Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

police crime branch परभणी पोलिसांची जबरदस्त कामगिरी

1 Mins read

police crime branch परभणी पोलिसांची जबरदस्त कामगिरी

police crime branch सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

दिनांक 19/07/2021

परभणी पोलीस दलातर्फे, दि: १३/०७/२०२१ रोजी फिर्यादी नामे गोविंद
रामराव सुरनर यांनी पालम पोलीस ठाणेला फिर्याद दिली की, ते दि. १२/०७/२०२१ रोजी मौजे बनवस ता.पालम
येथील त्यांचे राहते घरी कुटुंबासह जेवण करुन रात्री झोपी गेले.तेव्हा दि.१३.०७.२०२१ रोजी सकाळी झोपेतून उठुन
पाहीले असता कोणी तरी अज्ञात चोरटयांनी त्यांचे राहते घराचे चॅनल गेटला लावलेले कुलुप तोडुन आत प्रवशे करुन
कपाटाचे लॉक तोडुन कपाटामध्ये सोन्या चांदीचे दाग दागीने व नगदी मुदेमाल कोणी तरी अज्ञात चोरटयानी चोरुन
नेल्याने सदर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन पालम येथे अज्ञात इसमा विरुध्द गुरनं १६१/२०२२१ कलम ४५७,३८०
भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मा.पोलीस अधिक्षक साहेब, परभणी व मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब, यांचे
आदेशाने सदर गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाख्ने ( police crime branch )मार्फत समांतर तपास करण्यात येत होता. यासाठी सदर गुन्हा निष्पण्ण
करणे कामी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते.
मा.पोलीस अधिक्षक साहेब, परभणी यांचे आदेशाने नमुद गुन्हयाची उकल करण्याचे आदेशीत केल्याने सपोनि
श्री आलेवार साहेब, प्रभारी अधिकारी स्था.गु.शा.परभणी यानी टीमसह मौजे बनवस येथील घरफोडीचे घटनास्थळी
भेट देवुन गुन्हा उघड करणे कामी पथक तयार करुन त्यांना योग्य मार्गदर्शन केले व आरोपीतांचा माग काढणे बाबत
उपयुक्त सुचना दिल्या नमुद गुन्हयाची एम.ओ.बी. चे अवलोकन केले असता ती काही परभणी जिल्हयातील विशिष्ठ
गुन्हेगारांची असल्याचे संशयावरुन स्थानीक गुन्हे शाखा पथकाने( police crime branch ) गुप्त बातमीदारा मार्फत सदर दिशेन सखोल चौकशी
सुरु केली होती. गुप्त बातमीदारा मार्फत दि.१६.०७.२०२१ रोजी रात्री माहीती मिळाली की, काही संशीयत इसम
संततुकाराम कॉलेजचे मैदाना मध्ये पाली टाकूण बरेच दिवसापासुन राहत आहेत व रात्रीचे वेळी परभणी जिल्हयात व
परीसरात घरफोडया करुन चोरी करीत आहेत. मिळालेल्या माहीती वरुन स्था.गु.शा.चे सपोनि श्री व्यंकटेश आलेवार,
पोउपनि साईनाथ पुयड, सपोउपनि/ हनुमंत जक्केवाड, पोहवा/ बालासाहेब तुपसुंदरे, पोना/ किशोर चव्हाण, पोना/
दिलावर पठाण, पोना/ सय्यद मोबीन, पोना/ शेख अझहर, पोशि संतोष सानप व आर.सि.पीचे मपोशि शेख व
बामणवाड आशानी मिळुन संत तुकाराम कॉलेज वसमत रोड परभणी येथील मैदानावर राहणारे संशयीत इसमांची
पालाची रेकी करुन यातील संशयीत हे पालाच्या आत मध्ये नसल्याचे संशयावरुन रात्रभर त्यांचेवर नजर ठेवण्यात आली
व दि. १७.०७.२०२१ रोजी चे सकाळी संशीयतांना पोलीस असल्याचे न कळु देण्यासाठी सपोनि श्री आलेवार साहेब,
सानप व बामणवाड यांनी डॉक्टरची वेशभुषा करुन संततुकाराम कॉलेज मैदानावरील असणारे झोपडयांवर जावुन
सापळा रचुन संशयीत इसम हे पालावर येताच चारही बाजुने त्यांना कुंपन करुन आडविण्यात आले, सदर पालावर एक
पुरुष इसम मिळुन आल्याने आम्ही त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश उर्फ गुप्ता शंकर शिंदे
रा.करमतांडा ता.सोनपठ,जि.परभणी. ह.मु. टोकवाडी ता.परभणी जि.बीड असल्याचे सांगीतले. सदर आरोपीस पालम
पोलीस स्टेशन गुरनं.१६१/२०२१ कलम ४५७,३८० भादवि या गुन्हयात अटक करुन त्याचे कडुन विविध गुन्हयातील
गेला माला पैकी एकुण अकारा तोळे सोने व नगदी १,४१,५००/-रु असा एकुण ६,४१,५००/-रु चा मुदेमाल हास्तगत
केला आहे व तिन वेगवेगळे मोबाइल मिळुन आले. नमुद मुदेमाला विषयी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता

यातील नगदी रुपये हे मौजे बनवस ता.पालम येथील घरफोडी करुन चोरल्याचे आरोपीने सांगीतले . यावरुन आरोपी
गुप्ता शिंदे यास विश्वासात घेवुन त्याने परभणी जिल्हयात इतर ठिकाणी सुध्दा घरफोडया व त्याचे साथीदार
बाबत अधिक माहीती घेतली असता सुरेश ऊर्फ गुप्ता पिता शंकर शिंदे वय २६ वर्ष रा.करमताडा ता.सोनपेठ
ह.मु.टोकवाडी ता.परळी जि.बीड. याने त्याचे इतर पाच साथीदारासह घरफोडया करुन चोरी केल्याचे कबुल केले आहे
.यात निष्पण झालेले घरफोडया/गुन्हे खालील प्रमाणे.

police crime branch परभणी

police crime branch परभणी

परभणी जिल्हयातील अदयाप पावेतो एकुण चार गुन्हे उघड झाले असुन यात सहा आरोपीतांचा सहभाग
असल्याचे निष्पण झालेले आहे. सदर अटक आरोपीकडुन अजुन चोरी / घरफोडी सारखे गुन्हे इतर जिल्हयात केल्याचा संशय
आहे.पोलीस स्टेशन पालम येथील गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री शेळके साहेब करीत आहेत.

सदरची कामगीरी( police crime branch ) मा.पोलीस अधिक्षक साहेब, मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब,

यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि व्यंकटेश आलेवार,प्रभारी अधिकारी ,स्था.गु.शा,
सपोनि कपील शेळके पो.स्टे.पालम, पोउपनि साईनाथ पुयड, सपोउपनि/८५९ हनुमंत जक्केवाड, पोहवा/६६४ बालासाहेब
तुपसुंदरे, पोना/१११८ दिलावर पठाण, पोना/१५०२ शेख अझहर, पोना/१२९१ किशोर चव्हाण, पोना/१०८२ खुपसे,पोना/१०५७
सय्यद मोबीन, पोशि/११०५ संतोष सानप,चापोना निळे, घुगे,सोनवणे, मुरकुटे सर्व नेमणुक स्था.गु.शा. तसेच आरसीपीचे प्लॉट
क्र.४ चे पोशि/ औठे, मरंगर,शेळके,अंभोरे,पवार,गोरे,माळकर, वाटुरे, बोबडे, महीला पोशि मुनी शेख, सोनी
बामणवाड,अमलदार यांनी मिळुन सदर कामगीरी केली आहे.

Anjani Mishra Reports

Leave a Reply

error: Content is protected !!