power politics
power politics
power politics

power politics शरद पवारांनी झोप उडवली, चेकमेट

 राजू पाटील 

power politics शरद पवारांनी झोप उडवली, चेकमेट

 

 

 

चार पारले जी अन् बारा कप चहात ?

वाह पवार साहेब , दंडवतच तुम्हाला !

 

 

 

23/6/2021,

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोरजी बरोबर दोन बैठका आणि यशवंत सिन्हांजींच्या राष्ट्रमंचची बैठक दिल्लीत स्वगृही घेऊन शरद पवार साहेबांनी power politics आख्खा हिंदुस्थान गदा गदा हालवीला .

देशातील सर्व मिडिया , सर्व छोटे मोठे राजकीय विश्लेषक , सर्व स्तंभ लेखक , सर्व राजकीय पक्ष , भारतातील तमाम राज्य सरकारे , केंद्र सरकार , परदेशी मिडियाचे प्रतिनिधी , आणि दस्तूर खुद्द भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे भाईबंद या सर्वांची झोप उडवली.

आणि ती सुद्धा बारा कप चहा आणि चार पारलेजी बिस्किट पुड्यात ? याला म्हणतात power politics शरद पवार.

राजकारणातला बाप माणूस. फडणवीस , चंद्रकांत पाटील , यांचे तर सोडाच , मोदी , शहा , नड्डांनाही अजून पवारांचा अंत लागला नाही , इतका धूर्तधुरंधर !

भाजपाला शह देण्यासाठी पवार तिसरी आघाडी उघणार ; वाचलं ना ? काँग्रेस ला तिसऱ्या आघाडीत स्थान नाही ; ऐकलं ना ?

सर्व विरोधी पक्षाची मोट बांधणार , हेही ऐकलं .दिल्लीत पवार साहेबांच्या घरी बैठकही झाली.तीही पाहीली.आणि .

ही बैठक राजकीय नव्हती , तिसऱ्या आघाडीचा या बैठकीत विषय नव्हता , काँग्रेसला बाजूला ठेवण्याचा उद्देश नाहीच.या सर्व गोष्टीही पुन्हा ऐकल्या.

ते चँनलवर चर्चा करणारे , अभ्यासक विश्लेषक वगैरे दिल्लीतील बैठक संपल्या बरोबर चक्कर येऊन पडलेत.अजून ऊठले नाहीत , आणि महिनाभर ऊठणारही नाहीत .

अरे मग हे नेमकं होतं काय ?
राष्ट्र मंचची बैठक पवारांच्या घरी का ?
या बैठकीला कांही विरोधीपक्ष नेतेचं कसे ?
तिसऱ्या आघाडीचं नेमकं झालं तरी काय ?
तिसरी आघाडीची चर्चा म्हणावी तर ,

अखिलेश , मायावती , ममता , तेजस्वी , चंद्राबाबू , स्टँलिन , चंद्रशेखर राव , या सारख्या नेत्यांना का बोलावले नव्हते ? काँग्रेस चे पुढे पाहू , पण निदान इतर नेत्यांना का निमंत्रणे नव्हती ? निदान संजय राऊत तरी ?

अशा असंख्य प्रश्नांनी आज संपूर्ण भारत डोक्याला वीक्स लाऊन चोळत बसला आहे .

कारण power politics शरद पवार नावाचे भारतीय बनावटीचे , मराठी मातीतले , अजब रसायन कोणालाही अद्याप कळले नाही .

आणि भविष्यात सुद्धा कुणालाही कळण्याची सूतराम शक्यताही नाही .

पवारांच्या डोक्यात तिसरी आघाडी आहे का ? उत्तर आहे, आहे.

त्यासाठीचं अशा बैठकीचे आयोजन होते काय ?

तर, होय.

काँग्रेस ला बाजूला ठेवण्याचा त्यांचा हेतू होता काय ? उत्तर आहे , होय पण स्पेस ठेवून.

या बैठकीने कांही साध्य केले काय ? उत्तर आहे , खूप कांही साध्य केले आणि पवार साहेबांनी मोदी हटावची मोट बांधली सुद्धा .

शरद पवारांना दिल्लीच्या राजकारणात रस आहे.

आणि लाल किल्ल्यावरुन भाषण करायचेच आहे.पण योग्य वेळ येत नाही , आणि आलीच तर काँग्रेस आडवी येतेय.

स्वपक्षाचे संख्या बळ तोळा मासाच.त्यामुळे अत्यंत कौशल्याने , अत्यंत सावधपणे , अत्यंत संयमाने आणि कोणीही दुखावणार नाही , याची काळजी घेऊनच चढाई करायची आहे.

काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस चे लोक शरद पवारांना नेता स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारतील का ?

हा प्रश्नच.म्हणून आता धोरणात बदल.काँग्रेस स्वतःहून पवारांच्या पाठीशी उभी राहीली पाहीजे अशी परिस्थिती निर्माण करायची .

आणि तोच या गेल्या आठवड्यातल्या घडामोडीचा अन्वयार्थ .

तिसरी आघाडी तर होणारच.प्रसंगी काँग्रेसला सोडून .

पण ही तिसरी आघाडी संख्याबळाने काँग्रेस पेक्षा मोठी असली पाहीजे, हे यातले इंगित.

आणि हे इंगित साध्य झाले तर काँग्रेसपुढे पवारांना पाठिंबा देण्यावाचून पर्याय राहणार नाही , ही त्यातली गोम.

नरेंद्र मोदीच्या विरुद्ध चांगले वातावरण तयार झाले आहे.मोदींचा ग्राफ पन्नास ट्टक्यांच्या खाली आहे.म्हणजे आज मोदी विरोधकांना पन्नास टक्के संधी आहे.

ही संधी केवळ पाच टक्याने वाढवायची आहे.

त्यासाठीच हा सारा प्रपंच ! येत्या डिसेंबर पर्यंत पुन्हा एक अशीच बैठक होईल.त्यात ममता आणि इतर दोन तीन प्रमुख नेते उपस्थित असतील.

पण जेव्हा तिसरी बैठक होईल तेव्हा तिसरी आघाडी अस्तित्वात आलेली आपणास पहायला मिळेल.

अशी तिसरी आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर काँग्रेसला बरेच धक्के दिले जातील.किंवा काँग्रेस चे कांही बिन्नीचे नेते पक्ष सोडतीलही.

आपणास आठवत असेल तर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मे महिन्याच्या अखेरीस असे म्हटले होते की ,

मोदींच्या विरोधात वातावरण तयार होत आहे आणि राहूल गांधी आश्चर्यजनक पद्धतीने पुढे येतील.आठवतेय ना ,

या विधानाच्या पार्श्वभूमीवरच पवारांनी प्रशांत किशोरांना निमंञित केले होते.आणि त्या नंतरचे हे सारे कवित्व.

पवारांनी प्रशांत किशोर यांना बोलावून आणि दिल्लीत राष्ट्र मंचची बैठक स्वगृही घेण्यास परवानगी देऊन किंवा घेऊन दोन दगडात डझनभर पक्षी मारले आहेत.

दिल्लीच्या राजकारणात पवार आता मोदी नंतरचे प्रमुख नेते बनले आहेत.महाराष्ट्र सरकार मधील स्वबळ नारेही आता बोथट होऊ घातले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाक्याने खूप छोटा असतानाही या पक्षाचे महत्त्व राष्ट्रीय पातळीवर वाढले आहे.पवारांनी योग्य टाइमिंग साधली आहे.योग्य हत्यार वापरले आहे.

आवश्यक संयमही बाळगला आहे. power politics शरद पवार हे खूप कसलेले ,मुरलेले ,’झुरलेले , नेते आहेत.त्यांच्या काठेवाडीच्या काठीचा आवाज येत नाही .

मार बसलेल्या जागी प्रचंड वेदना तेवढ्या जाणवतात.

आता एवढा मोठा देश ढवळून काढायचा म्हटले तर भाजपा सारख्या मोठ्या पक्षाला किमान 100 कोटी तरी खर्च करावे लागले असते.

चर्चा घडवून आणण्यासाठी चँनल स्नेह रिनिव्हल करावा लागला असता.

पण पवार साहेबांनी हे दिव्य काम चार पारले जी बिस्केटपुडे आणि बारा कप चहात केले , ते सुद्धा सरकारी !

आता कांही लोक खास करुन महाराष्ट्रातले लोक पवारांना नावेच ठेवतात.शिव्याही घालतात.परंतु अशा शिव्या घालण्याचा हेतू वेगळा असतो.

पवारांना विरोध केल्याने अथवा त्यांचेवर तोंडसुख घेतल्याने राजकारणातले महत्त्व वाढते असा अनेकांचा अनुभव .

power politics पवारांना शिव्या दिल्याने अनेकांना आमदारकी मिळते , एवढे महत्त्व या नेत्याचे आहे. उदाहरणार्थ गोपिचंद पडळकर !

 राजू पाटील

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
putalabai
putalabai – छत्रपती शिवाजीमहाराज पुतळाबाई राणीसाहेब
error: Content is protected !!
%d bloggers like this: