Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Police crime branch स्थानिक गुन्हे शाखेकडुन ४ आरोपी जेरबंद

1 Mins read

Police crime branch स्थानिक गुन्हे शाखेकडुन ४ आरोपी जेरबंद

Police crime branch – महिला प्रवाशांना प्रवाशी म्हणून वाहनामध्ये बसवून लुटणारी टोळी

16/7/2021,

महिला प्रवाशांना प्रवाशी म्हणून वाहनामध्ये बसवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन
४ आरोपी जेरबंद.

मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री
अतुल झेंडे यांनी प्रवाशी महिलांना पुढील गावापर्यंत सोडण्यासाठी वाहनामध्ये बसवून निर्जन स्थळी नेवून
त्यांना मारहाण करून जबरीने दागिणे व रोख रक्कम काढून घेण्याबाबत सांगोला व मंद्रुप पोलीस स्टेशनला
दाखल असलेल्या गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपींचा तपास करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत
करण्याबाबत Police crime branch स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री
सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली तपास पथक जिल्हयातील अश्या प्रकारे जबरी चोरी करणारे आरोपींच्या मागावर
होते.
त्यामध्ये Police crime branch स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा
पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार हे आज रोजी टेंभूर्णी पोलीस ठाणे हददीत
मालविषयी गुन्हयाचे उकल करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली
की, उपरोक्त प्रमाणे गुन्हे करणारे एकूण ४ आरोपी हे त्यांचेकडील स्वीफ्ट कारमधून कुर्दुवाडीहून टेंभूर्णीकडे येत
आहेत. त्यावरून तात्काळ कार्यवाही करून सदर कारमधील इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे सविस्तर व
कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी १) सांगोला पोलीस ठाणे गुरनं १५६२/२०२० भादंवि क.३९४,१२०ब ३४ व
२) मंद्रुप पोलीस स्टेशन गुरनं ३५४/२०२०, भा.द.वि.क. ३९२,३६३,३४१ वगैरे प्रमाणे गुन्हे केल्याचे कबूल
केले आहे. यामुळे सदर आरोपींना सांगोला पोलीस स्टेशन कडील गुन्हयात अटक करण्यात आलेली असून
त्यांचेकडून सांगोला पोलीस स्टेशनकडील गुरनं १५६२/२०२० मधील १,२०,000/-रू ३. ५ तोळे वजनाचे
सोन्याचे दागिणे व ९ मोती व मंद्रुप पोलीस स्टेशन कडील गुरनं ३५४/२०२० मधील ३७,000/- रूपये किंमतीचे
१७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व स्वीफ्ट कार किंमत रूपये ४,00,000/- असा एकूण ५,५७,000/-
रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
गुन्हयाचा सविस्तर तपास करता सदरचा गुन्हा हा ५ पेक्षा जास्त आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्याने
त्यांस भा.द.वि.क. ३९५ हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.
अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली
सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सपोनि नागेश यमगर सांगोला पोलीस स्टेशन, स्था.गु.शा. कडील पोलीस
अंमलदार बिरूदेव पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, परशुराम शिंदे, लालसिंग राठोड, अजय
वाघमारे, राहुल सुरवसे तर सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार दत्ता वजाळे, सचिन देशमुख व बबलू
पाटील यांनी बजावली आहे.

 

 

Anjani Mishra

Leave a Reply

error: Content is protected !!