peshwa maratha empire
peshwa maratha empire
peshwa maratha empire - सवाई माधवराव पेशवे

peshwa maratha empire – सवाई माधवराव पेशवे

peshwa maratha empire - सवाई माधवराव पेशवे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

peshwa maratha empire – सवाई माधवराव पेशवे

peshwa maratha empire – सवाई माधवराव पेशवे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

पेशवे पदाच्या लालसेपायी नानासाहेब पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथराव यांनी आपले पुतणे पेशवे नारायणराव

यांची शनिवारवाड्यात हत्या केली व पेशवेपद दुसरा वारस नसल्याने रघुनाथरावांच्या हाती आले.

नारायणरावाच्या हत्तेवेळी त्यांच्या पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. रघुनाथरावांच्या अमानुष कृत्यामुळे पुणे

दरबारातील नाना फडणीस, सखाराम बापू इत्यादी कारभाऱ्यांनी बहुतांश मराठा सरदारांचा पाठिंबा

मिळवून गंगाबाई यांना सुरक्षित ठेवून रघुनाथराव कर्नाटक मोहिमेवर जाताच, गंगाबाईच्या पोटी

जन्मलेल्या सवाई माधवरावांचा ते केवळ ४० दिवसाचे असतानाच त्यांना peshwa maratha empire

पेशवेपद दिले गेले . सवाई माधवराव पेशवेपद मिळाल्याचे कळतात रघुनाथरावांनी कारभारी मंडळीचा

पराभव करून राज्यकारभार हाती घेण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली .नाना फडणीसांनी इंग्रजांशी

वेगळा तह करून रघुनाथरावांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला.

मात्र इंग्रज दोन्ही पक्षांना एकमेकाविरुद्ध लढविण्यात यशस्वी झाले. अखेर निराश होऊन रघुनाथराव पुणे

दरबारातील कारभारी मंडळींना शरण आले. त्यांना कोपरगाव येथे ठेवण्यात आले .तिथेच ते मरण पावले.

सवाई माधवराव जाणते होईपर्यंतच्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. रघुनाथरावांच्या बंडाचा

मोड झाला. तळेगाव वर इंग्रजांचा मराठ्यांनी पराभव केला. नाना फडणीसांनी इंग्रजाविरूध्द म्हैसुरचा

हैदरअली, हैदराबादचा निजाम यांना मराठ्यांच्या गटात आणले.१७८४ मध्ये निजामाने आक्रमण करतात

त्याला पराभूत करून मराठ्यांनी यादगिर येथे त्याच्याशी तह केला.

मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावचा खून झालेल्या नारायणराव या मुलाचा

गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तर जन्माला आलेला मुलगा. त्याचे बालपण पुरंदर किल्ल्यावर

लष्करी बंदोबस्तात गेले. त्यामुळे राज्यकर्त्यास योग्य असे शिक्षण त्याला मिळाले नाही. पेशव्याला वाढविण्याची

जबाबदारी कारभाऱ्यांवर म्हणजे नाना फडणिस यांच्यावर आली.साहजिकच लिहिणे-वाचणे, हिशेब ठेवणे,

घोड्यावर बसणे, कसरत करणे याचे जुजबी शिक्षण त्यास मिळाले; पण शहाण्या सुरत्या मुत्सद्यी माणसांच्या

गाठीभेठी,राजकारण्याच्या वाटाघाटी, लष्करी मोहिम यांपासून पेशवा वंचित राहिला. त्यांच्या वयाच्या तिसऱ्या

वर्षी आई गंगाबाई मरण पावली. त्यामुळे त्यास खास मायेचे असे कोणीच उरले नाही.

पेशवाईच्या peshwa maratha empire उत्तरकाळात गृहकलहामुळे निर्माण झालेल्या चमत्कारीक वेळी

जन्म झाल्यामुळे या बालपेशव्यासंबंधी मराठी राज्याच्या अपेक्षा उंचावल्या. कर्तबगार चुलते थोरले माधवराव

यापेक्षा मोठी कामगिरी याच्या हातून पार पडेल, या भावनेने त्यास सवाई माधवराव हे नाव प्राप्त झाले.

जन्मानंतर चाळीस दिवसांनी २८ मे १७७४ रोजी त्यास सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली.

काही दगाफटका होऊ नये, म्हणून माधवरावास पुरंदर किल्ल्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर कुणबिणी,

नोकरचाकर, पाणक्ये, भटभिक्षुक, कारकूनअशा मंडळींच्या सहवासात पेशवा वाढला. पाच वर्षानंतरच

पुरंदरची थंड हवा सोसेना म्हणून पेशव्यासह सर्व मंडळी पुण्यास आली. १० फेब्रुवारी १७८३ रोजी थत्ते

कुटुंबातील रमाबाई या मुलीशी त्यांचे थाटाने पहिले लग्न करण्यातआले. यानंतर गणेश वि. गोखले यांच्या

यशोदाबाई या मुलीशी दुसरे लग्न झाले .पुण्याच्या शनिवारवाड्यात, श्रावण मासातील सण, दक्षिणावाटप,

गणपती उत्सव,दसरा, होळी आदी सण आणि वाड्यातील भोजने यांत पेशव्याचे जीवन व्यतीत होत होते.

पुणे-नासिक-वाई-सातारा या परिसरा पलीकडे त्याचा प्रवास झाला नाही.त्यांची आजी गोपिकाबाई यांनी

पेशवा सवाई माधवराव नासिकास आला असता,नानास पत्र लिहिले की, ‘हे मूल सदा लहान माणसात वावरते.

बाहेरील जगाशी त्याचा संबंध नाही. हे शहाणे कसे होणार?’

सवाई माधवरावच्या वेळी पहिले इंग्रज-मराठे युद्ध, टिपूशी युद्ध , टिपूविरुद्ध केलेली श्रीरंगपट्टणची इंग्रज

निजामासह संयुक्त मोहीम खर्ड्याचे युद्ध ,पाटीलबाबा शिंदे यांनी मोगल बादशाही ताब्यात घेऊन उत्तरेकडील

राजे रजवाडे आणि मुस्लिम संस्थानिक यांच्याशी केलेली युध्दे असे अनेक युद्धप्रसंग घडले आणि मराठ्यांनी

अखिल हिंदुस्थानात पुन्हा नावलौकिक मिळविला; पण खर्ड्याचे युद्ध वगळता इतर घटना पेशव्यास फारशा

समजल्या की नाही याविषयी शंका आहे. पेशव्यांच्या दरबारात आलेल्या चार्ल्स मॅलेट या इंग्रज वकीलाने

सवाई माधवरावा विषयी अनेक तपशीलवार गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यावरून त्याची शरीरयष्टी,

स्वभाव आणि वर्तन यांवर प्रकाश पडतो.

 

Also Read : https://postboxindia.com/sant-sena-maharaj/

नाना फडणीसांच्या वर्चस्वामुळे सवाई माधव रावांना स्वतंत्रपणे कारभार करण्याची संधी मिळत नव्हती .नानांचा संशयी आणि सर्व गोष्टीवर गुप्तपणे बारकाईने नजर ठेवण्याच्या वृत्तीमुळे सवाई माधवराव व नाना यांच्यात खटके उडू लागले. अशातच हैदराबादच्या निजामाने मराठा राज्यावर मोठी मोहीम काढली. निजाम हा मराठ्यांकडून पूर्वी अनेकदा पराभूत झालेला होता. त्याच्याकडे तीन कोटीची चौथाई व तीस लाखाचा मुलख अशी मराठ्यांची बाकी देणे होती. ती देण्याचे टाळून निजामाने आक्रमण केले. यावेळी मराठेशाहीतील सर्व सरदारांनी एकत्र येऊन खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पाडाव केला .१२ मार्च १७९५ रोजी ही लढाई झाली.निजामाने मागील सर्व बाकी देण्याचे मान्य केले. या विजयाने peshwa maratha empire मराठेशाहीत उत्साह पसरला.

पुढे महादजी शिंदे-पाटीलबाबा महाराष्ट्रात आले. या मुक्कामात त्यांनी माधवरावास मानमरातब, मेजवान्या, पानसुपाऱ्या केल्या; स्वारी शिकारीला बरोबर घेतले व धनीपणाचा हक्क बजाविण्याविषयी सांगितले. तेव्हापासून पेशव्यास परिस्थितीचा विशेषतः परावलंबित्वाचा उलगडा झाला. खर्ड्याच्या मोहिमेवरून पेशवे परत आले. बाजीराव रघुनाथ जुन्नर येथे कैदेत होते. त्यांनी पेशव्यांशी गुप्तपणे पत्रव्यवहार सुरु केला होता. नाना फडणिसाने तो पत्रव्यवहार पकडून पेशव्यास शरमिंदे केले. यावेळी कारभाऱ्याने आपल्याला कसलीही मोकळीक देऊ नये, याची त्यास खंत वाटू लागली. त्यात ते आजारी पडले.

दसऱ्याचा समारंभ कसाबसा पार पडला सवाई माधवराव २५ ऑक्टोबर १७९५ रोजी तापाच्या भरात त्यांनी शनिवारवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कारंज्यावर उडी टाकली. जबर जखमी होऊन उपचार चालू असतानाच दोन दिवसांनी सवाई माधवरावांचे निधन झाले . त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास म्हणजे नाना फडणीसांच्या कारभाराचा इतिहास आहे .स्वतंत्र कारभाराची संधी न मिळताच सवाई माधवरावांचा २७ आॅक्टोबर १७९५ रोजी निधन पावले.

सवाई माधवराव स्वतः कर्तबगार वा सुज्ञ नव्हते, तरी त्यांच्या अस्तित्वाने  peshwa maratha empire मराठ्यांची सत्ता एकवटून राहिली होती. त्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईत परस्परातील हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरु झाली व विघटनवादी प्रवृत्तीला ऊत आला. त्यानंतर २०-२२ वर्षांत इंग्रजांनीमराठ्यांची सत्ता नष्ट केली.

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ : मराठी रियासत 
गो.स.सरदेसाई 
मराठ्यांनी धारातिर्थे 
प्रवीण भोसले

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
p l Deshpande पु.ल.
p l Deshpande – नाटककार, पु. ल. दशावतारी व्यक्तिमत्व
error: Content is protected !!
%d bloggers like this: