली. नैसर्गिक शेती, प्रक्रिया उद्योग, गावात कुटीर उद्योग, आरोग्य, क्रीडा, योगा, पाणी, पर्यावरण, स्वच्छता ठेवण्याच्या पद्धती आहेत.

गाव समृद्ध आणि आनंदी झाला तर देश समृद्ध आणि आनंदी होईल ही कल्पना त्यात आहे. करोना सारख्या संकटाला तोंड देण्यासाठी जीवन पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाला पाहिजे.

नाहीतर वडापावच्या संस्कृतीची निर्मिती झाली आहे ती माणसाला बुडवल्या शिवाय राहणार नाही.

करोनाचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. करोना संपल्यावर सुद्धा जग आहे तस राहणार नाही.

त्यातली एक सर्वात चांगली गोष्ट झाली ती म्हणजे ऑनलाइन व्यवहार सुरू झाले. वाईटातून चांगले निर्माण होतेच.

त्यामुळेच मानवाच्या जीवनामध्ये ही तिसरी लाट आलेली आहे. एक नवीन संस्कृती, नवी अर्थव्यवस्था आणि नवीन जग उदयास येत आहे.

ही तसरी लाट काय आहे व कशी आहे याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

 

 
लेखक 

ब्रिगेडीयर सुधीर सावंत

Leave a Reply

error: Content is protected !!