Peshwa empire Gangabai
Peshwa empire Gangabai
Peshwa empire Gangabai

Peshwa empire – एक दुर्लक्षित पेशवीण – गंगाबाई

पेशवाईतील स्त्रिया - Peshwa empire

Peshwa empire – एक दुर्लक्षित पेशवीण – गंगाबाई

 

पेशवाईतील स्त्रिया – Peshwa empire

 

 

 

 

10/7/2021,

पेशवाईतील स्त्रिया

#भाग०२

एक दुर्लक्षित पेशवीण.

पेशवाईतील प्रत्येक पेशवे पत्नी च्या नशिबी वैधव्य लिहिलेले दिसते …असे असुनही या प्रत्येक स्त्रीला पती निधना नंतर व्यवस्थित आयुष्य जगता आले

.. अपवाद रमा बाईंचा कारण त्या सती गेल्या … त्या काळची कुटुंब संस्था , पेशवे घराण्याचा दरारा आणि समाजात असलेला

पेशव्या बद्दल चा आदर या सगळ्या मुळे या स्त्रिया चे आयुष्य सुसह्य झाले असावे ..

एकूणच या सगळ्या स्त्रिया कर्तृत्ववान आणि वलयांकित .. त्यातील राधा बाई , काशी बाई किँवा रमा बाई बद्दल अजुनही भरभरून लिहिले किँवा बोलले जाते

पण एक दुर्लक्षित राहिली .. ती म्हणजे गंगाबाई ..

गंगाबाई म्हणजे नारायण राव पेशव्यांची पत्नी , आजही त्यांच्या बद्दल फारच कमी माहिती मिळते ..

कृष्णजी हरी साठ्यांची ही कन्या २२ एप्रिल १७६३ पेशव्याची सुन होऊन शनिवार वाड्यात आली ..

नारायण राव आणि गंगाबाई चे लग्न सिंहगडावर झाले ..अवघा १० वर्षाचा संसार .. आणि मग ३० ऑगस्ट १७७३ ला नारायण रावांची हत्या झाली

गंगा बाई च्या जन्मा ची तारीख माहिती नाही , पण मृत्यु च्या वेळेस नारायण राव १८ वर्षाचे म्हणजे गंगा बाई १५-१६ वर्षाच्या असाव्यात

पती निधनाच्या दुःखा ने त्यांनी प्रचंड आक्रोश केला , आपल्या थोरल्या जाऊ बाई रमाबाई प्रमाणे त्यांना सती जायचे होते

पण पोटात पेशवे घराण्याचा वंश वाढत होता त्या मुळे त्यांना सती जाण्या पासुन रोखले गेले ..

त्या गर्भवती होत्या ..

नारायण रावा च्या खुना नंतर शनिवार वाडा ( Peshwa empire )सुतकात होता , दुसया दिवशी राघोबा दादाने दरबार भरवला

आणि ” वैऱ्याचे कसले सुतक ” म्हणुन पेशव्याच्या गादीवर जाऊन बसले ..

१६ वर्षाच्या या मुलीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असताना .. वाड्यावर त्यांना समजुन घेणारे कोण होते ?

वाडयावर दोनच स्त्रिया होत्या .. एक पार्वती बाई आणि दुसऱ्या आनंदी बाई ..

त्या प्रसंगी आनंदी बाईनी गंगा बाईना स्वतः च्या महालात ठेऊन घेतले .. यात इतिहास कारांची दोन मते आहेत ..

एक मत असे की राघोबा दादाला नारायण रावाचा वंश संपवायचा होता आणि त्या करता तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता

आणी अशा वेळेस राघोबा दादा पासुन गंगाबाईला सुखरूप फक्त आनंदी बाई ठेऊ शकत होत्या

दुसरे मत असे राघोबा दादाच्या कारस्थानात आनंदी बाई सहभागी होत्या आणि त्यांनी धाकाने गंगा बाईला ठेवले होते ..

खरे कारण तो शनिवार वाडाच जाणो ..I

राघोबा दादा ना पेशवाई ची वस्त्रं तर मिळाली .. पण त्यांनी ज्या पध्दतीने ती मिळवली त्या मुळे कारभारी नाराज होते

कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालु झाल्या .. कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस ,सखाराम बापु , त्र्यंबकराव पेठे ,

रामशास्त्री ,मालोजी घोरपडे .. या मंडळींनी ठरवले राघोबा दादाला पेशवे पदा वरून दुर करायचे .. हेच होते ” बारभाईचे कारस्थान “

राघोबा दादाला दुर करून मग कोणाला पेशवे करायचे ?

ठरले गंगाबाई च्या नावाने कारभार करायचा .. तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा .. नसता दत्तक विधान करायचे ..

बाहेर काय चालू आहे याची गंगा बाई ना अजिबात कल्पना नव्हती ती बिचारी अबला अडकली होती आनंदी बाई च्या महालात ..

नाना आणि मंडळी बोलुन चालुन मुत्सद्दी , त्यांनी गंगाबाई ना २६ जानेवारी १७७४ ला शनिवार वाड्यातुन सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले

त्या वेळेस पार्वती बाई त्यांच्या बरोबर होत्या ..

ज्या दिवशी गंगा बाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले ..आणि

पेशवाई चा कारभार गंगा बाई च्या नावे सुरु केला .. पुरंदरावरच पार्वती बाई नी त्यांचे साधे पणाने डोहाळ जेवण केले ..

पुढे जाऊन १८ एप्रिल ला , सवाई माधव राव चा जन्म झाला , मुलाचं नाव माधवराव ठेवण्या मागचे कारण ,

थोरल्या माधवराव च्या निधना नंतर पिंडा ला कावळा शिवत नव्हता तेंव्हा ..

नारायण ना मुलगा झाला तर नाव माधव ठेऊ असा शब्द दिला आणि काक स्पर्श झाला ..

त्या नंतर ४० दिवसांनी बाल पेशव्याला पेशवाई ची वस्त्रे दिली ,या संपुर्ण काळात आणि पुढे पेशवाई चा कारभार गंगाबाई च्या नावे चालु होता ….

गंगा बाई धोरणी , दक्ष होत्याच याची प्रचिती नारायण रावांची हत्या ते सवाई माधव रावा च्या जन्मा पर्यन्त च्या वागण्यातून येते

त्या धोरणी किँवा दक्ष नसत्या पेशव्या चा वंशज जन्माला येणे अवघड होते ..

त्या अतिशय समंजस होत्या , राज्य कारभाराची माहिती नसल्या मुळे त्यांनी कारभारी मंडळी वर पुर्ण विश्वास टाकला,

नित्य कामे कारभाऱ्या वर सोपवली पण महत्वाचे निर्णय किँवा गुप्त खलबताच्या वेळेस जातीने हजर असत ..

पेशव्यांच्या ( Peshwa empire ) सगळ्या स्त्रिया ना देवा धर्माची आवड होती तशी आवड गंगाबाई मध्ये पण होती,

पण इतर स्त्रिया प्रमाणे त्यांना काशी किँवा इतर तीर्थयात्रांचा योग आल्याचं दिसत नाही ..

पुण्यात त्या विषम ज्वराने आजारी पडल्या , वैद्य येऊन उपचार करत होते पण तब्बेतीला उतार पडत नव्हता,

त्यांना शेवट जवळ आल्याचं कळुन चुकले , त्यांनी सखाराम बापु ना बोलावले आणि सांगितले ” नानांनी आणि तुम्ही मिळोन श्रीमंतांचे आणि

दौलती चे रक्षण करावे “

या वेळेस सवाई माधव रावा चे वय होते अवघे तीन वर्ष .. या माउली ला लेकराची आणि त्या पेक्षा दौलती ची काळजी ..

पती पेशवा असताना पेशवीण म्हणुन कधी मिरवता आले नाही आणि मुलगा पेशवा होऊन पेशव्यांच्या

मातोश्री म्हणुन आदराच्या स्थानी बसणे नियती ला मंजुर नव्हते .. एकूण काय तर भोगले जे दुःख त्यालाच सुख म्हणायचे !!!!

त्या काळात विधवा असुन सकेशा राहिलेली पेशवीण , नारायण रावा च्या मृत्यु च्या वेळेस पोटात गर्भ असल्या मुळे शास्त्रा नुसार केशवपन झाले नव्हते ..

अशी ही दुर्लक्षित पेशवीण १२ जुलै १७७७ ला विषमज्वराने मृत्यु पावली .

बिपीन कुलकर्णी

संधर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )

पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
anna hajare - बिनडोक आंदोलन म्हणजे अण्णा हजारे
anna hajare – पुन्हा लोकपाल, पुन्हा अण्णा आणि आपला राजकीय शहाणपणा
error: Content is protected !!
%d bloggers like this: