Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

1 Mins read

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

Pune Crime News – न्याय / अन्याय आणि सत्यमेव जयते, न केलेल्या गुन्ह्यांची कठोर शिक्षा ?

 

 

20/9/2021,

 

Also Read : https://www.postboxindia.com/pune-crime-news-joshi-abhyankar-murder-case-part-4/

 

अनिल गोखले खून प्रकरण – Pune Crime News

२४ मार्च, १९७७.

 

१ डिसेंबर १९७६ चे रात्री भांडारकर रोड वरील अभ्यंकरांचे ‘स्मृती’ बंगल्यात ५ जणांची हत्या झाल्यानंतर सुमारे ४ महिन्यानंतर अनिल गोखले
या तरुणाचा खून झाल्याचे आढळून आले. तारीख २४ मार्च, १९७७.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 1

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

प्रभाकरपंत गोखले यांनी दिलेल्या माहीतीवरून असे दिसून आले की, २३ मार्च, १९७७ रोजी रात्री ९.३० वाजता अनिल गोखले अलका थिएटरवर गेला
होता, त्या पूर्वी राजेंद्र जक्कल रात्री ९.०० वाजता आपला मित्र जयंत गोखले ( अनिल चा मोठा भाऊ ) यास काही कामानिमित्त भेटण्यासाठी त्याचे घरी गेला
होता. तेथून परत जाताना अनिल ने विनंती केल्यावरून जक्कलने अनिल गोखले यास आपल्या मोटार-सायकलवर घेऊन अलका सिनेमाजवळ
सोडले होते. त्यानंतर अनिल कुठे गेला हे जक्कल यास माहीत नाही. श्री. विष्णु बाबाजी जोशी अलका थियेटरमध्ये तिकीट विक्रीचं काम करतात.
बाल्कनीच्या तिकीट विक्रीचं काम ते करत असल्यामुळे अनिल गोखले यास लागणारे तिकिट विक्रीचे आकडे तयार करून देण्याचं काम त्यांच्याकडे होतं.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 2

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

पोलीसांना दिलेल्या जबानीत विष्णुपंत जोशी यांनी सांगितलं की, २३ मार्च, १९७७ ला अनिल रात्री दहा वाजता आला तेव्हा हिशेब लिहून पुरे झाले नव्हते.

तेव्हा, नंतर येतो असे सांगून अनील अलका थिएटर बाहेर गेला, तो परत आलाच नाही. दुस-या दिवशी अनिल नाहीसा झालाहे जयंत गोखलेने जोशींना सांगितलं.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 3

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 3

२५ मार्च, १९७७ रोजी मुळा-मुठा नदीच्या संगमामध्ये अनिल गोखलेचे शव काही इसमांनी पाहीले व पोलीस स्टेशनवर माहीती दिली. ससून
हॉस्पिटलमध्ये प्रभाकर पंत गोखले यांनी ते शव आपला मुलगा अनिल गोखलेचेच आहे असे सांगितले. अनिल यास राजेंद्र जक्कल बरोबर २३
मार्च १९७७ रोजी त्याच्या मोटर-सायकल वरून जातांना प्रभाकर गोखलेंनी पाहीले होते. पोलीस तपासाचे डिटेक्शनचे काम तेथून सुरु झाले आणि
जक्कलच्या सर्व साथीदारांस – दिपीप सुतार, शांताराम जगताप, सुहास चांडक, मुन्नावर शहा आणि सतीश गोरे यांना अटक करण्यात आली.
एरंडवणे भागातील एक दुकानदार श्री. श्रीरंग गोपाळ चाकणकर यांनी पोलीसांस जबाब (Statement) दिला तो असा..

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 4

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

‘चाकणकरांचे पानपट्टी-सिगरेटचे दुकान एरंडवणे भागात जक्कल यांच्या प्लॉटला लागून असलेल्या प्लॉटवर आहे. चाकणकर यांनी व त्याचा
भाऊ उत्तम याने अनिलला शांताराम जगताप व दिलीप सुतारच्या मोटर-सायकलवर बसलेले पाहिले या वरुन पोलीस अधिका-यांनी असा तर्क केला,
की जक्कलच्या टपरीत अनिल गोखलेचा खून झाला असावा. हा तर्क बरोबर असू शकेल. कारण १ वर्षापूर्वी याच एरंडवणे भागात जक्कलच्या टपरीत चौघा
जणांनी मिळून प्रकाश हेगडेचा खून केला होता असे नंतरच्या तपासात आढळून आले. प्रकाश हेगडे खून- प्रकरण त्यानंतर उघडकीस आले.

परंतू प्रकाश हेगडेच्या खून – प्रकरणात सुहास चांडक नामक जो एक माफीचा साक्षीदार कोर्टाला मिळाला तोच माफीचा साक्षीदार (Approver) दुस-या
कोणत्याही खून प्रकरणांत कोर्टाला मिळाला नाही. कारण हा चांडक इतर कोणत्याही खुनात सहभागी झाला नव्हता.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 5

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

खून करण्याची पद्धत :: (Modus Operandi) – Pune Crime News

 

पुण्याच्या अभिनव कलाविद्यालय या कॉलेजातील कॉलेजकुमार प्रकाश हेगडेचा खून ज्या पध्दतीने झाला
त्याच पध्दतीने अनिल गोखले या युवकाचाही खून झाला. दोन्ही खून जक्कलच्या कर्वे रोड येथील एरंडवणे भागातील ‘टपरीत’ झाले असा पुरेसा पुरावा
कोर्टापुढे आला होता. तेव्हां या दोन युवकांचा खून करण्याची पध्दत गुन्हेगारांचा Modus Operandi एकच होता हे खरे आहे.
ही खून करण्याची पध्दत म्हणजे – त्या विशिष्ठ युवकास ( प्रकाश हेगडेस ) त्याचे कॉलेजपासून दूर पळवून नेणे – एरंडवणे भागातील जक्कलच्या
‘टपरीत’ लपविणे, तेथे त्याच्यावर हल्ला करणे-गुद्दे मारुन बेशुध्द पाडणे व नंतर सारस बागेत तलावात त्यास बुडवणे. त्याच पध्दतीप्रमाणे अनिल गोखले
यास ‘अल्का’ सिनेमा पासून मोटार-सायकलवर बसवून दूर पळविणे-कर्वे रोड येथील ‘टपरीत’ त्यास लपविणे-तिथे त्याचेवर हल्ला करून त्यास घायाळ
करणे व नंतर त्याचे शव मुळा-मुठा नदीत सोडणे अशा प्रकारे खून करण्याची पध्दत या दोन ‘एकेरी’ खूनात ( Single Murder मध्ये ) सारखीच होती. – The
method was the same in these single murders. परंतु Multiple Murders जोशी व अभ्यंकर कुटुंबातील सामुहीक खूनाची

कार्य पध्दती Modus Operandi अगदीच वेगळी होती. ती पध्दत म्हणजे ८-१० जणांच्या टोळीने घरात रात्रीच्या वेळी घुसणे.

मोठ्या कंपनीचे Sales Representative आहोत-विक्रेते आहोत असा बहाणा करणे. घरातील प्रत्येक खोलीत ३ जणांनी प्रवेश करणे.

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस फूस लावून कोणते तरी गुंगी आणणारे पेय पिण्यास देणे, व नंतर एकेक व्यक्तीला झोप लागल्यावर

त्यावर हल्ला चढवून गळा दाबून ( रक्ताचा एकही थेंब न सांडता ) त्यांची हत्या करणे. हे काम राजेंद्र जक्कल आणि इतर तीन कॉलेज कुमारांचे नव्हे.

मुंबईहून आलेल्या एका अज्ञात टोळीने ते काम केले असावे.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 6

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

आरोपी – चार कॉलेज कुमार – Pune Crime News

 

१९७६ साली १ नोव्हेंबर व १ डिसेंबर रात्री ९/ १० वाजता पुणे शहरात दोन ब्राहाण कुटुंबात त्यांचे रहात्या घरात जे हत्याकांड झाले त्या काळात वर
उल्लेखिलेले चार आरोपी हे कॉलेज-कुमार होते. त्या पैकी पहिले तीन १.जक्कल, २. सुतार व ३. जगताप हे ‘अभिनव कला विद्यालयात विद्यार्थीदशेत
होते. त्या काळात ते कॉलेज सोडून गेले नव्हते. Loafer झाले नव्हते किंवागाव-गुंड म्हणून भटकतही नव्हते.
आरोपी नं. ४ मुन्नावर शहा हा बी.कॉम. च्या फायनला होता. असे हे चार कॉलेजीयनस् त्यांच्या मानसीक स्थितीचा-Mens Rea चा विचार करणे जरूर आहे. ते
मनोवृत्तीने इतके दुष्ट होते का, की पुणे शहरातील श्रीमंत ब्राह्मण कुटुंबांच्या घरात घुसून एकाच वेळी सामूहीक खून (Multiple Murders) करून पळून जाऊ
शकतील? अशा प्रकारच्या सामूहीक हत्यांकाडासाठी जी पूर्वतयारी करावी लागते जे नियोजन (Planning) करावे लागते त्यासाठी त्यांना ‘तेवढी’ सवड, तेवढा
वेळ व पैसा त्यांचेकडे होता का? अर्थात तेवढा वेळ, पैशाचे पाठबळ, मोठ्या प्रमाणात दर्जेदार सुवासीक

अत्तर द्रव वगैरे खरेदी करण्यास आवश्यक असणारे रुपये ५,०००/- त्यांचे कडे नव्हते.

आता या चार आरोपींचे आणखी मनो-विश्लेषण करू या :- Pune Crime News

 

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 7

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

नं.१. राजेंद्र जक्कल अभिनव कला विद्यालयाचा हा स्टूडंट – थल्लापा जक्कल नामक एका फोटोग्राफरचा हा मुलगा. यल्लापा जक्कल यांचा
फोटोग्राफीचा एक प्रशस्त स्टुडियो पुणे-सिटी पोस्टाजवळील एका इमारतीत आहे. तेथील दुस-या मजल्यावर तिथेच त्यांचे कुटुंबही रहाते. त्यांच्या फोटो
स्टुडियोत जुन्या काळातील त्यांनीच चित्रीत केलेले पं. नेहरू व गांधीजींचे सुदर फोटो आहेत. सरोजिनी नायडू आणिइतर काँग्रेस कार्यकर्त्यांचेही फोटो आहेत.
यल्लापा जक्कल सज्जन गृहस्थ आहेत. ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी. पुण्यात येऊन स्थायीक झाले. त्यांना दुसरा एक मुलगाही आहे. अशा कुटुंबात
वाढलेला राजेंद्र जक्कल हा कॉलेज-कुमार, तो मनाने इतका क्रुर आणि निष्ठूर असेल का, की त्याने जोशांच्या घरातील तीन व्यक्ती व अभ्यंकरांच्या
घरातील पाच व्यक्तींचे खून करून पळून जावे ?
तसे काही केलेच असते, तर तो आणि त्याचे साथीदार हजारो मैल दूर पळून गेले असते. आणि वर्षभर पुणे शहरात पुन्हा पाऊल ठेवले नसते.

कुठेतरी दूरवर उत्तर प्रदेश, पंजाब किंवा बंगाल प्रांतात जावून लपून बसले असते. माणसांच्या मनातील Escape Instinct पलायन प्रवृत्ती त्यांना

तसे पळून जाण्यास सूचीत करते. जोशी- अभ्यंकर हत्याकांडानंतर चारही आरोपी आपापल्या घरी पुणे शहरातच होते. नेहमीप्रमाणे कॉलेजला जात येत असत.

नोव्हेंबर १९७६ च्या दिवाळी सणानिमित्त दिलीप सुतार व शांताराम जगताप यांनी एक आकाश- कंदिलाचे प्रदर्शन भरविले होते असा पोलीस रिपोर्ट आहे.

राजेन्द्र जक्कल या आरोपी नं.१ ने आपले कॉलेज सोडून गावगुंड झाल्याचा रिपोर्ट कुठेही नाही. त्या काळात तो कॉलेजचाच विद्यार्थी होता. वडिलांचे घरात रहात असे.

पुण्यातील एका तरुणीबरोबर त्याचे लग्नही जुळले होते. आपल्या लग्न समारंभाची कुंकुम-पत्रिका छापवून घेण्यासाठी तो आपला मित्र जयंत गोखले याच्या घरी गेला होता.

असा पुरावा आहे. प्रभाकरपंत गोखले यांनीच केलेले हे निवेदन होय. कुंकुम पत्रिका छापवून घेण्याच्या कामानिमित्त राजेंद्र जक्कल हा आपला मित्र

जयंत गोखले यांस भेटण्यासाठी रात्री आठ वाजता गोखलेच्या घरी मोटार-सायकलवरून आला होता. त्यावेळी अनिल गोखलेनेच त्याला विचारले – ‘अरे जक्कल, मला
तुझ्या मोटर-सायकल वर बसवून अलका’ थियेटर पर्यंत नेतोस का ? तिथे माझे काही काम आहे’. अशा प्रकारचा पुरावा कोर्टामध्ये रेकॉर्ड झाला आहे. राजेंद्र
जक्कल याने गोखले कुटुंबाच्या घरी दिलेली भेट ( visit ) ही त्या सर्व कुटुंबावर हल्ला करण्याच्या उद्देशाने नहे.
He had no intention to attack the entire Gokhale Family, as alleged by the prosecution.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 8

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

२. दिलीप सुतार – आरोपी नं. २ दिलीप सुतार हा राजेंद्र जक्कलचा मित्र. ‘अभिनव कला विद्यालयाचा विद्यार्थी’. त्याचे वडील ज्ञानोबा सुतार हे स्टेट-
ट्रान्सपोर्टमध्ये बस-ड्रायव्हर होते. दिलीपला एक बहीण आहे. सुतार कुटुंब स्वारगेट भागात एका चाळीतील दोन खोल्यांच्या गाळ्यात रहाते. हा दिलीप सुतार
पेहलवान होता. व्यायाम शाळेत मल्लखांबा वर खूप व्यायाम करीत असे. तो शरीराने आडदांड होता, हे खरे आहे. परंतु त्या विशिष्ट कालावधीत तो कॉलेज
सोडून गेला नव्हता. (At that material time of Joshi- Abhyankar’s multiple murders he had not left the college)
गावगुंड होऊन भटकत नव्हता. कॉलेज स्टूडंट होता. नोव्हेंबर १९७६ च्या दिवाळी सणानिमित्त त्याने व शांताराम जगतापने आकाश-कंदिल बनवून त्यांचे
प्रदर्शन भरवले होते.
३. शांताराम जगताप ( महार ) – हा ही राजेंद्र जक्कलचाच एक मित्र. ‘अभिनव कला विद्यालय कॉलेजचा स्टूडंट. एका मोठ्या झोपडीत त्याचे कुटुंब
समवेत रहाणारा काळ्या वर्णाचा, उंच शरीर यष्टीचा. याने म्हणे एकूण १० ( दहा ) रबरी हात मोजे विकत घेतले. चारच गुन्हेगारां साठी दहा हात मोजे ? कशाला
घ्यायचे ते ? एवढा पैसा त्याच्याकडे होता कां ? अर्थात नव्हता. परंतु फिर्यादी पक्ष या गोष्टीचा विचारच करीत नाहीत. पोलीसांनी बनवलेली कोणतीही थाप
( Concocted Story ) जशीच्या तशी ग्राह्य मानून फिर्यादी पक्ष ( Prosecution ) आपले काम करतो हे चूक आहे.

शांताराम जगताप ( नं.३ ) आणि मुन्नावर शहा ( नं.४ ) हे जोशी कुटुंबाच्या सामूहीक खुनात सहभागी झाले नव्हते असे फिर्यादी पक्षाचेच निवेदन आहे.
जक्कल व सुतार या दोघांवरच जोश्यांच्या खुनाचा आरोप.

४. मुन्नावर शहा : आरोपी नं. ४ – मुन्नावर शहा हा आरोपी नं. ३ शांताराम जगताप याचा मित्र Personal Friend, अगदी सुरुवातीच्या १ वर्षा पुर्वीच्या प्रकाश
हेगडेच्या खुनात हा मुन्नावर शहा सहभागी झाला नव्हता. त्यानंतरच्या जोशी कुटुंबांच्या सामुहीक खुनातही त्याचा कोणताही भाग नव्हता. किंवा त्याचा
मित्र शांताराम जगताप हा ही जोशींच्या खुनात सहभागी नव्हता. या दोघांवर जोशी कुटुंब सामुहिक खुन प्रकरणात कोणतेही आरोपपत्र (Charge Sheet)
नाही. तर मग मुन्नावर शहास का पकडले ? त्यास कारण असे की तो शांताराम जगतापचा मित्र आहे, असे पोलीसांस आढळून आले. जक्कल, सुतार व
शांताराम यांचे बरोबर तो सतीश गोरेच्या वर्तकाश्रमातील खोलीवर जात असे – दुसरे कारण असे की, दिलीप सुतार व शांताराम जगताप यांचे
बरोबर कोल्हापुर गांवी काशीद कुटुंबाचे घरी काही व्यापारी देवाण-घेवाण, बोलणी करण्यासाठी मुन्नावर शहा गेला होता, असे उघडकीस आले. परंतु
कोणतीही चोरी करण्यासाठी ते कोल्हापूरला गेले नहते.

पुण्यातील एका मुस्लीम वस्तीत एका प्रशस्त बंगल्यात पहील्या मजल्यावरच्या तीन खोल्यांच्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये मुन्नावर शहा आपले आई-वडील
व मोठी बहीण यांच्यासह राहात असे. त्याच्या वडिलांचा ट्रक-लॉरीचा ट्रान्सपोर्टचा स्वतंत्र बिझिनेस होता. बहिण एका शाळेत अध्यापिका होती. स्वत:
मुन्नावर शहा वयाने १८ वर्षाचा मुस्लीम युवक असून धार्मिक मनोवृत्तीचा होता. रोज संध्याकाळी नमाज वगैरे करीत असे. अशा या मुन्नावर शहास अभ्यंकर
कुटुंबांच्या आणि शेवटच्या अनिल गोखलेच्या खुनात गोवण्यात आले, ते बनावट पुराव्याच्या आधारे. या आरोपी नं. ४ च्या बाबतीत कोणता पुरावा कोर्टापुढे
आला ते पहा :-

‘विपुल ज्युवलर्स’ चा मालक भुमल पलरेचा याचे निवेदन : आरोपी मुन्ना शहा आणि त्याची आई मेरुनिस्सा जानेवारी १९७७ मध्ये पलरेचाचे दुकानी
गेले व १. तन्मणीचे खोड, २. मोत्यांचे मंगळसूत्र आणि ताईत हे दागिने म्हणे पलरेचा या मारवाड्यास रू.५००/-ला विकले. This was a concocted story ही
बनावट कथा होती. ते खरे असते तर पोलीस अधिका- यांनी मुन्नावर शहास रंगेहाथ पकडला असता. शिवाय पलरेचा सोनारावर ‘Receiving stolen property
Sec. Indian Penal Code’चा आरोपही ठेवता आला असता. तसा आरोप कोणावरही ठेवला नाही. याने हेच सिध्द होते की पुण्यातील सर्व सोनार, सराफ

मंडळींचे निवेदन खोटे ( पढवलेले ) होते. It has no evidentiary Value भुमल पलरेचा या साक्षीदारास सेशन्स कोर्टात आरोपींच्या वकीलाने प्रश्न विचारला – ‘या
चार आरोपी पैकी मुन्नावर शहा कोण ते दाखव पाहू ?’ तेव्हा साक्षीदार भुमल पलरेचा (मारवाडी) हा मुन्नावर शहास ओळखू शकला नाही.

पुणे शहरातील जोशी व अभ्यंकरांच्या घरात जेव्हा सामूहीक खून झाल्याचे उघडकीस आहे तेव्हा पूणे- पोलीसांनी वेगवेगळे तर्क केले.
कोणी म्हणाले की हे खून फासे-पारधी जमातीच्या इसमांनी केले असावेत. दुस-या जेष्ठ पोलीस अधिका-यांनी असा तर्क केला की, हे हत्याकांड

सेवानिवृत्त लष्करी अधिकारी / शिपाई यांनी केले असेल. काही नागरीक म्हणाले की मांग-गारुडी जातीतील गुंडांनी हे कृत्य केले असावे.
आणखीही एक तर्क असा होता की, परक्या ग्रहावरून आलेल्या अज्ञान व्यक्तींनी हे भयानक खून केले असतील, कारण हे दोन्ही सामूहीक हत्याकांड

शुक्ल-पक्ष दशमीसच झाले होते. .. परंतू खरे मारेकरी कोण ? हे Multiple Murders सामूहीक खून कोणी केले, याचा निश्चित अंदाज पाच महीन्यांच्या दीर्घ
तपासानंतरही कोणासही मिळाला नाही, एकही डोळस साक्षीदार पुणे-पोलीसांस मिळाला नाही. वर उल्लेखिलेल्या चार आरोपींपैकी कोणासही कोणीही
जोशी किंवा अभ्यंकर या ब्राह्मण कुटुंबियांच्या घरात प्रवेश करतांना किंवा घराबाहेर पडतांना पाहीलेले नव्हते. म्हणूनच, सुरुवातीच्या जिल्हा
न्यायाधीश श्री. वाईकरांच्या कोर्टात जज्ज साहेबांनी त्यांचेवर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा (Criminal Conspiracy) चार्ज / आरोप ठेवण्यास नकार दिला.

भांडारकर रोड येथील अभ्यंकर कुटुंबाच्या हत्येनंतर ४ महिन्यांचा कालावधी उलटला. त्यानंतर २४ एप्रिल १९७७ रोजी जेव्हा अनिल गोखलेचा खून
उघडकीस आला, तेव्हा जे गुन्हेगार सापडले ते म्हणजे (१) राजेंद्र जक्कल (२) दिलीप सुतार (३) शांताराम जगताप आणि (४) मुन्नावर शहा हे चार
कॉलेज कुमार. परंतु ज्यादा तपास केल्यावर असे आढळून आले की, या पैकी जक्कल, सुतार व जगताप हे तीन गुन्हेगारच एक वर्षापूर्वी घडलेल्या
प्रकाश हेगडे या कॉलेज कुमाराच्या खुनात सहभागी झाले होते. आरोपी नं. ४ मुन्नावर शहा हा युवक प्रकाश हेगडेच्या खुनात सहभागी झालाच नव्हता.

तरीही पूणे-पोलीसांनी तर्क केला की, ज्या अर्थी साक्षीदार सुहास चांडकच्या निवेदनानुसार प्रकाश हेगडेचा खून आरोपी जक्कल, सुतार व जगताप यांनी मिळून
सहकार्याने केला आणि अनिल गोखलेच्या शेवटच्या खुनाशीही त्यांचा संबंध आहे, असा ठोस पुरावा मिळाला आहे, त्या अर्थी हेच तीन गुन्हेगार जोशी –
अभ्यंकरांच्या खून सत्रात असू शकतील / असावेत. ‘या तर्कानुसार वर उल्लेखलेल्या तीन गुन्हेगारांमध्ये पोलीसांनी मुन्नावर शहा या मुस्लीम युवकाची भर
घातली आणि एकूण चार मारेक-यांनी ते भीषण हत्याकांड केले असा दावा केला.. हा तर्क चुकीचा होता. विपर्यस्त होता, हे या पूर्वी केलेल्या विवेचनावरून
स्पष्ट होते.. वर उल्लेखिलेल्या चार आरोपींबरोबर सतीश गोरे या’ वर्तकाश्रमात’ रहाणा-या जक्कलच्या मित्रासही पुणे पोलीसांनी पकडले होते, आणि तो

पाचवा आरोपी म्हणून त्यास पोलीस कोठडीत डांबून ठेवले होते. एक महिन्याच्या कालावधीनंतर या गोरेला हवे तसे पढवून पोलीस इन्स्पेक्टरने या सतीश गोरेची
मुक्ती,… डिस्चार्ज (Discharge) कोर्टाकडून मागून घेतला. आणि हा आरोपी जणू काही ‘माफीचा साक्षीदार’ झाला आहे. असा बहाणा फिर्यादी पक्षाने
केला. परंतु ज्या आरोपीचा डिस्चार्ज फिर्यादी पक्षानेच घेतला आहे, त्या आरोपीचे निवेदन कोर्टाला मान्य होऊ शकत नाही, पहा: इंडीयन इव्हीडन्स अॅक्ट-
सेक्शन २४ खरी हकीकत ही आहे की, सतीश गोरेने कोर्टात केलेले निवेदन ही एक थाप होती. तो आपल्या निवेदनात जे म्हणतो की, ‘जक्कल मला
म्हणाला, किंवा जगताप मला म्हणाला . ‘जोशी- अभ्यंकर आम्हीच मारले, हे पूर्णतय: खोटे निवेदन होय. अशा प्रकारचा ऐकीव पुरावा (Hearsay Evidence)
कोर्टाला मान्य होऊ शकत नाही. ज्यांनी दोन ब्राह्मण कुटुंबाच्या घरात घुसुन ते भयानक हत्याकांड केले, ते खरे मारेकरी पुणे शहराच्या बाहेर केव्हाच . दुस-
या दिवशीच पळाले, ते पूणे नगरीत पुन्हा परतलेच नाहीत.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 9

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

Also Visit : https://www.postboxlive.com

 

प्रभाकर प्रधान, वकील 
शोध प्रबंध लेखन - वैभव जगताप

Leave a Reply

error: Content is protected !!