Peshwa Empire - Yashoda bai peshva
Peshwa Empire - Yashoda bai peshva
Peshwa Empire - Yashoda bai peshva

Peshwa Empire – विचीत्र नात्यात फसलेली पेशवे पत्नी

#पेशवाईतीलस्त्रियाभाग_३ - यशोदा बाई - Peshwa Empire

Peshwa Empire – विचीत्र नात्यात फसलेली पेशवे पत्नी

 

#पेशवाईतीलस्त्रियाभाग_३ – यशोदा बाई – Peshwa Empire

 

 

 

#पेशवाईतीलस्त्रिया

#पेशवाईतीलस्त्रियाभाग_३

विचीत्र नात्यात फसलेली पेशवे पत्नी

पेशवाई समजुन घेताना काही गोष्टी लक्षात येतात एक म्हणजे , थोरल्या माधवरावांच्या मृत्यु नंतर राज्य

कारभाराचे पुर्ण नियंत्रण कारभाऱ्यांकडे कडे आले आणि पेशवे फक्त नावाला राहिले , अपवाद सवाई

माधवरावांचा , त्यांनी याला थोडा विरोध करायचा प्रयत्न केला पण त्यांनाही फार काही यश आले नाही ….

थोरल्या माधव रावा च्या मृत्यु नंतर नारायण राव आणी राघोबा दादा च्या काळात एकूणच पेशवाईचे

वैभव कमी कमी होत गेले …सवाई माधवरावांच्या काळात हे चित्र थोडे बदलले … गत वैभव परत येईल असे वाटत होते .

पेशवाई ( Peshwa Empire ) मध्ये अजुन एक गोष्ट लक्षात येते …जे पेशवे कर्तबगार होते ते अल्पायुषी ठरले

आणि ज्यांची बेताची कर्तबगारी होती त्यांना बऱ्यापैकी आयुष्य लाभले …

सवाई माधव रावा ची कर्तबगारी नक्कीच आधीच्या दोन पेशव्या पेक्षा उजवी होती …आणि ते अल्पायुषी ठरले ..

सवाई माधवरावांचा पहिला विवाह केशव थत्ते यांच्या मुलीशी १० फेब्रुवारी १७८३ ला पर्वती वर

थाटा माटात पार पडला … लग्ना नंतर मुलीचं नांव रमाबाई ठेवण्यांत आलें. …अवघा

दहा वर्षाचा संसार झाला आणि ३१ जानेवारी १७९३ ला रमाबाई चे विषमज्वराने निधन झाले ….

रमाबाई च्या निधना नंतर सवाई माधवरावानी लगेचच दुसरे लग्न करायचा निर्णय घेतला …राजापुर च्या गणेश गोखल्यांची मुलगी यशोदा बाई चे स्थळ आले .. ह्या स्थळाला पसंती दिली होती खुद्द नाना फडणवीसांनी , कारण त्या वेळेस पेशव्यांच्या वाड्यात नाना वडिलधार्याच्या भूमिकेत होते, त्यांच्या शब्दाला मान होता ..

६ मार्च १७९३ ला हे लग्न पुण्यात झाले … त्या वेळच्या प्रथे प्रमाणे यशोदाबाई लग्नात वयाने खुपच लहान होत्या ..दिसायला अतिशय सुंदर होत्या … त्यांचे वर्णन करताना लिहिले आहे …बांधा रेखीव, सुंदर होता आणि नाजुक शरीर यष्टी होती ….घराण्यातील इतर स्त्रिया प्रमाणे यशोदाबाईना लिहिता वाचता येत होते….

या सगळ्या स्त्रियांना वैधव्याचा शाप होता असे म्हणावेच लागेल …२७ ऑकटोबर १७९५ ला सवाई माधवरावांचे शनिवार वाड्याच्या पहिल्या मजल्यावरून पडून अपघाती निधन झाले …..नियती निष्ठुर असते ज्या वेळेस मुलगी वयातही आलेली नव्हती … त्याच वयात तिच्या अंगावर आळवण देऊन मोकळी झाली …

खरं तर ही तर दुर्दैवाची सुरुवात होती …

सवाई माधव राव निपुत्रिक राहिल्याने , नाना साहेबांचा वंश संपला होता … पुढचा पेशवा कोण हा मोठा प्रश्न होता …
मागे राहिला होता राघोबा दादा चा वंश .. म्हणजे त्यांची तीन मुले , अमृतराव , बाजीराव आणि चिमाजी !
अमृतराव आणि बाजीराव चे प्रताप कारभारी जाणुन होते , त्या मुळे त्यांना पेशवे पद देण्याला विरोध होता … राहता राहिले चिमाजी , ते त्या वेळेस बारा वर्षाचे होते …
कारभाऱ्यानी ठरवलं , छोट्या चिमाजीचे दत्तक विधान करायचे ..२५ मे रोजी चिमाजी ला यशोदा बाईच्या मांडीवर दत्तक दिले …हेच दत्तक विधान यशोदा बाई ला एका विचित्र नात्यात अडकवुन गेले .

कसे ?

यशोदाबाई चे पती म्हणजे सवाई माधवराव , आणि राघोबा दादा सवाई माधवरावा चे आजोबा …चिमाजी नात्यानं सवाई माधवरावांचा काका … म्हणजे जेंव्हा यशोदा बाई नि चिमणाजी ला म्हणजे राघोबा च्या मुलाला दत्तक घेतले तेंव्हा त्यांनी नक्की कोणाला दत्तक घेतले ? तर त्यांनी सासऱ्या ला मुलगा म्हणुन मांडीवर दत्तक घेतले !!!

हे दत्तक धर्म शास्त्रात न बसणारे , फक्त राजकीय सोय पाहुन केलेले , कारभाऱ्यांना हा द्राविडी प्राणायाम करायची काय गरज होती .. त्यालाही अनेक कारणे होती … पण तो स्वतंत्र आणि वेगळा विषय आहे … पण या सगळ्या राजकारणाच्या खेळात बिचाऱ्या यशोदाबाई ची मात्र फरफट झाली …

चिमाजी चे पेशवे पद अल्प काळ टिकले …
आणि लगेच राघोबा दादाचा मोठा मुलगा म्हणजे दुसरा बाजीराव गादीवर आला ..

त्याचा एकुणच दत्तक प्रकरणा मुळे यशोदा बाई वर राग होता …त्या मुळे बाजीराव ने गादीवर आल्यावर यशोदा बाई ना जबरदस्तीने पालखीत घालुन पुरंदर किल्ल्यावर पोहोचवले आणि कैदेत ठेवले … नंतर आजार पण आले , शेवट जवळ आल्याचं बहुदा कळले असावे त्या वेळेस त्यांनी कारकुनाला जवळ बोलावुन सांगितले ” धर्मशास्त्रा नुसार गडावर मृयु येणे योग्य नव्हे . तेंव्हा आम्हास गडा खाली न्यावे ” पण पेशव्याच्या आज्ञे शिवाय त्यांना हलवणे शक्य नव्हते … तशातच आठवडा भर ताप येऊन १४ जानेवारी १८११ ला रात्री त्यांचे निधन झाले ….पहाटे अत्यंविधी झाला ….

यशोदा बाई ना अनेक वर्ष कैदेत ठेवणाऱ्या बाजीरावाने त्यांच्या मृत्यू नंतर सुतक पाळले …रोजचा चौघडा , दरबार आणि ” दप्तर ” या दिवसात बंद होते …
इतिहासकरांच्या मते मुत्यु च्या वेळेस ( Peshwa Empire ) यशोदा बाई चे वय अवघे ३० असावे ….

अशी ही पेशवीण कारभाऱ्यांच्या हट्टा पायी विचित्र नात्यात अडकुन इतिहासात गडप झाली ….

बिपीन कुलकर्णी

संधर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )
पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
pawar family
pawar family – नगरदेवळेकर पवार घराणे
error: Content is protected !!
%d bloggers like this: